Blue Chip Shares - ब्लू चिप शेअर्स
https://bit.ly/3l8QpFf
Reading Time: 3 minutes

ब्लू चिप शेअर्स (Blue Chip Shares) 

आजच्या लेखात आपण ब्लू चिप शेअर्स  (Blue Chip Shares) म्हणजे काय  ब्लू चिप कंपनीच्या  शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर असते का? या विषयांवर सविस्तर माहिती घेणार आहोत. 

20 जानेवारी 2020 रोजी निर्देशांकाने घेतलेल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम उच्चांकी झेपेनंतर, लॉकडाऊनमध्ये 24 मार्च 2020 रोजी झालेली तीव्र अभूतपूर्व 40% घसरण, 

त्यानंतर 5 महिन्यात निर्देशांकात झालेली, सर्वानाच अनपेक्षित अशी जवळपास 50% वाढ, 

त्यांनतर लोकांना अनपेक्षित असलेली 21 सप्टेंबर 2020 रोजी सुरू झालेली तीव्र घट आणि 

त्यानंतर बाजार अधिक खाली जाण्याऐवजी 26 व 29 सप्टेंबर 2020 या दोन दिवसात निर्देशांकाने मारलेली उसळी 

या साऱ्यामुळे अनेक गुंतवणूकदार गोंधळले असून त्यांची सर्वाधिक हळहळ ही निर्देशांक कमी अधिक होण्याऐवजी या निमित्ताने गमावलेल्या गुंतवणूक संधीबद्दल आहे.

हे नक्की वाचा: Blue Chip Mutual Fund: ब्लू-चिप म्युच्युअल फंडाचा परिचय 

सेन्सेक्स/ निफ्टी –

 • सेन्सेक्स/ निफ्टी निर्देशांक हे बाजाराचे खरेखुरे प्रतिनिधित्व करत नसून त्यात असलेल्या निवडक शेअर्सचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे 30/ 50 शेअर्सचे प्रतिनिधित्व करणारे सेन्सेक्स /निफ्टी निर्देशांक म्हणजे बाजार नव्हे. 
 • त्यामुळेच अनेकदा बाजार वर आणि आपल्याकडील शेअर्सचे भाव कमी, तर बाजार खाली आणि आपल्याकडे असलेल्या काही शेअर्सचे भाव उच्चांकी असा विरोधाभास दिसून येतो. 
 • सध्या एकंदर नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 5500 असली तरी नियमितपणे असे 2700 कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार होतात त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यापेक्षा अधिक शेअर्सचे प्रतिनिधित्व करणारे बीएससी 500/ एनएससी 500 निर्देशांक अधिक पारदर्शक समजायला हरकत नाही. 
 • कंपनीच्या शेअर्सचे भाव कमी जास्त होण्याची अनेक कारणे आहेत. यामुळे अनेकांना असे शेअर्स आपल्या गुंतवणूक संचात असावेत असे वाटते, तर काहींना तसे वाटत नसते. त्यामुळेच त्यांच्या शेअर्सच्या मागणी पुरवठ्यात सातत्याने फरक पडत असतो. 
 • कंपनीच्या कामगिरीवर तो अंतिमतः स्थिरावतो. 
 • दोन वर्षांपूर्वी भांडवल बाजार नियंत्रक सेबीने म्युच्युअल फंडाच्या योजनांची ओळख निश्चित व्हावी यासाठी निरंतन फंडाचे 5 प्रमुख व 36 उपप्रकारात वर्गीकरण केलं. 
 • यासाठी मोठ्या , मध्यम आणि छोट्या कंपन्या कोणत्या हे त्याच्या बाजारमूल्यावरून निश्चित करून सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या पहिल्या दोनशे पन्नास कंपन्या या मोठ्या कंपन्या असे ठरवले. 
 • ही यादीही दर सहा महिन्यांनी आद्ययवत केली जाते. आज ज्या कंपन्या मोठ्या म्हणून नावाजल्या जातात त्या कधीतरी छोट्या कंपन्या होत्या आपल्या कामगिरीच्या जोरावर आणि सातत्य राखल्याने  त्या मोठ्या कंपन्या झाल्या.

