Reading Time: 2 minutes
  • म्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमेच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घेणे आवश्यक आहे.
  • Mutual fund investment are subject to market risk,  read all scheme related documents carefully before make investments.  या संबंधीची माहिती नेमकी कोणती असते? ते आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे.
  • ही माहिती तीन प्रकारात विभागलेली असते-

     १. योजनेचे  माहितीपत्रक (Scheme information document)

     २. योजनेचे पूरक माहिती पत्र (Statement of additional information)

     ३. महत्वाच्या माहितीचे माहितीपत्र (Key information memorandum)

        या सर्वांविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

१. योजनेचे माहितीपत्रक (SID):

  • यामध्ये फंड योजनेची विस्तृत माहिती दिलेली असते. यात कोणती माहिती असणे जरुरीचे आहे. यासंबंधी सर्व  म्युच्युअल फंडाची ‘स्वयंशिस्त संघटनेच्या (Association of Mutual Fund in India)’ मागदर्शक तत्वानुसार दिलेली असते.
  • ही माहिती अनेक छोटे मोठे मुद्दे विचारात घेऊन दिलेली असते आणि विस्तृतपणे असल्याने अनेकपानी असू शकते. यात पहायची असलेली महत्वाची माहिती म्हणजे:-
    • योजनेची उद्दिष्टे, गुंतवणूक ध्येये त्याची तत्वे, त्याप्रमाणे विविध पद्धतीने करायच्या गुंतवणुकीचे प्रमाण.
    • फंड हाऊसचा मागील लेखाजोखा आणि गुंतवणुकीचे विविध पर्याय.
    • फंड व्यवस्थापन करणारी टीम, त्यांचे प्रमुख, त्यांचे शिक्षण या क्षेत्रातील अनुभव.
    • व्यवस्थापन खर्च, पैसे लवकर काढून घेतले तर पडणारे अतिरिक्त शुल्क, गुंतवणूक काढून घेण्याची पद्धत.
    • धोका व्यवस्थापन किंवा त्यासंबंधीचीच्या उपाययोजना.
    • करपात्रता, मुळातून करकपात याची माहिती.

२. योजनेचे पूरक माहितीपत्र (SAI):

  • फंड योजनेच्या उद्दिष्टांमध्ये काही बदल झाल्यास त्याची सर्वं माहिती या पत्रात असते.
  • ही माहिती गुंतवणुकांदाराच्या दृष्टीने नेहमीच उपयोगी असते असे नाही. परंतु अशी माहिती जाहीर करणे कायद्याने आवश्यक आहे.
  • फंडाची रचना, त्यांच्यावर चालू असलेली कायदेशीर कारवाई या विषयी सर्व माहिती यात दिलेली असते. SID मध्ये ही माहिती थोडक्यात विषद केली असेल तर ती अधिक विस्तृतपणे या पत्रात असते.

३. महत्वाच्या माहितीचे माहितीपत्र (KIM):

  • ते पत्र म्युच्युअल फंडाच्या अर्जासोबत असणे जरुरीचे असून यामध्ये गुंतवणूकदारांच्या दृष्टीने SID आणि SIA यातील अत्यावश्यक माहिती दिलेली असते.
  • थोडक्यात हे पत्र म्हणजे वरील दोन्ही गोष्टींचा सारांश असतो.
  • याशिवाय एखादया गुंतवणूकदाराने मागणी केल्यास म्युच्युअल फंडाच्या पुरस्कर्त्यांना सदर माहिती गुंतवणूकदारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे बंधन त्यांच्या एसेट मॅनेजमेंट कंपनीवर आहे.
  • सजग गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक करण्याचे निर्णय आपल्या एजंटशी चर्चा करणे आवश्यक आहे. फार मोजकेच गुंतवणूकदार आणि त्यांचे अभिकर्ते याविषयी एकमेकांशी चर्चा करतात.
  • गुंतवणूक, मग ती  कोणाही मार्फत अथवा ऑनलाईन केली तरी ती करतांना किमान खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे-
    • गुंतवणुकीचा हेतू: आपण ज्या अपेक्षेने गुंतवणूक करणार आहोत, ती अपेक्षा पूर्ण करणारी योजना आहे ना? हे पहावे.
    • फंड मॅनेजर: या फंडाचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती, तिची शैक्षणिक पात्रता आणि फंड व्यवस्थापनाचा अनुभव.
    • पूर्वइतिहास: फंड हाऊसच्या अन्य योजना, त्यातून मिळालेला उतारा.
    • जोखीम: गुंतवणुकीतील धोका, त्यावरील उपाययोजना.
    • विविध खर्च: जसे योजनेत भाग घेण्याची फी ( Entry load), योजनेतून बाहेर पडण्याची फी (Exit load), व्यवस्थापन फी (Fund Management Charges), कर आकारणी.
    • गुंतवणूक मर्यादा: कमाल व किमान गुंतवणूक मर्यादा, गुंतवणूक काढून घेण्याची मर्यादा.

 

– उदय पिंगळे

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Jzradt )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…