Reading Time: 2 minutes

गुगल पे चा इतिहास :

 • गुगल या कंपनीने साधारण एका वर्षा पूर्वी ‘तेझ’ नावाची पेमेंट सेवा भारतात सुरु केली. आणि हेच ‘तेझ’ आता काही वाढीव सुविधांसोबत ‘गुगल पे’ या नावाने नव्या रुपात देशात आले आहे. ही सुधारीत आवृत्ती सध्यातरी बँकांसोबतचे व्यवहार करते. परंतु, देशातील एकूण सर्वच व्यवहार गूगल पे द्वारे होतील अशी सुविधा लवकरच सुरू होते आहे. 

 • इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार,  झेस्टमनी सारख्या प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे, ऑनलाइन आणि ऑफलाइन शिवाय माईक्रो कर्ज (लोन) सुविधा सुरु करत आहे. त्यासाठी गूगल ने एचडीएफसी, आयसीआयसीआय, फेडरल बँक आणि कोटक महिंद्रा बॅंकसह अनेक स्थानिक बँकांशी भागीदारी केली आहे, जे ग्राहकांना काही सेकंदात अॅपद्वारे पूर्व-मंजूर (प्री-अप्रूव्ह्ड) कर्ज देतील. 

 • मुळात, नवीन भागीदारी आणि स्थानिक पातळीवर रुजण्यासाठी सर्व भागांशी या माध्यमाने जोडले जाणे, हे तेझ चे गूगल मध्ये रुपांतर होण्याचे उद्दिष्ट आहे.

अॅन्डॉईड पे आणि गूगल वॉलेट याचं एकत्रीकरण म्हणजे ‘गूगल पे’.    

 • अॅन्डॉईड पे ही एक अशी पेमेंट पद्धती आहे ज्यात कोणते विशिष्ट अॅप आणि विशिष्ट क्रेडीट कार्ड त्याच्याशी जोडणे गरजेचे नाही. आपल्या अॅन्डॉईड मोबाईलच्या सहाय्याने कोणत्याही कार्ड वरून तुम्ही ‘पे’ पर्याय निवडा आणि तुमचे पेमेंट यशस्वी होते. 

 • कोणताही पासवर्ड, खाते क्रमांक असे डिटेल दिल्याशिवाय झटक्यात पेमेंट होते. यासाठी कोणतेही अॅप वापरण्याची गरज नाही कारण याच्या सेटिंग खुद्द ऑपरेटींग सिस्टीम मध्ये आहेत. शिवाय तुम्हाला मिळालेले गिफ्ट वाउचर इथे वापरता येतात.

 • आता अॅन्डॉईड पे हेही एक प्रकारचे गुगल वॉलेट आहे, पण जरा किचकट. गुगल वॉलेट वापरण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीने जावे लागते. गुगल वॉलेट हे अॅप डाउनलोड करण्यापासून आपला खाते आपल्या कार्डशी जोडणे, खात्यात जमा रक्कम ठेवणे, आपल्या कॉनटॅक्ट यादीतील मित्रांना पैसे पाठवणे आणि मिळवणे अशी सर्व कामे यावर होऊ शकतात.  

 • गुगल या सर्व भिन्न पेमेंट पद्धतींचे एकत्रीकरण एका युनिफाइड ब्रँडमध्ये केले आहे, ज्याला जानेवारी २०१८ पासून ‘गुगल पे’ म्हटले जाते.

गुगल पे आणि इतर अॅप –

 • अन्य गुगल अॅप्ससह ‘गुगल पे’चं एकत्रीकरण हे या नवीन अॅपचं वेगळेपण आहे. 

 • याचा अर्थ असा की वापरकर्ते इतर गुगल अॅप्सचा वापर करून (जसे की, क्रोम, प्ले स्टोर किंवा गुगल असिस्टंट) गुगल पे चा वापर करू शकतात. 

 • म्हणून जर वापरकर्ते एखाद्या बुकिंग साइटवरुन चित्रपटाचे बुकिंग क्रोमवर ब्राउझ करीत असतील तर त्याच क्रोममध्येच गुगल पे इंटरफेस उघडून तिथूनच पेमेंट करू शकतात. 

 • त्याचप्रमाणे, दुकानात त्वरित पैसे भरण्यासाठी, वापरकर्ते गुगल असिस्टंट द्वारे गुगल पे करू शकतात.

गूगल पे आणि एन.एफ.सी. –

 • सॅमसंग पे किंवा अॅपल पे पेक्षाही हे नवीन अॅप अद्यावत आहे याचे कारण म्हणजे त्यात असलेली एनएफसी, अर्थात, ‘नियर फिल्ड कॉम्युनीकेशन’. 

 • तुम्ही शेअरईट किंवा ब्लूटूथ ज्या प्रकारे वापरता तशी ही प्रणाली आहे. ज्यामध्ये ज्याला पैसे पाठवायचे आहेत अशी व्यक्ती एक ठराविक अंतराच्या आत असेल तर हायफ्रिक्वेन्सी लहरी द्वारे एका गुगलपे मोबाईल अॅप मधून दुसऱ्या गुगलपे मोबाईल अॅप मध्ये तत्काळ पैसे पाठवता येतात.

थोडक्यात काय तर आपल्या हातात असणारा स्मार्ट फोनचा खरं स्मार्ट वापर करायला आपल्याला गुगलपे मोबाईल अॅप शिकवणार आहे.

(Disclaimer : येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. Please refer https://arthasakshar.com/Disclaimer.aspx )

(अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 820 880 7919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ नावाने सेव्ह करून त्यावर ‘अपडेट’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.