 ब्लू चिप कंपनी (Blue Chip Company)-

 • छोट्या, मध्यम कंपन्यामधून वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वोत्तम स्थान मिळवलेल्या मोठ्या कंपन्या उदयास येतात. 
 • आजच्या सेन्सेक्स / निफ्टी मध्ये त्यातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. 
 • आपण त्यांना ब्लू चिप कंपन्या असे म्हणतो. 
 • ब्लू चिप हा शब्द नेमका कसा आला याचा इतिहास आहे. 
 • पोकर या पत्याच्या खेळात आपली बोली लावताना पैशाच्या ऐवजी पांढऱ्या, लाल, निळ्या रंगाच्या सोंगट्यानी बोली लावावी लागते.  
 • यातील पांढऱ्या सोंगटीचे मूल्य सर्वांत कमी तर, निळ्या रंगाच्या सोंगटीचे मूल्य जास्त असते यावरून मौल्यवान कंपनी अशा अर्थाने सर्वप्रथम हा शब्दप्रयोग वापरण्यात आला. 
 • डो जोन्स कंपनीतील ऑलिव्हर गिंगोल्ड याने सन 1923 मध्ये सर्वप्रथम एका लेखात शब्दप्रयोग वापरला आणि त्यानंतर तो प्रचलित झाला.  
 • आज जवळपास 100 वर्ष चांगल्या कंपन्या या ब्लू चिप कंपन्या अशा अर्थाने ओळखल्या जातात.
 • चांगली कंपनी म्हणून ओळखण्याचे जे काही मूलभूत निकष आहेत ते यांना लागू होतात, तर त्याचे किंमत भाव गुणोत्तर, बाजारभाव, प्रतिशेअर कमाई त्याच प्रकारच्या अन्य कंपन्याहून खूप जास्त असतात. 
 • कर्ज अत्यंत कमी किंवा नाहीच असे, मालाचा दर्जा, लोकांचा विश्वास आणि नावलौकिक या जोरावर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत त्या टिकून राहतात व प्रगती करतात. 
 • अगदी सुरुवातीस या कंपन्या मिळाल्या, तर गुंतवणूकदार खूप भरपूर लाभ मिळवू शकतो. 
 • अनेक गुंतवणूकदारांना अशा कंपन्यांतून आपल्या गुंतवणुकीच्या कितीतरी पटीने हजारो रुपयांचा डिव्हिडंड मिळत असल्याने होता होईतो खूपच आणि खरोखरीची अडचण असल्याखेरीज हे शेअर्स गुंतवणूकदार विक्रीस काढत नाहीत. त्यामुळे त्याचा पुरवठा कमी होत जातो आणि साहजिकच भाव चढता राहण्यास मदत होते. मात्र सुरुवातीच्या काळात याचा अंदाज बांधणे कठीण आहे. 
 • या कंपन्या त्यांच्या क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या असतात. पाहिल्या 100 महत्वाच्या कंपन्यात त्यांची गणना होत असल्याने बीएससी 100, निफ्टी नेक्स्ट फिफ्टी यातूनही भविष्यातील अशा कंपन्या शोधता येऊ शकतील. 
 • उपलब्ध असलेल्या तपशीलातून त्याची नावे सहज मिळू शकतील. 
 • या कंपन्यांना गमतीने बेलवेडर  स्टॉक असे ही म्हटले जाते. 
 • मेंढ्याच्या कळपात जो गटप्रमुख असतो त्याच्या गळ्यात असलेल्या घंटेच्या आवाजाने इतर मेंढ्या त्याच्या मागोमाग जातात त्याचप्रमाणे  ब्लु चिप कंपन्या या बहुतेक त्याच्या गटातील सर्वोत्तम कंपन्या असून त्या इतर कंपन्यांना दिशादर्शन देण्याचे काम करून निर्दिशांकावर प्रभाव टाकतात.

संबंधित लेख: परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल? 

ब्लू चिप कंपनी – फायदे (Advantages of Blue-chip Company)

 • बोनस किंवा मूल्य वृद्धीच्या रूपाने चांगला परतावा, बाजारभावात तुलनेत कमी चढउतार, मंदीसदृश परिस्थितीतही भाव स्थिर राहतो.  
 • भाव कोणत्याही कारणाने खाली आले तरी पुन्हा होते त्या स्तरावर लगेच येण्याची शक्यता.
 • चोख ताळेबंद, नियमितपणे आणि विशिष्ठ कालावधीत हमखास लाभांश त्यामुळे अनेकांच्या नियमित उत्पन्नाचे साधन.
 • या कंपन्या सतत नाविन्याचा शोध घेत असल्याने गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत कमी धोकादायक.
 • या कंपन्यांच्या शेअर्सची भाव अधिक असला मोठ्या प्रमाणात त्यात उलाढाल होत असल्याने यात बऱ्यापैकी तरलता असते, त्यामुळे गुंतवणूकदारांना गरजेनुसार एकरकमी मोठी रक्कम उभारता येणे शक्य असते. 
 • गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केलेला असल्याने त्यातून कंपनीचे लौकीकमूल्य निर्माण होऊन स्पर्धात्मक परिस्थितीत त्या आपले ग्राहक टिकवून ठेवतात त्याचा लाभ गुंतवणूकदारांना होतो.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Blue Chip Shares Marathi Mahiti, Blue Chip Shares in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…