लोकांची अनेक ठिकाणी बँक खाती असतात, प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळ्या कारणांनी बँक खाते उघडलेले असते. काही बँक खात्यांचा रोजच्या खर्चासाठी वापर केला जातो आणि काही बँक खाती आधी असणाऱ्या जॉबच्या काळात वेतन मिळण्यासाठी उघडलेली असतात.
१८ वर्ष पूर्ण झाल्यावर शिष्यवृत्तीसाठी बँकेत काढलेली खाती अनेक दिवस चालू ठेवलेली असतात. पण वापरातील सोडून इतर बँक खाती बंद करणे गरजेचे असते.अनेक बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यामुळे शुल्क कापले जाते.
बँकेतील ग्राहकांनी व्यस्त वेळापत्रक किंवा कंटाळा केल्यामुळे खाती बंद केली जातात. अशावेळी नवीन कर्ज घेताना किंवा आयटीआर भरताना अडचणी निर्माण होतात. बँक खाती का बंद करावीत याबाबतची ५ कारणे खाली देण्यात देण्यात आलेली आहेत, ती समजून घेऊया.
१. बँकेतील पगार खाते नियमित बचत खात्यात बदलते आणि शुल्क आकारले जाते –
- समजा तुम्ही पहिला जॉब सोडून दुसऱ्या जॉबला सुरुवात केली तर त्याठिकाणी दुसऱ्या बँकेत पगार खाते उघडायला सांगितले जाते.
- तुम्ही एखाद्या बँकेत पगार मिळवण्यासाठी खाते उघडले तर ३ ते ६ महिन्यांनी ते अकाउंट सेव्हिंग अकाउंट मध्ये रूपांतरित होते आणि ते खाते चालू ठेवण्यासाठी बँकेत विशिष्ट रक्कम ठेवण्याची गरज असते.
- जर ते खाते चालू ठेवले नाही तर बँक त्या खात्यात शिल्लक रक्कम नसल्यामुळे शुल्क कापायला सुरुवात करते. या पद्धतीमुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे संपू शकतात.
नक्की वाचा : कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या ९ समस्या माहित आहेत का?
२. बँकेतील ३ – ४ खात्यांमध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवली की व्याज कमी होते –
- बँकेतील खाते चालू ठेवायचे असेल तर किमान रक्कम त्यामध्ये ठेवावी लागते. खात्यात कमीत कमी १०,००० रुपये रक्कम ठेवणे बँकांमध्ये बंधनकारक असते.
- एखाद्या व्यक्तीचे २ किंवा ३ पगार खाते असतील आणि त्यामध्ये २०,००० ते ३०,००० रुपयांची रक्कम असेल तर त्या खात्यावर व्याज मिळत नाही.
- जुनी पगाराची खाती बंद करणे आणि त्यामधील निधीची कर्ज परतफेडीसाठी वापर किंवा एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.
- बचत खात्यातील ठेवींवर फक्त ४% व्याजदर मिळतो, त्यामुळे ही विनाकारण सुरु असलेली बँक खाती बंद करणे हाच योग्य निर्णय ठरतो.
३. अवाजवी शुल्क आकारणे –
- बँक खाते असले की बँकेकडून डेबिट कार्ड मिळालेले असते.
- बँक डेबिट कार्ड मोफत देत नाही, यावर बँकेकडून २०० ते ५०० रुपये शुल्क आकारले जाते. बँकेत खाते असूनही डेबिट कार्ड वापरले जात नसेल तर त्यावरील चार्ज दरवर्षी भरावा लागतो.
- बँकेकडून खात्याबद्दल माहिती देण्यासाठी एसएमएस सुविधा देण्यात येते, यासाठी चार्ज आकारला जातो.
- बँकेतील खात्याचा उपयोग नसताना त्यावर चार्ज आकारला जातो. त्यामुळे वापर नसला की बँक खाते बंद करणे हाच निर्णय योग्य ठरतो.
नक्की वाचा : मुलांना आर्थिक नियोजन शिकवणारे किड्स सेव्हिंग अकाउंट
४. बँकेत अनेक खाती असल्यामुळे आयटीआर दाखल करताना गोंधळ उडतो –
- बँकेत पगाराची अनेक जुनी खाती असतात. त्यांच्यामुळे आयटीआर भरताना गोंधळ उडतो.
- आयकर भरताना अशावेळी अनेक बँकांकडून माहिती आणि स्टेटमेंट जमा करावे लागते. त्यामुळे गरजेचीच बँक खाती चालू ठेवावीत.
५. तुमच्या बँक खात्याचा दुरुपयोग होऊ शकतो –
- अनेक ठिकाणी बँक खाते असले आणि त्याचा योग्य वापर होत नसेल तर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता वाढते.
- बंद खाती फसवणूक करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापरही होऊ शकतो.
निष्कर्ष :
- अनेक ठिकाणी पगाराचे खाते असतील तर नेहमी वापरात असलेले खाते सोडून इतर बँक खाती बंद करावीत.
- बँकेशी योग्य व्यवहार ठेवल्यामुळे भविष्यात कर्ज घ्यायला किंवा आयटीआर भरताना अडचण निर्माण होत नाही.
- बँकेतील व्यवहारांच्या बाबत काळजी घेत जावी आणि पासवर्डची कोणासोबतही देवाणघेवाण करू नये.