करूया भारतीय क्षमतांचा जागर…!

Reading Time: 4 minutesएक देश आणि समाज म्हणून आपण कोठे कमी पडतो, याचा विचार केलाच पाहिजे, पण सततच्या आत्मवंचनेमुळे हा देश आणि समाज किती वाईट आहे, हेच आपण आपल्या भारतीय मनावर बिंबवत आहोत का? आपण आपला देश आणि समाजात असेलल्या प्रचंड क्षमतांचा विचार करून, त्यातून पुढे जाण्याच्या प्रयत्नांना चालना दिली पाहिजे. 

शेअर बाजार अर्थव्यवस्थेच्या पुढे का पळतो आहे?

Reading Time: 4 minutesभारतात वस्तूंची कमी झालेली मागणी आणि त्याच वेळी शेअर बाजाराची आगेकूच हे परस्परविरोधी वाटत असले तरी त्याचा आणि नव्या आर्थिक बदलांचा जवळचा संबंध आहे. काही मोठ्या कंपन्या याच काळात अतिशय चांगला महसूल मिळवीत आहेत तर छोट्या कंपन्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? 

Economy: अर्थव्यवस्था – रोखीची की डिजिटल?

Reading Time: 4 minutesअर्थक्रांती मांडण्यासाठी कोणत्याही व्यासपीठावर गेले की अर्थव्यवस्था (Economy) आणि नोटबंदीविषयीचे प्रश्न अजूनही हमखास येतात. अधिक मूल्यांच्या नोटांनी भारतात जो गोंधळ घातला होता, तो आपल्या देशाच्या हिताचा नव्हता, हे बहुतेक नागरिकांना समजले आहे. मात्र हा बदल एवढा मोठा आहे की देश त्यात गेले तीन वर्षे ढवळून निघाला आहे.

बजाज फायनान्स- मंदीमधली संधी

Reading Time: 3 minutesभारतीयांची क्रयशक्ती कमी आहे, पण लोकसंख्येचा बोनस घेतला तर त्यात प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता ओळखणारे मंदीच्या वातावरणात चांगला व्यवसाय करत आहेत. सर्वसामान्यांना सोबत घेतल्यास आजच्या आर्थिक वातावरणात मोठा बदल होऊ शकतो. ती क्षमता आपण एक समाज म्हणून कधी ओळखणार आहोत? 

बिल गेट्स आणि जेफ बीजोस भारतावर प्रसन्न का आहेत?

Reading Time: 3 minutesजगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स आणि ॲमेझानचे मालक जेफ बीजोस भारतीय अर्थव्यवस्था, भारताची क्षमता आणि भारतातील संधी याविषयी प्रचंड आशावादी असताना आपला भारताच्या ‘ग्रोथ स्टोरी’वर विश्वास का नाही? ती ओळखण्यात आणि जागतिकीकरणाचा अपरिहार्य पुढील टप्पा स्वीकारण्यास आपण कमी पडत आहोत का ? 

सोन्याच्या साठाविषयक माफी योजना का आली पाहिजे?

Reading Time: 3 minutesदेशातील निम्म्या संपत्तीची नोंदच नसेल तर देशाचे आर्थिक व्यवस्थापन कसे होईल? आपल्या देशातील प्रचंड सोन्याच्या साठ्याचे तसेच झाले आहे. हा साठा अधिकृत संपत्तीचा भाग व्हावा आणि त्याचा न्याय्य कर सरकारला मिळावा, यासाठी सोन्याच्या रूपातील संपत्ती जाहीर करण्याची माफी योजना लवकरच येणार, याचा सरकारने इन्कार केला असला तरी ती नजीकच्या भविष्यात का आली पाहिजे आणि नागरिकांनी तिचे स्वागत का केले पाहिजे, हे समजून घेतले पाहिजे. 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

Reading Time: 4 minutesसरकारी उद्योग, व्यवस्था कार्यक्षम नाहीत, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या विश्वासार्ह आहेत. आणि खासगी कंपन्या जेवढ्या कार्यक्षम आहेत, तेवढ्या त्या विश्वासार्ह नाहीत! खासगीकरणाचे लोण जगभर आणि भारतात वेगाने पसरत असताना हे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. खासगीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असताना त्याच्या अपरिहार्य रेट्यात भारत यापुढे कोणता मार्ग निवडतो, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.  

लक्ष्मी शुद्ध व्यवहार करणाऱ्यांचे घर शोधते आहे..!

Reading Time: 4 minutesतरुण, आधुनिक भारतीय समाजाला पोटापाण्याच्या प्रश्नांमधून बाहेर पडायचे आहे, कारण त्याच्या जगण्याविषयीच्या आशाआकांक्षा आता प्रचंड विस्तारल्या आहेत. त्याला आता समृद्ध आणि आनंदी आयुष्य जगायचे आहे. तसे ते जगण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे शुद्धीकरण अपरिहार्य आहे. ती अपरिहार्यता लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अधिकाकाधिक भारतीयांनी समजून घेतली पाहिजे.  

आजची ‘मंदी’ आणि धोरणात्मक बदलांची संधी!

Reading Time: 6 minutesजीवनाचा प्रचंड वाढलेला वेग, कागदी नोटांच्या चलनाच्या आधारे मोजक्या लोकांकडे जमा झालेले राक्षसी भांडवल आणि जागतिकीकरणाच्या रेट्याने संघटीत होणारे उद्योग व्यवसाय ज्या प्रकारचा बदल आज जगात घडवून आणत आहेत, त्याचेच दुसरे नाव मंदी आहे. पण मंदीच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा हा बदल समजून घेण्यात आणि त्यानुसार आपल्यात बदल करण्यातच शहाणपणा आहे. कारण जगात होऊ घातलेला बदल कोणीच रोखू शकलेले नाही! 

पिक विमा योजनांचे महत्व

Reading Time: 4 minutesपिक विमा योजनेविषयी उलटसुलट चर्चा होत असली तरी शेतकऱ्यांना संकटात आधार देण्याची त्यातल्या त्यात व्यवहार्य अशी जगात मान्य असलेली ती पद्धत आहे. त्यामुळे अशा योजनांतील त्रुटी दूर करताना शेतकरी अशा योजनांपासून दूर जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली पाहिजे.