भारत विरुद्ध चीन
भारत आणि चीन हे आशिया खंडातील सर्वच क्षेत्रात मोठे मानले जाणारे दोन देश आहेत आणि दोन्ही देशांची लोकसंख्याही जगात सर्वांत अधिक आहे. दोघांचीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त स्थान मिळवण्यासाठी सतत चढाओढ सुरु असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या Be vocal For Local म्हणजेच स्वदेशी वस्तू खरेदी करण्याच्या आवाहनाला समस्त भारतीयांनी गांभीर्याने घेतलेच आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतून चिनी वस्तूंचे प्रभुत्व कमी करण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यांनतर चीनने भारतावर केलेल्या हल्ल्यामुळे भारतीय नागरिकांच्या चीनविरोधी भावनांचा उद्रेक झाला. भारतीयांचा चिनी वस्तुंना बहिष्कार घालण्याचा निर्धार पक्का झाला असला तरी प्रत्यक्षात ते सहजी शक्य आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे.
स्वावलंबी भारत ! २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेजची पंतप्रधान मोदींची घोषणा…
भारत विरुद्ध चीन –
- चीनची अर्थव्यवस्था सर्वांत जास्त अवलंबून आहे ती कारखानदारीवर, तर भारताची अर्थव्यवस्था ही सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे.
- चीन तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर असल्याने तिथे वस्तुनिर्मितीवर होणारा खर्च भारतापेक्षा तुलनेने कमी असतो आणि बऱ्याच गोष्टींमध्ये ऑटोमेशन असल्याने कामाच्या पूर्ततेतील गती आणि अचूकताही जास्त दर्जेदार असते.
- काम करणाऱ्या लोकांमध्ये २०१७ साली चीनमध्ये स्त्रियांची टक्केवारी होती ६१.८४% तर तीच टक्केवारी भारतात मात्र होती फक्त २३.८% !
- चीन हा कष्ट करणाऱ्या लोकांचा देश आहे असे म्हणल्यास गैर ठरणार नाही. कारण चीनमधील आणि भारतातील अगदी आत्ताची म्हणजे २०२० मधील बेरोजगारीची टक्केवारी पाहायची तर चीन आहे ४.३%, तर भारत त्याच्या आसपासही नाहीये, म्हणजे भारताची बेरोजगारीची टक्केवारी आहे २४% !
- भारताला जर भविष्यात महासत्ता व्हायचे असेल, तर या सर्व गोष्टींचा विचार करावाच लागेल.
- एक गोष्ट मात्र अगदी लक्षात घेण्यासारखी आहे की भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढीचा दर २०१४-१५ साली बरोबरीचा झाला आणि त्यानंतर मात्र तो वाढतच आहे.
- जवळ जवळ सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या चीनची बाजारपेठ, आर्थिक उलाढाल मात्र अत्यंत अस्थिर आहे, त्यामानाने भारताची आर्थिक परिस्थिती तुलनात्मकदृष्ट्या बरीच स्थिर आहे.
सकल राष्ट्रीय उत्पन (GDP) म्हणजे काय?…
भारत आणि चीन – सामाजिक प्रगती, त्यांची एकूण कार्यक्षमता, व्यावसायिक महत्व –
(Ref: https://bit.ly/2YY5m4B )
भारत | चीन |
---|---|
सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) – विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळाचा आढावा | |
|
|
लोकांचा विविध क्षेत्रांमधील सहभाग | |
भारतामध्ये ३ मुख्य क्षेत्रे आहेत:
१. शेती: ४९% २. कारखानदारी: २०% ३. सेवा क्षेत्र: ३१% |
चीनमध्ये या क्षेत्रांमध्ये लोकांचा सहभाग आहे पुढीलप्रमाणे:
१. शेती: ३३.६% २. कारखानदारी: ३०.३% ३. सेवा क्षेत्र: ३६.१% |
सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) दरानुसार निर्यातीची टक्केवारी | |
२००५-०६ मध्ये भारताची या क्षेत्रातली टक्केवारी होती २१.३% आणि २०१७ मध्ये होती १९.५% | या बाबतीत चीनची सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) दरानुसार निर्यातीची टक्केवारी २००६-०७ मध्ये ३६% होती आणि २०१७ मध्ये १९.७% होती. |
दरवर्षी नोंदवल्या जाणाऱ्या पेटंट्स ची संख्या | |
भारत मात्र या स्पर्धेत ग्राह्याही धरता येणार नाही इतका मागे आहे. म्हणजेच २०१७ मध्ये भारतीय पेटंट्सची संख्या १४,९६१ इतकीच आहे. | २००० ते २००८ पर्यंत यामध्ये अमेरिका अग्रेसर होता पण त्यानंतर चीनमधून नोंदवल्या जाणाऱ्या पेटंट्सच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे आणि २०१७ मध्ये चीनचे १२,४५,७०९ पेटंट्स नोंदवले गेले आहेत आणि दरवर्षी या संख्येत वाढच होताना दिसते आहे. |
वरील फरकाचा तक्ता पाहता चीनला मागे टाकण्यासाठी आपल्याला आपला वेग आणि दर्जा दोन्हींवर कसून मेहनत घ्यावी लागणार आहे. भारताला महासत्ता होण्यासाठी हे खूप मोठे आव्हान आहे.
Patents Filed in India vs China
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies