Reading Time: 3 minutes

वॉरेन बफे हे नाव सामान्य व्यक्तींसाठी आणि अर्थात गुंतवणूकदारांसाठी एक प्रेरणादायी, चालता बोलता ग्रंथ आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वात यशस्वी गुंतवणूकदार असं म्हटल्यानंतर वॉरेन बफे हेच नाव यादीमधे सर्वात वर येतं. 

गुंतवणुकीविषयी बफे यांचे धोरण किंवा विचार करण्याची पद्धत ही सगळ्यांनीच ऐकली असेल किंवा कुठेतरी वाचली असेल. इतर गुंतवणूकदार जेव्हा एखादा स्टॉक विचलित होऊन किंवा घाबरून विकून टाकतात तेव्हा वॉरेन बफेट म्हणतात, “ व्हेन पीपल आर ग्रीडी, आय एम फियर फुल ! अँड व्हेन पीपल आर फियर फुल, आय एम ग्रीडी ! ” म्हणजेच “ जेव्हा भीतीने लोक शेअर्स विकतात; तेव्हा मी न भीता शेअर्स विकत घेतो ! ”

वॉरेन बफे हे अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योगपती असून बर्कशायर हॅथवे या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. वॉरेन बफे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 साली ओमाहा,अमेरिका येथे झाला. वयाच्या अकराव्या वर्षापासूनच त्यांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आणि 2008 साली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचं नाव कोरलं गेलं. श्रीमंतीचं मोजमाप मालमत्तेच्या स्वरूपात करायचं झाल्यास वॉरेन  बफे यांची मालमत्ता 146 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर मनाची श्रीमंती मोजायची झाल्यास हे वाचून नक्कीच वॉरेन बफे यांच्या बद्दल आदर वाढेल की, वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीच्या 99% भाग दान केला आहे. 

हे वाचा : युनिफाईड पेन्शन योजना

 बर्कशायर हॅथवेचा रेकॉर्ड :

  • वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीनं नुकताच म्हणजे 28 ऑगस्ट 2024 रोजी वन ट्रिलियन डॉलर हा अभूतपूर्व टप्पा ओलांडला आहे. आणि हे अद्वितीय यश मिळवणारी पहिली नॉन टेक अमेरिकन कंपनी बनली आहे. 
  • वॉरेन बफे यांच्या जन्मदिवसाच्या केवळ दोन दिवस आधी आलेला हा योग म्हणजे वाढदिवसाची भेटच म्हणावी लागेल. 
  • वन ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडताना, कंपनीचा शेअर जवळपास 0.85% ने वाढला. यामागे अमेरिकेत आर्थिक परिस्थितिमधली सुधारणा आणि विमा क्षेत्रामधले आलेले चांगले परिणाम असल्याचे म्हंटले जात आहे. 
  • बर्कशायर हॅथवे हा जगातला सर्वात महाग शेअर म्हणून ओळखला जातो. यांच्या एका शेअरची किंमत 6,96 ,724 डॉलर इतकी आहे, भारतीय चलनानुसार Rs.5.84 कोटी !
  • अमेरिकेतील अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, मेटा (फेसबुक), अल्फाबेट, एनविडिया या कंपन्यांनी देखील वन ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे, मात्र बर्कशायर हॅथवे ही एकमेव अशी नॉन टेक कंपनी ठरली आहे. 
  • वॉरेन बफे यांनी 1960 मध्ये बर्कशायर हॅथवेची कमान हातात घेतली आणि तिथूनच या कंपनीचा कायापालट झाला. आधी टेक्सटाईलशी संबंधित व्यवसाय असणारी ही कंपनी विमा, उत्पादन क्षेत्र, रीटेल, रेल्वे ट्रान्सपोर्टटेशन, एनर्जी अशा अनेक वेगवेगळ्या व्यवसायांमधे सध्या कार्यरत आहे.
  • बर्कशायर हॅथवे यांच्याकडे द बफेलो न्यूज, वर्ल्ड बुक इंटरनॅशनल, सीज कँडी शॉप्स, अमेरिकन एक्सप्रेस , कोकाकोला, जिलेट, वॉशिंग्टन पोस्ट यासारख्या कंपन्यांचा  मालकी हक्क आहे.

माहितीपर : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या सध्याचे आयपीओ 

वॉरेन बफे यांच्या जीवनावरील पुस्तक:

  • “ मेकिंग ऑफ अमेरिकन कॅपिटलिस्ट ” हे लोवेनस्टाईन यांनी वॉरेन बफेट यांच्या जीवनावरील लिहिलेले पुस्तक असून त्यात वॉरेन बफेट यांच्या आयुष्याचा रंजक प्रवास लिहिला आहे. 
  • या  पुस्तकात त्यांचा जन्म, लहान वयातली गुंतवणुकीची सुरुवात ते  बर्कशायर हॅथवे पर्यंत सर्व पैलू मांडले आहेत.

वॉरेन बफे यांची गुंतवणुकीबद्दलची काही मार्गदर्शक तत्वं :

वॉरेन बफे यांचे गुंतवणुकीबद्दल, पैशाबद्दल, व्यवसायाबद्दल, शेअर मार्केट बद्दल , जीवनाबद्दल अनेक लोकप्रिय असे विचार किंवा काही मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध आहेत, त्यापैकी काही खालील प्रमाणे,

गुंतवणुकीबद्दल वॉरेन बफे म्हणतात,

  • “नियम क्रमांक एक, कधीही पैसे गमावू नका ! नियम क्रमांक दोन,  नियम  क्रमांक एक कधीही विसरू नका !”
  • “कधीही चांगली विक्री करण्यावर विश्वास ठेवू नका. खरेदी किंमत इतकी आकर्षक असू द्या की मध्यम विक्री देखील चांगले परिणाम देईल.”
  • “गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे स्वभाव !,बुद्धी नाही.”
  • “किंमत म्हणजे तुम्ही जे भरता ते आणि मूल्य म्हणजे तुम्हाला जे मिळते ते !”
  • “गुंतवणुकीतील तीन सर्वात महत्त्वाचे शब्द म्हणजे सुरक्षिततेचे मार्जिन !”
  • “अद्भुत किमतीत वाजवी कंपनीपेक्षा, वाजवी किमतीत एक अद्भुत कंपनी विकत घेणे खूप चांगले आहे ! ”
  • “तुम्ही दहा वर्षांसाठी स्टॉक घेण्यास इच्छुक नसाल तर दहा मिनिटांसाठीही तो स्टॉक घेण्याचा विचार करू नका !”
  • “तुम्ही काय करत आहात हे माहीत नसल्यामुळे धोका निर्माण होतो !”
  • “वार्षिक निकाल खूप गांभीर्याने घेऊ नका, त्याऐवजी चार किंवा पाच वर्षांच्या सरासरीवर लक्ष केंद्रित करा !”
  • “तुम्हाला समजू शकत नाही अशा व्यवसायात कधीही गुंतवणूक करू नका !”

 

गुंतवणूक क्षेत्रातला 82 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले,  संयम , दूरदृष्टी असलेले वॉरेन बफे आणि त्यांची कामगिरी अद्वितीयच ! त्यांच्या विशाल अनुभवातून सगळ्याच गुंतवणूकदारांना कायम योग्य मार्ग सापडत राहो ! 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

लोकप्रिय “रसना”चे संस्थापक अरीज खंबाटा यांची यशोगाथा

Reading Time: 3 minutes उन्हाळ्यात दुपारच्या वेळेला रसना हमखास पिला जातो. शुभ कार्यातही पाहुण्यांचे रसना देऊनच…