फसव्या योजना कशा ओळखाल?

https://bit.ly/2Egcizr
0 1,086

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे / परतव्यामागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.

विचार न करता दिसणाऱ्या मृगजळाला भाळू नका. “पुढच्यास ठेच, मागच्यास शहाणपण”, ही म्हण आपल्याकडे उगाच प्रचलित नाही. चुका तर प्रत्येकजण करतो, पण एकदा झालेली चूक निदान त्या माणसाने पुन्हा करू नये.  तसेच याबाबत इतरांनीही मार्गदर्शन करावे, जेणेकरून ती चूक इतरांकडून होणार नाही. हीच गोष्ट गुंतवणुकीसही लागू होते.

एखादी फसवी योजना कशी ओळखावी, याची काही पुस्तकी व्याख्या अथवा लिखित नियम नाही. पण प्रत्यक्षात घडलेली उदाहरणं मात्र नक्कीच आहेत आणि त्यातून आपण शिकलं पाहिजे. आकर्षक व्याजदर असं सांगून १४-१५ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर किंवा अगदीच कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याच्या गोष्टी कोणीही उदारपणे इतरांसाठी करत नाही. किंबहुना हे अशक्यच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा जगातला कुठलाही माणूस स्वतःच नुकसान करून घेऊन, दुसऱ्याचा फायदा करून देत नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी पुढील गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःच्याच हातून होणारे स्वतःचे आर्थिक नुकसान टाळा.

संपूर्ण माहिती-

फिर हेरा फेरी चित्रपट कोणी पहिला असेल तर बिपाशाने अक्षयकुमार, सुनीलशेट्टी आणि परेश रावलला घातलेला गंडा आठवा. अशी फसवणूक करणारी माणसे / संस्था / ऑफिसे आपल्या आजूबाजूला असू शकतील. ज्या पर्यायात किंवा योजनेत गुंतवणूक करायची असेल, त्या पर्यायाची किंवा योजनेची आणि संबंधित संस्थेची / बँकेची /ऑफिसची; तसेच ती योजना ऑफर करणाऱ्याची संपूर्ण माहिती मिळवा. आजवरच्या त्यांच्या योजनांचा इतिहास पहा, लोकांचा त्यातला अनुभव तपासा. हे सगळं समजून घेऊन, नीट विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय निश्चित करा. गरज वाटल्यास आर्थिक सल्लागारचा सल्ला घ्या.

उत्तम परतावा –

एखादी योजना फसवी असण्याचं पहिलं लक्षण म्हणजे  उच्च  परतावा. कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आणि पारदर्शक कार्यपद्धती सिद्ध न करणे,  परताव्याबद्दलचा अतिआत्मविश्वास,  अव्वाच्या सव्वा परतावा मिळण्याची खात्री, तसेच इतर सरकारी योजनांशी अथवा खात्रीशीर योजनांशी तुलना करून त्यापेक्षा जास्त परतावा मिळण्याची वारंवार हमी देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा.

रोख व्यवहार

शक्यतो अशा योजना रोख रकमेचे व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. गुंतवणूक करताना रोखीचे व्यवहार करण्यापेक्षा शक्यतो ऑनलाईन किंवा चेकनेच व्यवहार करा. कारण चेक किंवा ऑनलाईन व्यवहारांची नोंद आपल्याबरोबर बँकेकडेही असते. फसवणूक  झाल्यास संबंधित प्रकरणात दाद मागण्यासाठी, हा अधिकृत पुरावा म्हणून गृहित धरला जाऊ शकतो.

शे्अर बाजारातील खात्रीशीर परतावे

इक्विटी किंवा डेरिवेटीव्ह मार्केटमधून खात्रीशीर आणि उत्तम परतावा मिळवून देण्याची भाषा करणाऱ्या कोणत्याही लिखित अथवा तोंडी वचनांना आजिबात बळी पडू नका.  अशी वचने  खरी असती, तर आज कोणालाही शेअर बाजारामधील गुंतवणुकीची आणि त्यातल्या संभाव्य धोक्यांची इतकी भीती वाटली असती का? हा विचार करा. स्टॉक ब्रोकर म्हणजेच दलालांशीही रोख पैशात व्यवहार करू नका.

धोके –

फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) प्रकारात बरीच जोखीम असते. अश्या पर्यायात गुंतवणूक करण्याआधी त्या पर्यायाची आणि धोक्यांची  संपूर्ण माहिती घ्या.

सेबीअंतर्गत नोंदणी

कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेताना संबंधित योजना किंवा योजना देऊ करणारी संस्था ‘सिक्यूरिटीज अँड एक्स्चेन्ज बोर्ड ऑफ इन्डिया’ अर्थात सेबी (SEBI) या भारतातील आर्थिक सुरक्षिततेचे नियमन करणाऱ्या सरकारी संस्थेअंतर्गत नोंदणीकृत आहे का, हे सर्वप्रथम तपासा.

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे,

श्रीमंत मी होणार!,

फसव्या विमा पॉलिसींचा सापळा,

गुंतवणूकीचे मृगजळ: हिरा ग्रूप घोटाळा

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.