शार्क टँक इंडिया
shark tank india in marathi
Reading Time: 2 minutes

Shark Tank India : शार्क टँक इंडिया

जाणून घ्या शार्क टँक इंडिया मध्ये शार्क्सनी आत्तापर्यंत  केलेली गुंतवणूक 

२०डिसेंबर २०२१ पासून सुरू झालेला रियालिटी शो शार्क टँक इंडिया (Shark Tank India) सध्या सर्वत्र चर्चेत आहे. शार्क टँक हा अमेरिकन रिॲलिटी शोची भारतीय आवृत्ती आहे. जगभर प्रसिद्ध असलेला हा रिॲलिटी शो भारतात देखील यशस्वी ठरला आहे. तरुण आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे या रिॲलिटी शोचे खरे उद्दिष्ट आहे. या शो मध्ये देशातील ७ यशस्वी उद्योजक गुंतवणूकदार आहेत ज्यांना शार्क म्हणून संबोधले जाते. अनेक उद्योजक आपल्या भन्नाट व्यवसायिक कल्पना घेऊन येतात व एक चांगली डील घेऊन जातात.

ज्या उद्योजकांच्या व्यवसाय  संकल्पना शार्क ला आवडतात ते शार्क त्या उद्योजकांच्या व्यवसायात गुंतवणूक करतात.

याच शो अंतर्गत सध्या एक नाव  इंटरनेटवर चर्चेत आहे ते म्हणजे जुगाडू कमलेश. कारण कोणतीही व्यवसायिक पदवी नसताना त्याने शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत निर्माण केलेल्या कीटकनाशक ट्रॉली स्प्रेच्या उत्पादनामुळे   प्रभावित होऊन  पीयूष बन्सल जे या शो मध्ये एक शार्क आहेत त्यांनी कमलेशच्या उत्पादनामध्ये 40% इक्विटीसाठी 10 लाख आणि कर्ज म्हणून 20 लाख  रुपये एवढी गुंतवणूक केली. आत्तापर्यंत शार्क टँक इंडिया चे ३० भाग पूर्ण झाले आहे. त्यामुळे  शार्क टँक मधील या गुंतवणूकदारांनी आत्तापर्यंत   किती गुंतवणूक केली आहे याची उत्सुकता आपल्यापैकी बर्‍याच जणांना आहे. 

हेही वाचा – Success Story of Quick Heal : वाचा एक रिपेअरमन कसा बनला Quick Healचा CEO……

 जाणून घेऊयात शार्क टँक मध्ये शार्क्सनी आतापर्यंत किती गुंतवणूक केली आहे :

१)अमन गुप्ता – स्वयंनिर्मित उद्योजक असलेले अमन गुप्ता हे boAt चे सहसंस्थापक व विपणन संचालक आहेत. boAt ही कंपनी  इअरफोन्स, हेडफोन्स या उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे. अमन गुप्ता यांनी २०१३ मध्ये समीर मेहता यांच्यासोबत boAt ची स्थापना केली. त्यांची एकूण  संपत्ती अंदाजे ७०० कोटी रुपये इतकी आहे. शार्क टँक मध्ये त्यांनी आत्तापर्यंत २३ डीलमध्ये ६.६९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 

२)नमिता थापर –  भारतामधील सर्वात यशस्वी महिला उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमिता थापर या एम्क्योर फार्मास्युटिकल्सच्या  सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपये इतकी आहे.शार्क टँक मध्ये त्यांनी एकूण १६ डीलमध्ये जवळ जवळ ४.१९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा – Success Story Of Lens cart : ‘वाचा’ लेन्सकार्टची यशोगाथा !…

३)पीयूष बन्सल – लेन्सकार्टचे सह – संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल  भारतातील यशस्वी उद्योजकांची पैकी एक आहेत. लेन्सकार्ट च्या स्थापनेपूर्वी  पीयूष बन्सल हे युनायटेड स्टेटमधील  मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन मध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून काम करत होते. ती नोकरी सोडल्यानंतर त्यांनी २०१० मध्ये अमित चौधरी व सुमित कपाही यांच्या सोबत लेन्सकार्टची स्थापन केली. त्यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपये इतकी आहे. शार्क टँक मध्ये त्यांनी १६ डीलमध्ये ४.१९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये जुगाडू कमलेशच्या कीटकनाशक ट्रॉली स्प्रेचा देखील समावेश आहे.

४)अश्नीर ग्रोव्हर – अश्नीर ग्रोव्हर हे भारत पे चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी २०१८ मध्ये शाश्वत नाक्राणी यांच्यासह भारत पेची स्थापना केली. त्यांची एकूण संपत्ती ७०० कोटी इतकी आहे. शार्क टँक मध्ये त्यांनी आत्तापर्यंत १५ डीलमध्ये ३.९६ कोटी रुपयांची गुंवणूक केली आहे.

५)अनुपम मित्तल – अनुपम मित्तल हे पीपल ग्रुपचे व शादी.कॉम चे संस्थापक आणि सीईओ आहेत. तसेच त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे. त्यांची एकूण संपत्ती १८५ कोटी रुपये इतकी आहे. शार्क टँक मध्ये या शार्कने आत्तापर्यंत १६ डील मध्ये ३.७१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा – Nykaa IPO: नायका आयपीओ बाबतच्या या १० गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?…

६) विनिता सिंग –  SUGAR कॉस्मेटिक या मेकअप विक्रेत्या  ब्रँडच्या सहसंस्थापक व सीईओ आहे.२०१२ मध्ये त्या फॅब बॅग च्या सहसंस्थापक देखील होत्या. विनिता सिंग IIT मद्रास आणि IIT अहमदाबाद च्या माजी विद्यार्थी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५९ कोटी रुपये आहे. शार्क टँक मध्ये त्यांनी आत्तापर्यंत ६ डील मध्ये सुमारे १.५२ कोटी रुपये गुंतवले आहेत.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…