शेअर बाजार मूलभूत चुका
https://bit.ly/2GVqW3m
Reading Time: 3 minutes

शेअर बाजार – काही मूलभूत चुका 

शेअर बाजार अनेक गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. आजच्या लेखात आपण शेअर बाजारात गुंतवणूक करताना होणाऱ्या काही मूलभूत चुका कोणत्या आहेत, याबद्दल माहिती घेऊया. शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमीच विचारपूर्वक गुंतवणूक करणं आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या काळात शेअर बाजाराने आपलं ‘बेभरवशी’ हे वैशिष्ट्य टिकवून ठेवलं आहे. सगळ्या जगाच्या अर्थकारणावर परिणाम होत असताना शेअर बाजाराने मात्र सुरुवातीचे काही दिवस सोडल्यास तेजीचा अनुभव घेतला. यामागचं सर्वात महत्वाचे कारण म्हणजे युवा वर्गाचा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे असलेला कल  व  मध्यमवर्गीय समाजाचे शेअर बाजारासंबंधित दूर होणारे गैरसमज.

शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे सट्टा, जुगार, लॉटरी अशा संकल्पनांमधून बाहेर पडून भारतातील मध्यमवर्गीय समाज याकडे एक गुंतवणुकीचा उत्कृष्ट पर्याय म्हणून बघत आहे. हे अर्थातच चांगले चित्र आहे. पण “अर्धवट ज्ञानापेक्षा अज्ञान बरे”, या उक्तीप्रमाणे अर्धवट माहितीच्या आधारे केलेली गुंतवणूक नुकसानीचे कारण होऊ शकते. 

हे नक्की वाचा: Blue Chip Shares – ब्लू चिप शेअर्स मधील गुंतवणुकीचे फायदे 

शेअर बाजार-  गुंतवणूक करताना होणाऱ्या काही मूलभूत चुका टाळा

१. शेअर बाजाराचे जुजबी ज्ञान असणाऱ्या जवळच्या व्यक्तीने सांगितलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे.

  • ऑफिसमधले सहकारी, मित्र आणि कुटूंबातील कोणीतरी शेअर बाजारात गुंतवणूक करत असतो आणि आपण त्या व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवणूक सुरु करतो. इथपर्यंत ठीक आहे.
  • पुढे प्रत्येक वेळी शेअर्स खरेदी करताना त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून शेअर्स खरेदी करणे धोकादायक ठरू शकते.
  • या व्यक्ती बाजारातील तज्ज्ञ असतील, तर त्यांचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु  तुमच्या आधी काही महिने किंवा एखाद दुसरे वर्ष आधी गुंतवणूक सुरु करणारी प्रत्येक व्यक्ती बाजारातील तज्ज्ञ असू शकत नाही.
  • त्यामुळे शेअर्स खरेदी करताना ओळखीच्या नाही, तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.

२. टीव्ही चॅनेल्स, सोशल मीडिया वर्तमानपत्रे अथवा वेबपोर्टलवरील सल्ला ग्राह्य मानणे

  • आपण साधा कॅज्युअल ड्रेस घेतानाही दहा वेळा विचार करून, दोन /तीन दुकाने फिरून मग खरेदी करण्याचा निर्णय घेतो, मग शेअर्स खरेदीच्या बाबतीत मात्र सोशल मीडिया, टीव्ही, वर्तमानपत्र अथवा वेबपोर्टलच्या ‘शेअर्स रेकमेंडेशन्स वर आंधळेपणाने विश्वास ठेवून ते खरेदी करताना एक क्षणही विचार करत नाही.
  • टीव्हीवर दिसणारे अथवा इतर माध्यमातून लिहिणारे विश्लेषक, तज्ज्ञ आणि फंड मॅनेजर्स यांनी दिलेली रेकमेंडेशन्स  चूकच  असतात  असं  नाही. पण काही वेळा ही ‘पेड रेकमेंडेशन्स’ असू शकतात. 
  • तसेच गुंतवणुकी संदर्भात नियमित माहिती प्रसिद्ध करणाऱ्या कोणत्याही डिजिटल अथवा प्रिंट मीडियाने दिलेले स्टार रेटिंग ग्राह्य धरून त्याप्रमाणे गुंतवणूक करणे टाळा.
  • कोणत्याही डिजिटल अथवा प्रिंट मीडियाने सुचविलेल्या शेअर्सना तुम्ही शॉर्टलिस्ट करू शकता. पण गुंतवणूक करताना  मात्र संबंधित शेअर्सबद्दल योग्य माहिती घेऊन, त्याचा अभ्यास करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

महत्वाचे लेख: शेअर बाजार : किंमत-उत्पन्न प्रमाण (P/E Ratio) म्हणजे काय?

३. पी.इ.रेशो अथवा इतर रेशोंच्या आधारे स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे

  • अनेकजण  पीई रेशो किंवा इतर स्टँडअलोन मेट्रिकच्या प्रमाणात इतर गुणोत्तरांवर आधारित शेअर्समध्ये  गुंतवणूक  करतात. 
  • हे प्रमाण फक्त आपल्या विश्लेषण प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यासाठी आहे. गुंतवणूकीसाठी एकमात्र परिमाण म्हणून याला ग्राह्य धरू  नये 

४. गुंतवणूक / व्यापार करण्यासाठी आपले पैसे दुसऱ्याकडे सुपूर्त करणे

  • MLM मार्केटिंगवाल्यांप्रमाणेच अल्गो टेडिंग करणाऱ्या काही व्यक्ती शेअर बाजारातही कार्य करत असतात. दरवेळी  एका साचेबद्ध   पद्धतीने  ते  आपला  ‘बकरा’ शोधत  असतात. 
  • भरघोस  नफ्याची आकडेमोड दाखवून हे लोक नवीन गुंतवणूकदारांचा विश्वास  संपादित करतात. 
  • त्यामुळे अल्गो ट्रेडिंगद्वारे गुंतवणूक करताना कोणतीही पार्श्वभूमी तपासणी न करता त्याच्याकडे आपली रक्कम सुपूर्त करण्याची चूक करू नका. 
  • एसएमएस, व्हाटस अप, टेलिग्राम, ई-मेल्स आदी माध्यमातून आकर्षक जाहिरात पाठवून बकरे शोधणारे बनावट आर्थिक सल्लागार सर्वत्र जाळे पसरून बसलेले असतात. 
  • अशाप्रकारची जाहिरात पाठवणाऱ्या कोणत्याही माध्यमाला सबस्क्रीप्शन घेऊन आपले पैसे वाया घालवू नका.
  • कोणत्याही अनोळखी आर्थिक सल्लागाराला तुमच्या आसपाससुद्धा फिरकू देऊ नका. त्याला दुरूनच रामराम करा.
  • जर ब्रोकरच शोधायचा असेल, तर अर्धवट माहितीच्या ब्रोकरकडून फसगत करून घेण्यापेक्षा चांगला ब्रोकर शोधा. तसेच, एकाच  ब्रोकरच्या  ताब्यात  आपल्या  सर्व  गुंतवणूक  देणेदेखील  धोकादायक  ठरू शकते. 

इतर लेख: Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ? 

कोणतीही  गुंतवणूक  करताना  त्यासंदर्भातील जुजबी ज्ञान असून भागत नाही. उत्तम  परतावा  मिळवायचा  असेल, तर  गुंतवणुकीचा  सखोल अभ्यास  करणे देखील  तितकेच आवश्यक आहे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…