लॅपटॉप खरेदी
लॅपटॉप खरेदी करताना अनेक जण गोधळतात. यात अनेकांना फार साधी कामे करायची असतात. गरज नसली तरी उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो. वस्तूत: ही ताकद कधीही वापरली जात नाही किंवा फार क्वचित वापरली जाते. अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो, वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो. आज अतिशय मागणी वाढल्याने आणि चीनमधून पुरवठा बराच कमी झाल्याने नवीन आणि जुन्या लॅपटॉपच्या किंमती फार वाढल्या आहेत. आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे.
लॅपटॉप खरेदी करताना-
- इंटेलचे आय सिरीजच्या जुन्या प्रोसेसरचे लॅपटॉप ही आय सिरीजचे आहेत म्हणून विकले जातात, यातील काही फार जुने असतात.
- एक उदाहरण म्हणजे थर्ड जनरेशनच्या आय 3 प्रोसेसर हे सन 2012 ला लाँच झाले होते आणि सन 2014 पर्यंत विकले जात होते. फार फार तर सन 2015 पर्यंत – म्हणजे हे 5 वर्षे जुने लॅपटॉप आहेत.
- आता नवीन बेसिक प्रोसेसर – जसे की नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशनच्या आय 3/ आणि काही आय 5 पेक्षा पॉवरफुल आहेत आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत.
बहुसंख्य लोकांची कॉम्प्युटर/ लॅपटॉपवर काय कामे असतात-
- इंटरनेट ब्राउजिंग – फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही. यात पण मी असे सांगेन की बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल, तर गुगल क्रोम वापरू नका.
- व्हिडीओ कॉल – झूम वगैरे – यालाही फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त, पण काम चालून जाते
- व्हिडिओ बघणे (व्हीलसी वगैरे)
- गाणी ऐकणे
वरील कामासाठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही, बरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवरवर चालतात. अनेक प्रोग्रामिंगच्या युटीलिटीही फार कमी प्रोसेसिंग पॉवरवर सहज चालतात. त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल
लॅपटॉप विकत घेताना या गोष्टी बघा-
प्रोसेसर –
- इंटेलची आय सिरीज चांगली आहे, पण अगदी सगळ्यात बेसिक आय 3 हा प्रोसेसर हा साध्या कामासाठी फार जास्त होतो, त्याचप्रमाणे आता किमतीही वाढल्या आहेत.
- इंटेलने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत. पेंटिअम मध्ये ही गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत (quad core – 4 cores)
- एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत यात AMD A6 / A8 / A9 / A10 / A12 हे बरेच चांगले आहेत
- स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत. खरे तर ते ही चालून जावेत, हे प्रोसेसर म्हणजे
- Intel Atom
- Intel Celeron
- Amd Sempron (mostly discontinued)
स्क्रीन साईज –
- लॅपटॉप फार बाहेर नेण्याची गरज नाही तर 15.5 इंची स्क्रीन चा घ्यावा. ही सर्वात पॉप्युलर साईझ आहे, हे लॅपटॉप तुलनेने स्वस्त आणि जड असतात. पण स्क्रीन तुलनेत मोठी असते.
- सिनिअर सिटीझन / विद्यार्थीसाठी चांगले.
रॅम –
- रॅम हे कमीत कमी 4 जीबी पण शक्यतो 8 जीबी घ्या.
- रॅम हे डीडीआर 4 प्रकारचेच घ्या. डीडीआर 3 रॅम जुने तंत्रज्ञान आहे आणि ते स्लो असते.
- बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये 4 जीबी रॅम असते, तर अनेक लॅपटॉप मध्ये रॅम वाढवता येते.
- फक्त एक रॅमचा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा. तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा.
हार्ड डिस्क –
- हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या. तिने चांगला स्पीड मिळतो पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो.
- साधारण 240 जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल. त्याला बदलण्याचा आणि त्यावर विंडोज परत लोड करण्याचा चार्ज किती ते विचारा.
- जुनी हार्ड डिस्क केसिंग मध्ये घालून एक्स्टर्नल हार्ड डिस्क म्हणून वापरता येईल.
बेसिक लॅपटॉप साठी सुचवलेले स्पेसिफिकेशन
- Processor – Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10 *
- Ram – 8GB DDR 4 **
- Hard Disk – Preferred SSD or 1 TB of hard disk
- Screen – 15.5 Inch
- जर कीबोर्डवर नंबर पॅडची सवय असेल, तर नंबर पॅड आहे का ते बघा.
अजून काही सूचना-
- घाईघाईत लॅपटॉप घेणे टाळा. आपल्या गरजा जाणून मार्केटचा अभ्यास करा, लोकांशी बोला. काही वेळा आपल्यासारखे काम करणाऱ्या लोकांशी बोला.
- ऑनलाईन घेत असाल, तर 1/2 आठवडे किमती ट्रॅक करून मग निवड करा.
- मोठ्या ऑनलाईन साईट – ॲमेझॉन / फ्लिपकार्ट / टाटा क्लिक / रिलायन्स तसेच कंपनीच्या अधिकृत साईट्स, क्रोमा, रिलायन्स यासारखी मोठी दुकाने, साधी दुकाने इकडे शोध घ्या.
- लॅपटॉपला वाढीव वॉरंटी घेता येते. सर्वसाधारणपणे वॉरंटी 1 वर्षे असते, ती पैसे देऊन 2 ते 3 वर्षे काही वेळा 4 वर्षे ही करता येते. याचे ₹ 4 ते 6 हजार अधिक पडतात पण काही वेळा प्रमोशन ऑफरमध्ये ₹ 1 हजार मध्येही मिळते.
- काही कंपनी विमाही देतात त्याच्या अटी बघून विचार करा.
- हल्ली फार कमी लॅपटॉप विंडोज 10 शिवाय मिळतात आणि त्याची किंमत कमी दिसते . जर विंडोज 10 वर काम करायचे असेल, तर असले लॅपटॉप घेऊ नका कारण बऱ्याचदा ₹ 2 ते 3 हजार फारकत अधिकृत विंडोज 10 मिळते आणि ते इंस्टॉल करायची कटकट नसते.
- लॅपटॉपसाठी चांगली बॅग / स्लीव्ह, साफ करायला मायक्रो फायबर कपडा, पाहिजे ते स्क्रीन गार्ड या गोष्टी जरूर घ्या.
यावरून आपणास आपल्या सर्वसामान्य गरजेसाठी लॅपटॉप सहन शोधता येईल अशी आशा करतो.
– हेमंत वाघे
98197 47718
(श्री. हेमंत वाघे हे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असून ते हाय एन्ड एन्ड इलेक्ट्रॉनिक्सला वाहिलेली http://hifihunt.com/ही वेबसाईट चालवतात. तसेच नोकरी शोधायला लोकांना मदत व्हावी म्हणून https://huntmyjob.in/ हीसाईट आणि सर्व्हिस सुरु करीत आहेत.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies