Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes

Market Cap: मार्केट कॅप 

“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे. रिलायन्सच्या सर्व शेअर्सची एकूण बाजारातली किंमत रु. १० लाख कोटींपेक्षा जास्त आहे, असा याचा अर्थ आहे. 

मार्केट कॅप – सूत्र (Market Cap – Formula

कंपनीचे एकूण शेअर्स  (×) शेअर्सचा सध्याचा बाजारभाव = मार्केट कॅप (समग्र बाजारमूल्य)

(Number of shares  (×) Market Price = Market Capitalization)

 

कंपनी दि. ६ डिसेंबरची मार्केट कॅप 
डी – मार्ट 

(अव्हेन्यू सुपर मार्केट)

१.१३ लाख कोटी रुपये
इन्फोसिस  ३.०५ लाख कोटी रुपये
एचसीएफसी बँक  ६.८३ लाख कोटी रुपये
डाबर इंडिया लिमिटेड ८२ हजार कोटी रुपये
  • शेअर बाजारात लिस्ट झालेल्या म्हणजेच नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वर खाली होत असतात.
  • शेअर्सची नोंदणी शेअर बाजारात झाल्यावर, काही लोक ते शेअर्स खरेदी करतात, तर काही विक्री करतात. अनेक प्रकारच्या गोष्टींमुळे शेअर्सचे भाव सतत कमी- जास्त होत असतात. 
  • कंपनीचे भविष्य उज्ज्वल वाटत असेल, तर भाव चढतात व उलट वाटत असेल, तर भाव पडतात. 
  • उदा : A  कंपनीचा शेअर ५० रुपयांना उपलब्ध आहे, तर B कंपनीचा शेअर ७५ रुपयांना उपलब्ध आहे. तुम्हाला B कंपनीचा शेअर २५ रुपयांनी महाग वाटेल. पण वरील माहिती अर्धवट आहे. तुम्ही शेअर्सच्या मूल्याबाबत लगेच निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. येथे मार्केट कॅप महत्वाची आहे. 
A B
I उपलब्ध शेअर्स संख्या   १०,००,००० ५,००,०००
II बाजारभाव  रु. ५०   रु. ७५
III बाजारमूल्य ( I × II) ५,००,००,०००

५ कोटी रुपये 

३,७५,००,०००

३. ७५ कोटी रुपये 

कंपनी A चा रु. ५० मध्ये शेअर विकत घ्यावा का नाही हा प्रश्न अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.

  • गुंतवणूकदारांच्या नजरेत कंपनीचे एकूण मूल्य म्हणजे ‘मार्केट कॅप’ असे सुद्धा म्हणता येईल.
  • कंपनीचा आकार समजण्यासाठी ‘मार्केट कॅप’ ही संज्ञा उपयोगी आहे, पण त्या कंपनीचा शेअर विकत घ्यावा की नाही, हे ठरवण्यासाठी उपयोगी नाही. 
  • कंपनीचा प्राईज अर्निंग रेशो  (Price Earning Ratio), बुक व्हॅल्यू रेशो (Book Value Ratio), भविष्यातील संधी, जोखिमी, तंत्रज्ञानामुळे होणारे बदल, सरकारी धोरणे अशा अनेक बाबींचा परिणाम शेअर्सच्या किमतीवर होत असतो. 
  • भारतातील सर्वात जास्त मार्केट कॅप असणाऱ्या ३० कंपन्यांचा निर्देशांक म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सेंजचा ‘सेन्सेक्स’ (SENSEX), तर सर्वात जास्त मार्केट कॅप असणाऱ्या ५० कंपन्यांचा निर्देशांक म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सेंजचा ‘निफ्टी’ (NIFTY) ओळखला जातो. 
  • भारतीय शेअर बाजारात नोंदणी झालेल्या सर्वात मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप माहिती करून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Market Cap Marathi Mahiti, Market Cap info in Marathi, Market Cap mhanje kay 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!