Reading Time: 2 minutes
- सामान्यपणे ग्राहकांना क्रेडिट कार्ड बँकेकडून घ्यावेत असे बँकेकडून कॉल येत असतात.
- फिनटेक कंपन्यांकडून अशाच प्रकारची कार्ड देण्यात येत असून त्यांच्यासाठी हे क्षेत्र नवीनच आहे. नेहमी दिल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डांप्रमाणे फिनटेक कार्ड दिली जात नाहीत.
- फिनटेक कार्ड्समध्ये युनी कार्ड्स आणि स्लाइस कार्डचा समावेश करण्यात होतो.
फिनटेक कंपन्यांमार्फत पुरवली जाणारी कार्ड ही आभासी स्वरूपातील असतात. फॉर्म भरल्यानंतर ही आभासी कार्ड्स ग्राहकाने दिलेल्या पत्यावर पाठवली जातात.
फिनटेक कार्डचे फायदे
- फिनटेक कार्डचे लॉग इन ऑनलाईन पद्धतीने केले जाते. डिजिटल माध्यमांचा वापर करून ग्राहकाची केवायसी केली जाते.
- ग्राहकांना फिनटेक कार्ड कमी वेळेत मिळते. या कार्डचा तुम्ही ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी वापर करू शकता.
- या कार्डच्या माध्यमातून कंपन्या फूड डिलिव्हरी, ई-फार्मसी माध्यमावर सवलत आणि ऑफर्स दिल्या जातात. तुमचे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर आभासी माध्यमातून ते तात्काळ बदलता येते.
Benefits of credit card: क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे ६ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
फिनटेक कार्डची वैशिष्टये
- युनी कार्ड ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये परतफेड करण्याची परवानगी देते. तुम्ही खर्च केलेल्या रकमेपैकी एक तृतीयांश रक्कम तुम्ही तात्काळ भरू शकता आणि उरलेली रक्कम २ हप्त्यांमध्ये भरावी लागते.
- स्लाइस कार्डमध्ये तुम्हाला सहा, नऊ आणि बारा महिन्यांच्या हप्त्यामध्ये परतफेड करण्याचे पर्याय देण्यात येतात.
- स्लाइस कार्डची ऑफर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना १५,००० रुपयांपर्यंतचे क्रेडिट लिमिट देण्यात येते.
अर्थसाक्षर व्हा – पुस्तक वाचले का ?
फिनटेक कार्ड काढण्याची पद्धत
फिनटेक कार्ड काढण्यासाठी मोबाईल मध्ये एक ॲप डाउनलोड करावे लागते. त्यामध्ये कार्डाचे ग्राहक होण्यासाठी काही पद्धतींचे पालन करणे गरजेचे असते. व्हर्च्युअल कार्ड मिळाल्यानंतर कार्ड तात्काळ ग्राहकांच्या पत्यावर पाठवण्यात येते. फिनटेक कार्डमधून एटीएम कार्ड सारखे पैसे काढता येत नाहीत.
क्रेडिट स्कोअर
- जेव्हा तुम्ही स्लाइस किंवा युनी कार्ड वापरता तेव्हा तुमच्या क्रेडिट कार्डचे ग्राहक कर्ज म्हणून ओळख मिळते
- तुम्ही कोणतेही पेमेंट चुकवले तर त्याचा सिबिल स्कोअरवर परिणाम होतो.
फिनटेक कार्डची वापरायची पद्धत
- बहुतेक फिनटेक फर्म व्हर्च्युअल कार्ड देतात, त्या कार्डचा वापर सहसा स्वाईप मशीनवर करता येत नाही. तसेच अनेक कंपन्या यामधून पैसे काढण्याची परवानगी देत नाहीत.
- फिनटेक कार्ड कॉलेज मधील विद्यार्थ्यांनाही दिले जाते.
- फिनटेक कार्डमधील पैशांचा वापर आवश्यक असेल तेथेच करावा. फिनटेक कार्डमधून काढलेल्या पैशांची परतफेड वेळेत केली नाही तर कर्जावर व्याज वाढत जाते.
नक्की वाचा : क्रेडिट कार्ड : फायदे व तोटे
Share this article on :