Reading Time: 2 minutes

“THIS IS THE TREASURY OF THE POOR TO DIGITAL PAYMENTS” -NARENDRA MODI

  • डिजीटल पेमेंट वगैरे संकल्पना आज पर्यंत देशातील एका उच्चभ्रू वर्गापर्यंतच मर्यादित होत्या. विकासावर कोणाचीही मक्तेदारी नाही, याची ग्वाही देत मा. पंतप्रधान या नवीन तंत्रज्ञानाला ‘गरीबांचा खजिना’ म्हटले आहे. 

  • भीम अॅपचे फायदे काय आहेत ज्यामुळे इतर कोणाही पेक्षा गरिबांसाठी ते जास्त लाभदायक ठरतंय?

  • भीम अॅप राशन विक्रेत्यांच्या स्वैराचाराला बसवणार चाप !!! : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार (NFSA 2013) सार्वजनिक वितरण(रेशन) व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक इलेक्ट्रॉनिक बिंदू (ई-पॉस) मशीन्स स्थापित करण्याचा निर्णय घेतला. 

  • या प्रणाली द्वारे संपूर्ण वितरण व्यवस्था विभागाचा संपूर्ण डेटा साठवलेला असेल, त्यामुळे केवळ गरजू लोकांना आपला हक्क मिळेल आणि रेशन दुकानांमध्ये होणारी हेराफेरी प्रशासनाच्या तत्काळ लक्षात येईल.

  • ही प्रणाली प्रत्यक्षात वापरात येताना मात्र थोडा त्रास झाला. आधार कार्ड लिंक करताना अनेक ग्राहकांना अडचणी भासू लागल्या. 

  • त्यामुळे हे काम रखडले असले तरी एकदा संपूर्ण देशात या मशिनचा वापर सुरु झाला की या प्रणालीच्या तत्परतेत अजून एक भर पडणार ती म्हणजे भीम अॅप!

  • ग्राहक भीम आप द्वारे पेमेंट करतील २ फायदे होतील –
    १. रेशन व्यवहारामध्ये पारदर्शकता वाढेल.
    २. गरीब लोकांमध्ये देखिल कॅशलेस ची जाणीव आणि सवय रुजेल.

  • काही मुलभूत माहिती होण्यासाठी आधी लोकांना याचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्या नंतर, प्रत्येक रेशन ग्राहक आपापल्या भीम अॅप च्या खात्यावरून थेट रेशन विक्रेत्याच्या सरकारी खात्यावर पैसे जमा करेल. 

  • याची पावती ग्राहकांना POS मशिन द्वारे मिळेल.

  • त्यामुळे देशात होणारे सगळे रेशन व्यवहार चोख आणि पारदर्शक होतील. गरिबांच्या हक्क असलेल्या अन्नधान्याचा गैरवापर होणार नाही. मध्यस्थ किंवा अपात्र या योजनेचा दुर्व्यवहार करू शकणार नाहीत.

  • महत्वाचं म्हणजे, या निमित्त्याने समजातील सर्वात वंचित गट देखील digital प्रवाहामध्ये सहभागी होईल आणि त्यामुळे आता विकास कोणत्या एका सामाजिक गटासाठी राहिला नसून त्यात सर्वांचा तितकाच वाटा आहे. आणि खऱ्या अर्थाने गांधीजींच्या ‘सर्वोदय’ आणि ‘अंत्योदय’ ध्येयाच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होते आहे असे म्हणायला काही हरकत नाही.  

आपल्याला अजून कोणत्या विषयांवर वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये किंवा [email protected] कळवा.

(Disclaimer : येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. Please refer https://arthasakshar.com/Disclaimer.aspx )

(अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 820 880 7919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.