Reading Time: 2 minutes

आज शेअर मार्केटमधे निफ्टी 25000 पुढे, सेंसेक्स 82,000 च्या पुढे निघून गेलं आहे, म्युच्युअल फंड अपेक्षेपेक्षा जास्त परतावा देत आहे. असे असले तरीही बँकेतल्या फिक्स्ड डिपॉजिटमधे गुंतवणूक करणारे बरेचजण आहेत. आणि आज ही मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉजिट तेवढेच लोकप्रिय आहे.यामागे पैशाची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा असू शकतो! 

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ बँकेद्वारे काही आकर्षक मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) योजनांची माहिती या लेखांमधून आपण घेणार आहोत.

मुदत ठेव म्हणजे काय?

  • एखाद्या बँकेकडे ठरावीक कालावधीसाठी काही रक्कम ठेवली जाते, ठराविक कालावधी पूर्ण होईपर्यंत गुंतवणूकदाराला ठेवलेली रक्कम काढता येत नाही.
  • ठरावीक मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला गुंतवणुकीच्या रकमेवरचं व्याज आणि मूळ रक्कम अशी एकूण रक्कम परत मिळते. 
  • मुदत ठेवीचे काही प्रकार असतात उदाहरणार्थ – 
  1. मासिक व्याज मुदत ठेव योजना – यामधे गुंतवणूकदाराला गुंतवणुकीच्या रकमेवर दर महिन्याला व्याज मिळते.
  2. त्रैमासिक व्याज मुदत ठेव योजना – यामधे गुंतवणूकदाराला गुंतवणुकीच्या रकमेवर दर तीन महिन्यांना व्याज मिळते. 
  3. पुनर्निवेशन योजना – यामधे गुंतवणूकदाराला दर तीन महिन्यांनी जी काही व्याजाची रक्कम मिळते, ही रक्कम पुन्हा मूळ गुंतवणुकीमध्ये गुंतवली जाते. यामुळे चक्रवाढ पद्धतीने गुंतवणुकीची रक्कम वाढत जाऊन गुंतवणूकदाराला मूळ रक्कम आणि व्याज अशी एकत्रित रक्कम मिळते.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुदत ठेवीचे पर्याय : 

स्टेट बँक ऑफ इंडिया कायमच ग्राहकांसाठी गुंतवणुकीचे अनेक आणि वेगवेगळे पर्याय आणत असते. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे –

  • एसबीआय मुदत ठेव 
  •  एसबीआय करबचत योजना
  •  एसबीआय मल्टी ऑप्शन ठेव योजना
  •  एसबीआय पुनर्गुंतवणूक योजना

एसबीआयच्या मुदत ठेव योजना ग्राहकांना कोणत्या सुविधा देतात?

  • एसबीआयमध्ये मुदत ठेव खाते उघडण्यासाठी Rs.1000 इतकी किमान रक्कम असणे आवश्यक आहे. 
  • तसेच एसबीआयमधे  मासिक मुदत ठेव योजना, त्रैमासिक मुदत ठेव योजना आणि तिमाही परतफेड योजना  या प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
  • एसबीआयमध्ये मुदत ठेव योजनेचा कमीत कमी कालावधी 7  दिवसांपासून सुरू होतो.  म्हणजेच सात दिवसांसाठीसुद्धा गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो. तर जास्तीत जास्त हा कालावधी दहा वर्षापर्यंत आहे म्हणजेच गुंतवणूकदार दहा वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो.

माहितीपर : पीएफ खात्यामधून पैसे काढायचे असतील तर हे नियम माहित करून घ्या.

एसबीआय मुदत ठेवीचा दर-

  • सर्वसाधारणपणे एसबीआयच्या मुदत ठेवीचा दर 3.50%  पासून 6.50% (वार्षिक दर) इतका आहे. कालावधीनुसार हा दर बदलतो.
  •  एसबीआयमधे सर्वाधिक मुदत ठेवीचा दर जवळपास 7.50% (वार्षिक दर )इतका आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी बऱ्याच सुविधा आणि सवलत मिळतात. तसेच मुदत ठेवीमधे देखील अतिरिक्त 0.50% इतके व्याज मिळते.

2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी गुंतवणूकदाराला किती व्याजदर मिळेल हे खाली दिलेल्या तक्त्यानुसार समजू शकेल.

कालावधी  मुदत ठेव दर  ज्येष्ठ नागरिक दर 
7 दिवस ते 45 दिवस 3.50% 4 %
46 दिवस ते 179 दिवस 5.50% 6%
180 दिवस ते 210 दिवस 6 % 6.50%
211 दिवस ते 1 वर्षापर्यंत   6.25% 6.75%
1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंत  6.80% 7.30%
2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत  7 % 7.50%
3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत  6.75% 7.25%
5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत  6.50% 7.50%

 

प्रेरणादायी: वॉरेन बफे आणि बर्कशायर हॅथवे 

थोडक्यात सांगायचं म्हणजे,

  1. एखाद्या गुंतवणूकदारानं 1 वर्ष ते 2  वर्षांपर्यंतचा कालावधी  निवडला आणि दहा लाख रुपये रक्कम मुदत ठेवीसाठी निश्चित केली. तर 6.80% या दराने मॅच्युरिटी नंतर  गुंतवणूकदाराला Rs.10,69,753  इतकी रक्कम मिळेल. 

2.एखाद्या गुंतवणूकदाराने  2 ते 3 वर्षांपर्यंतचा कालावधी  निवडला आणि दहा लाख रुपये रक्कम मुदत ठेवीसाठी निश्चित केली. तर 7 % या दराने मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदाराला Rs.11,48,881  इतकी रक्कम मिळेल. 

3.आणि वर म्हटल्याप्रमाणे हेच जर एखाद्या सीनियर सिटीजनने गुंतवणूक केली तर त्या गुंतवणूकदाराला अतिरिक्त 0.50% व्याजदराने पैसे मिळतील.

वरील लेखांमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती असून वेबसाईट कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची  शिफारस करत नाही.

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…