Reading Time: 2 minutes

आपले वाहन हे प्रत्येकाला प्रिय असते. दुचाकी असो किंवा चारचाकी, प्रत्येकजण आपल्या वाहनाला जपतोच. 

  • आपले वाहन हे कायम सुरक्षित राहावे यासाठी आपण त्याचा इन्शुरन्स म्हणजेच विमा काढत असतो. 
  • विमा काढल्यामुळे वाहनाला काही अडचण आल्यास किंवा अपघात झाल्यास आपल्याला आर्थिक नुकसान झेलावे लागत नाही. शिवाय भारतीय वाहन मोटार कायदा नियमांनुसार आपल्या गाडीला विमा पॉलिसी असणे बंधनकारक आहे. 
  • जर गाडीला विमा पॉलिसी नसेल तर आपल्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो. नवीन गाडी विकत घेताना आपण पाहिले असेल की एक कंपनीचा विमा आणि एक थर्ड पार्टी इन्शुरन्स आपल्याला काढण्यासाठी काही शोरुमचे कर्मचारी आग्रह करतात. 
  • आपल्यातील कित्येक जणांकडे दोन दोन इन्शुरन्स देखील असतील. आपण ऐकले असेल की दोन इन्शुरन्स असणे हे बेकायदेशीर आहे वगैरे वैगैरे. तर या सर्व गोष्टींमध्ये कसलंही तथ्य नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. 
  • दोन इन्शुरन्स(विमा) असायला हवे किंवा नाही याबद्दल बरेच मतप्रवाह दिसून येतात. काही प्रश्न देखील यावर उपस्थित होतात. यामधला पहिला प्रश्न खालीलप्रमाणे – 

भारतात एकाच वाहनासाठी दुहेरी विमा पॉलिसी घेणे बेकायदेशीर आहे का

  • याचं उत्तर – “नाही”. एकाच वाहनासाठी दोन विमा पॉलिसी विकत घेणे हे बेकायदेशीर नाही. 
  • फक्त एकाच कंपनीच्या दोन विमा पॉलिसी आपल्याला विकत घेता येत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं. 
  • दुहेरी विमा पॉलिसी घेण्याबाबत कसलंही बंधन नसलं तरी दोन विमा पॉलिसी घेऊ नयेत असा सल्ला बऱ्याच जणांकडून दिला जातो. 

 

हे ही वाचा – Buy New Car : कार खरेदी करताना वाचा टिप्स

 

दुहेरी पॉलिसीचे फायदे की तोटे ??

  • दोन विमा पॉलिसी घेण्यासाठी आपल्याला दुप्पट किंवा जास्तीचा खर्च लागू शकतो. 
  • सोबतच एकाच दाव्यासाठी म्हणजेच जर समजा आपल्या गाडीचा अपघात झाला. आता अपघातानंतर आपण विमा कंपनीकडे आपला दावा ठोकतो. 
  • एका अपघातासाठी किंवा प्रसंगासाठी आपण दोन कंपन्यांकडे मदत मागू शकत नाही म्हणजेच दावा करू शकत नाही. याचा अर्थ तुम्हाला एकाच कंपनीकडं सेटलमेंट करावी लागेल. 
  • दोन विमा पॉलिसी धारक असणे फायद्यापेक्षा जास्त तोट्याचे ठरू शकते. यासाठी आपल्याला अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल. 
  • सोबतच एकाच वेळी आपण दोन कंपन्यांमध्ये क्लेम सेटल करू शकत नाही, त्यामुळं आपलं नुकसान पक्क आहे. एकाच वेळी दोन पॉलिसी असल्यामुळे आपण देखील गोंधळात पडू शकतो. 
  • कधी कधी आपण नकळतपणे किंवा चुकून एकाच गाडीसाठी दोन विमा पॉलिसी विकत घेतो. 
  • काही वेळेस असे करणे विमा कंपन्यांची फसवणूक केल्याच्या प्रकारात येते. कंपन्या देखील विमाधारक आपली फसवणूक करत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काही मापदंडांचा उपयोग करतात. 
  • पॉलिसीधारकराने खरंच कंपनीच्या पैशांवर फायदा मिळवला आहे की नाही हे देखील कंपनी लक्षात घेते. 
  • जर दोन विमा पॉलिसी आपल्याकडे असतील तर आपल्याला क्लेम करण्यावेळी खूप विचार करावा लागू शकतो. 
  • यामुळे क्लेम करण्यास विलंब होऊ शकतो आणि आपणही गोंधळात पडू शकतो. शिवाय एकाच वेळी जर आपण दोन कंपन्यांकडून नुकसान भरपाई घेतली तर विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा नकळतपणे आपल्याकडून होऊ शकतो. यासंदर्भात विमा कंपन्या योग्य ती चौकशी करून आपला क्लेम रिजेक्ट देखील करू शकतात. 

 

हे ही वाचा – New insurance Scheme : निर्मिती करा,वापरा, मंजुरी मिळवा या विमा योजनेविषयी तुम्हाला माहिती आहे का?

 

दोन विमा पॉलिसी घेणं कसं टाळावं ?

तुमच्या कारची सध्या सुरु असलेली पॉलिसीची मुदत एकदा तपासून घ्यावी. पॉलिसीचे नूतनीकरण कारण्यावेळी पॉलिसी ओव्हरलॅप होणार नाही याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. 

टीप : आपल्याला खरंच दोन कंपन्यांची विमा पॉलिसी खरेदी करण्याची गरज आहे किंवा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकाच गाडीसाठी दोन विमा पॉलिसी काढणे हे बेकायदेशीर नक्कीच नाही. असं असलं तरी आपल्याला दुप्पट प्रीमियम हा भरावाचं लागणार हे देखील कटू सत्य आहे. सोबतच आपल्याला एकाच वेळी दोन क्लेम सेटल करता येणार नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे दोन विमा पॉलिसी गरज असेल तरचं घ्या अन्यथा ते घेणं टाळा.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…