Reading Time: 2 minutes
- पश्चिम बंगाल राज्यात बांगलादेश मधील नागरिक निर्वासित झाले होते. त्या वेळी कॉलरा साथीच्या काळात गोळ्या औषधे रुग्णांना मिळत नव्हते.
- डॉ दिलीप महालबनीस यांनी ओआरएसचा शोध लावला आणि अनेक रुग्णांचे प्राण वाचले. ताप, उलटी आणि जुलाब झाले की डॉक्टर हमखास ओआरएस पाण्यातून पिण्याचा सल्ला देतात.
- डॉ दिलीप महालाबनीस यांचे सोमवार १७ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले.
- त्यांनी ओआरएसचा शोध लावला होता. एखाद्या व्यक्तीला जुलाब, अतिसार किंवा उलट्या झाल्या की शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते.
- अशा वेळी ओआरएस दिले तर त्याच्या शरीरामधील पाणी लवकर भरून निघून त्याची तब्येत लवकर बरी होते.
डॉ दिलीप महालबनीस यांचे कार्य –
- डॉ दिलीप महालबनीस यांच्या ओआरएसच्या शोधाला जगभरात मान्य करण्यात आले होते.
- डॉ दिलीप महालबनीस हे बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी १९६० साली कोलकत्ता येथील जॉन हॉपकिन्स इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग येथे त्यांनी कॉलरा आणि इतर अतिसाराच्या रोगांवर संशोधन करण्याचे काम केले.
- बांगलादेश मुक्तिसंग्रामाची घटना त्यांच्या आयुष्याला नवीन वळण देऊन गेली.
बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि ओआरएसचा शोध –
- १९७१ साली अनेक बांगलादेश मधील नागरिक बंगाल मध्ये विस्थापित झाले होते. त्या विस्थापित झालेल्या छावण्यांमध्ये अशुद्ध पाणी आणि स्वच्छतेचा अभाव होता.
- त्यामुळे छावण्यांमध्ये कॉलरा आणि अतिसाराची सगळीकडेच साथ पसरली. त्यावेळी रुग्णांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले होते.
- डॉ दिलीप महालबनीस यांनी मीठ आणि साखरेच्या द्रावणाचे ओआरएस बनवले होते.
- त्या ओआरएसमुळे ३० टक्के रुग्णांचे होणारे मृत्यू ३ टक्क्यांवर आले. त्यांच्या या प्रयोगाला ‘द लॅन्सेन्ट’ या मेडिकल जर्नलने २० व्या शतकातील महत्वाचा शोध म्हणून गौरवले.
- ओआरएस हे द्रावण पाणी, मीठ, बेकिंग सोडा आणि ग्लुकोज यापासून बनवण्यात आले होते.
- १९७५ ते १९८० पर्यंत कॉलरा हा आजार नियंत्रणात येण्यासाठी डॉ महालाबनीस यांनी प्रयत्न केले.
डॉ दिलीप महालबनीस यांचा कार्यगौरव –
- भारत सरकारकडून डॉ दिलीप महालबनीस यांचा शोध कायमच दुर्लक्षित करण्यात आले.
- जगभरातील अनेक रुग्णांना आजारपणाच्या काळात ओआरएसमुळे जीवनदान मिळाले.
- १९८० मध्ये महालबनीस यांनी जिवाणूजन्य रोगांच्या व्यवस्थापनावरील संशोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेत सल्लागार म्हणून काम केले.
- डॉ दिलीप महालबनीस यांना अमेरिका देशातील मानाच्या ‘पेलिन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. पेलिन पुरस्कार हा नोबल पुरस्काराच्या समान समजला जातो.
- थायलंड देशाच्या सरकारनेही २००६ साली डॉ महालबनीस यांना ‘प्रिन्स महिडोल पुरस्कार’ देऊन गौरव केला होता. अशा महान संशोधकाला अर्थसाक्षर परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
Share this article on :