Digital Transactions : ऑनलाईन पेमेंट करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Reading Time: 2 minutes

Digital Transactions

१. कार्ड सेव्ह करू नका: 

 • ऑनलाईन खरेदी करताना अनेकजण डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात. याचं मुख्य कारण म्हणजे संबंधित कार्डवर मिळणाऱ्या विविध ऑफर्स.
 • खरेदी करताना Save card for future अथवा save card details अशा प्रकारच्या पर्यायावर असणारी टिकमार्क काढून टाकायची विसरतात अथवा पुढे कार्ड डिटेल्स भरायचा त्रास वाचण्यासाठी जतन करतात. परंतु, हे टाळले पाहिजे. कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो.
 • याचबरोबर  ब्राउझरमध्ये असणारी ऑटोफिल सुविधा देखील बंद करायला हवी. यामुळे कदाचित सर्व माहिती भरण्याचे कष्ट करावे लागतील परंतु ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित होतील.

२. फसव्या लिंकवर क्लिक न करणे 

 • अनेकदा बँक, क्रेडिट कार्ड किंवा इंश्युरन्स कंपनीकडून एखादे महत्वाचे मेल येते. त्यामध्ये एखादी ऑफर किंवा केवायसी संबंधित माहिती विचारली जाते. संबंधित विषयाच्या अधिक माहितीसाठी अथवा ऑफर मिळविण्यासाठी त्यामध्ये एक लिंक दिली जाते.
 • सवलत देणाऱ्या जाहिरातींकडे आपण लगेच आकर्षित होतो पण लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान! हा फिशिंगचा प्रकार असू शकतो.
 • ही मेल फसवी असू शकतात. त्यामुळे कोणत्याही मेलमध्ये आलेली लिंक क्लिक करण्यापूर्वी संबंधित मेल अधिकृत बँक अथवा कंपनीकडून आल्याची खात्री करून घ्या.  सर्वात सोपा मार्ग म्हणजे लिंकवर क्लिक करण्याऐवजी ती कॉपी करून ब्राउझर मध्ये पेस्ट करून बघा. जर लिंक अधिकृत नसेल तर ती ओपन होणार नाही.
 • सर्वात उत्तम पर्याय म्हणजे संबंधित ऑफर अथवा अन्य माहितीसंदर्भात आपल्या बँकेकडे चौकशी करा.

विशेष लेख: सायबर सुरक्षा – इंटरनेट वापरताना कुठे क्लीक करताय ?

 

३. ओटीपी आणि क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्या: 

 • वन-टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी कोणालाही सांगू नका. बँक अथवा कोणतीही वित्तीय संस्था तुम्हाला कधीही ओटीपी विचारत नाही.
 • त्याचप्रमाणे क्यूआर कोड स्कॅन करतानाही आवश्यक ती काळजी घ्या. खात्रीशीर दुकानांमध्येच  क्यूआर कोड स्कॅन करा.
 • इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलताना बहुतांश बँका अथवा वित्तीय संस्था ‘ओटीपी’ची सुविधा देतात, म्हणजेच केवळ ओटीपीच्या आधारे नेटबँकिंगचा पासवर्ड बदलता येतो. त्यामुळे ओटीपी मिळताच हॅकर तुमचा पासवर्ड बदलून तुमचे बँक खाते ताब्यात घेऊ शकतो.
 • याचबरोबर काही क्यूआर कोड स्कॅन केल्यास तुमच्या बँक खात्याचा तपशील हॅकरच्या ताब्यात जाऊ शकतो. त्यामुळे अनोळखी व संशयित वाटणारा क्यूआर कोड अजिबात स्कॅन करू नका.

 

 • ओटीपीचा वापर करा :

ऑनलाइन पेमेंट करताना तुमच्या OTP साठी 10 सेकंद थांबावे लागणे गैरसोयीचे असू शकते. तथापि, ही ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात सुरक्षित प्रमाणीकरण पद्धतींपैकी एक आहे. ऑनलाइन पेमेंट करताना, तुमचे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी OTP चा वापर करा. तुमचा OTP कधीही कोणाशीही शेअर करू नका हे लक्षात ठेवा.

बायोमेट्रिक पध्दतीचा वापर करा:

बहुसंख्य फिनटेक अॅप्स हळूहळू बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमध्ये बदलत आहेत, 4-अंकी किंवा 6-अंकी पिनवर अवलंबून राहणे कमी करत आहेत. जेव्हा डिजिटल पेमेंट करताना यूजर्स व्हेरिफिकशन  वापरकर्त्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी अखंड फिंगरप्रिंट स्कॅनिंगला समर्थन देणारे स्मार्टफोन वापरण्याची शिफारस केली जाते.

हेही वाचा – Digital Transactions: डिजिटल व्यवहार करताना या ३ गोष्टींची काळजी घ्या अन्यथा गमावाल सर्व पैसे

ऑनलाईन बँकिंग ही सुविधा आहे आणि तिचा वापर जर योग्यप्रक्रारे केला तर यामुळे तुमचा वेळ आणि श्रम दोन्हीही वाचू शकतात. परंतु, तुमची एक चूक तुमची आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा सुरक्षित राहा.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.