Reading Time: 5 minutes

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) या कंपनीची प्राथमिक भागविक्री (IPO = Initial Public Offering)  दि. २, ३ व ४ डिसेंबर या ३ दिवशी खुली असणार आहे. आयपीओ द्वारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. 

कंपनीचे जवळपास रु. १००० कोटी भांडवल म्हणून जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. यापैकी २ आठवड्यांपूर्वी प्री- आयपीओ भाग विक्रीद्वारे रु. २५० कोटी जमा केले आहेत. आयपीओद्वारे रु.७५० कोटी उभे केले जाणार आहेत. त्याचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे “रेड हेरींग प्रोस्पेक्ट्स” वाचण्यासाठी येथे क्लिक करा. यामध्ये प्रवर्तकांविषयी माहिती, कंपनीचे आर्थिक निकाल, भांडवल उभारणीची कारणे, भांडवलाचा अंतिम विनियोग, कंपनीमध्ये गुंतवणुक जोखिमा याबद्दल सविस्तर माहिती असते.  

  • उज्जीवन ‘स्मॉल फायनान्स’ देणारी बँक आहे. या ‘स्मॉल फायनान्स’ बँका Underserved & Unserved segments” म्हणजेच  इतर बँका किंवा आर्थिक संस्था ज्या ग्राहकवर्गापर्यंत आजिबात पोहचू शकल्या नाहीत किंवा फार कमी प्रमाणात पोहोचू शकल्या, अशा आर्थिकदृष्ट्या निर्बल, मागास ग्राहकवर्गास सेवा देतात. 
  • लघुवित्त आर्थिक संस्था (Microfinance) बिगरवित्तीय आर्थिक संस्था (NBFC) म्हणून चांगले काम करत होत्या. सर्वसामान्य लोकांपर्यंत बँकिंगची गंगा पोहोचण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या बिगरवित्तीय संस्थांना स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना देण्याचे ठरवले. 
  • उज्जीवन फायनान्शिअल सोल्युशन्स २००५ पासून मायक्रोफायनान्स व्यवसायात आहे. आरबीआयने २०१७ फेब्रुवारीमध्ये सदर कंपनीला स्मॉल फायनान्स बँकिंग परवाना दिला व कंपनीने “उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक” म्हणून व्यवसाय करण्यास केली. पुढील ३ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करणे बंधनकारक असल्याने उज्जीवन शेअर बाजारात नोंदणी करत आहे. सदर बँक उज्जीवन फायनान्सशीअल सर्व्हिसेसची सबसिडीअरी कंपनी आहे. 
  • उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या ३० जून २०१९ पर्यंत २४ राज्यांत ४७४ शाखा३८७ एटीएम सेंटर आहेत. यातील १२० शाखा छोट्या गावांत आणि खेड्यांत आहेत.कंपनीच्या जास्तीत जास्त शाखा कर्नाटक, तामिळनाडू आणि बंगालमध्ये आहे. 
  • ब्रँच नेटवर्कमधून कंपनी सुमारे ४३ लाखापेक्षा जास्त ग्राहकांना कर्ज पुरवठा करते.    
  • कंपनीमध्ये १६,३४७ कर्मचारी काम करतात. 

स्मॉल फायनान्स बँकेचे बिझनेस मॉडेल:-

१. स्मॉल फायनान्स बँक छोट्या रकमांचा वित्त पुरवठा करते-

  • एकाच मोठ्या ग्राहकाला कर्ज देण्याऐवजी अनेक छोट्या ग्राहकांना तुलनेने कमी रकमेचे कर्ज दिल्याने स्मॉल फायनान्स बँकांची ग्राहकसंख्या जास्त तर जोखीम कमी असते. 
  • उदा : रु.३० लाखाचे गृहकर्ज एका व्यक्तीला मोठ्या बँक देतात, तर स्मॉल फायनान्स बँका प्रति ग्राहक रु.१०,०००/- प्रमाणे ३०० ग्राहकांना कर्ज देतात. गृहकर्जामध्ये ग्राहकाने कर्ज वेळेवर भरले नाही तर अकाउंट लगेच अनुउत्पादक म्हणून गणले जाते. याउलट स्मॉल  फायनान्स बँकांचे सगळे ग्राहक पैसे परतफेड न करण्याची शक्यता कमी असते परिणामी कर्ज अनुत्पादकतेचे प्रमाणही कमी असते. 

२. स्मॉल फायनान्स बँकांचा नफा जास्त असतो-

  • उदा : एखाद्या आर्थिकदृष्ट्या कमजोर ग्राहकाला फक्त  रु. ५,००० ची आवश्यकता आहे. मोठ्या बँकांमध्ये इतके कमी कर्ज देतानाही खूप कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. वैतागून ग्राहक खाजगी सावकारांकडे वळतो. येथे स्मॉल फायनान्स बँका ग्राहकाला मदतीला येतात. 
  • रु. ५,००० ची सहा महिन्याची परतफेड  करून घेताना या बँक व्याजासहीत रु. ५,५०० स्वीकारतात. येथे मुद्दलावर रु. ५०० इतके म्हणजे चक्क २०% दराने व्याज ग्राहकाने बँकेला उत्पन्न म्हणून दिले आहे. 
  • रु.५००० कर्ज म्हणून घेतले व परतफेड रक्कम रु. ५५०० आहे असे साधे, सोपे  गणित ग्राहकाच्या डोक्यात असते. व्याजाचा दर थोडा अधिक असला, तरी त्याला फरक पडत नाही कारण योग्य वेळी, कमीत कमी कागदपत्रात त्याची पैशाची गरज स्मॉल फायनान्स बँकेद्वारे भागलेली आहे.
  • इतके जास्त ग्राहक आहेत म्हणजे जोखीम जास्त असेल असे तुम्हाला वाटेल. दुसऱ्याला कर्ज देण्याचा व्यवसाय कायमच प्रचंड जोखमीचा असतो. त्यामुळेच आरबीआय च्या निगराणीतही निरव मोदी – पंजाब नॅशनल बँक, पीएमसी बँक असे होतात. 
  • मोठ्या लोकांपेक्षा सामान्यजन कर्ज बुडवेपणाचा आपल्या इभ्रतीला बट्टा लागायला नको म्हणून शक्यतो कर्ज परतफेड करतातच हा सार्वत्रिक अनुभव आहे. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) पुढील प्रकारची कर्ज देते-

  • शेती व अनुषंगिक व्यवसायांसाठी कर्ज
  • पटवडणाऱ्या घरांसाठी कर्ज
  • लघुवित्त कर्ज
  • वैयक्तिक कर्ज
  • बचत गटांसाठी कर्ज
  • वाहन कर्ज
  • लघु उद्योगांसाठी कर्ज

याव्यतिरिक्त USFB मध्ये ग्राहक बचत खाते, करंट खाते, मुदत व इतर ठेव खाते उघडू शकतात. याद्वारे कर्ज देण्यासाठी रक्कम उभी राहते.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक अनेक  वैविध्यपूर्ण सेवा देते. यामध्ये आधार एनरोलमेंट सेंटर, इतर कंपन्यांचा विमा विक्री, एटीएम व डेबिट कार्ड पुरवठा, दुकानदारांना क्रेडिट व डेबिट कार्ड स्वाईप करण्यासाठी पॉईंटऑफ सेल टर्मिनल देणे समावेश होतो.

  • उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करते. ग्रामीण भागाचा आणि आपल्या ग्राहकांचा विचार करून व्यवहारांसाठी बँकेचे ऍप स्थानिक भाषांमध्ये सुद्धा आहे 
  • नवीन ग्राहकाचे खाते उघडताना टॅब वापरून कागदपत्रे व माहिती गोळा करून फक्त मिनिटांत खाते उघडले जाते. कर्ज मंजुरीसुद्धा डिजिटल पद्धतीने वेगाने करण्याचा उज्जीवनचा प्रयत्न असतो. याचबरोबर एटीम केंद्रे, एसएमएस बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सेवा डिजिटल माध्यमातून जातात.

आयपीओ बाबत –

  • या आयपीओच्या शेअर्ससाठी प्राईस बँड (Price Band) रु. ३६ ते रु. ३७ इतका ठेवला आहे. 
  • किमान ४०० शेअर्स साठी मागणी नोंदवणे आवश्यक आहे म्हणजे कमीतकमी रु. १४,८०० तुम्हाला या ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करावी लागेल. 
  • आयपीओ नंतर कंपनीचे एकूण बाजारमूल्य रु.६४०० कोटींच्या आसपास असेल. 
  • प्रवर्तकांचा कंपनीमध्ये हिस्सा आयपीओ नंतर ८3% पर्यंत असणार आहे. जेवढा प्रवर्तकांचा कंपनीमध्ये हिस्सा जास्त तितका कंपनीवरचा शेअर बाजाराचा विश्वास जास्त असतो.   

उज्जीवनचे आर्थिक निकाल पुढीलप्रमाणे आहेत :

तपशील ३१ मार्च २०१९

( १२ महिने )

३० सप्टेंबर २०१९

( ६ महिने )

एकूण उत्पन्न  रु. २०३८ कोटी रु. १४३५ कोटी
करोत्तर नफा  रु. १९९ कोटी रु. १८७ कोटी
एकूण मालमत्ता  रु. २०३८ कोटी रु. २०३८ कोटी
अनुत्पादक मालमत्ता % 

(NPA = Non Performing Assets)

०.२६%  ०.३३%

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे सविस्तर आर्थिक निकाल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उज्जीवन आयपीओ मध्ये गुंतवणुकीसाठी जमेच्या बाजू:

  • अनुभवी व्यवस्थापन
  • चांगली कर्जरूपी मालमता:- अनुत्पादक कर्जाचे प्रमाण इतर स्मॉल बँकांच्या  तुलनेने कमी आहे.
  • मोठा ग्राहक वर्ग:- भारतभर व्यवसायवृद्धीच्या संधी 
  • तुलनेने कमी किमतीला उपलब्ध होऊ शकणारा शेअर. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा रु. ३७ ला असणारा शेअर २.५ या प्राईस-बुक व्हॅल्यू रेशोमध्ये उपलब्ध आहे. इतर AU Finance वगैरे कंपन्यांपेक्षा हा रेशो बराच कमी आहे.      

उज्जीवन आयपीओ मध्ये गुंतवणुकीसाठी जोखमीच्या बाजू:

  • बँक म्हणून व्यवसायाचा कमी अनुभव 
  • आर्थिक मंदीमुळे अनुत्पादक कर्जे वाढू शकतात
  • व्यवसाय वाढीसाठी आवश्यक भांडवल भविष्यात उभे करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात   
  • समूह कर्ज प्रकरणांवर व्यवसायाचे जास्त अवलंबित्व आहे. दृश्य तारण नसल्याने भविष्यात वसुलीस अडचणी येऊ शकतात.  

अधिक अभ्यास करण्यासाठी काही नामवंत ब्रोकर्सचे रिसर्च रिपोर्ट्स पुढीलप्रमाणे आहेत:

  • HDFC Securities : डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
  • Angel Broking : डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
  • ICICI direct : डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

(या लेखमालेतील कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच या कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात माहिती दिलेल्या कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:  https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…