Reading Time: 3 minutes

नूतन वर्षाभिनंदन!

वर्षारंभीची चांगली कृती विसरतात

दृढ संकल्प अगदी केला तरी.

चांगल्या संकल्पास मुहूर्त लागतो

हीच मनातील अंधश्रद्धा खरी.

संकल्प करणारे व न करणारे सर्वांना इंग्रजी नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

नूतन वर्षात आपणा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत व आपलं आरोग्य उत्तम राहो हीच सदिच्छा.‌. ‌

           1 जानेवारी 2023 नवीन वर्षाच्या सुरूवातीला माझ्या भावाने (उत्तम पिंगळे)  ही चारोळी मला पाठवली होती. नवीन वर्षी नवे संकल्प करायचे ही अंधश्रद्धा आहे हे खरेच – पण आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प प्रत्येकाने कोणताही मुहूर्त न पाहता प्रत्येकाने करायलाच हवा. माझ्या अनेक लेखातून मी सध्याच्या परिस्थितीत भांडवल बाजारातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणुकीला सुयोग्य पर्याय नाही असे सुचवत असतो. येथे गुंतवणूक करण्याची स्वतःची अशी पद्धत असली पाहिजे ती त्याला सांगता आली पाहिजे तिची व्यवहारीकता तपासून त्यात आवश्यक ते बदल करण्याची तयारी असली पाहिजे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या अन्य पद्धतीची माहिती मी लेखातून देत असतो. आपल्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार सर्वसाधारण सर्वाना उपयोगी पडतील आशा दोन पद्धती पैकी एक नितीन पोताडेसर यांची तर दुसरी पंकज कोटलवरसर यांनी शोधल्या आहेत. यावर स्वतंत्रपणे लिहिलेले लेख उपलब्ध आहेत. अशाच काही अजून सर्वमान्य पद्धती वापरात असून यांची माहिती आज करून घेऊयात.

हेही वाचा – RTGS: आरटीजीएस सुविधा आता 24 तास उपलब्ध होणार

★खरेदी करा आणि विसरून जा- ही एक दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची अतिशय जुनी पद्धत आहे. वॉरेन बफे यांनी याच पद्धतीने गुंतवणूक करतात. यात कंपन्यांची निवड महत्वाची आहे.  एकदा तुम्ही गुंतवणूक कुठे करायची याचा विचारपूर्वक निर्णय घेतलात की पुढे दीर्घकाळ काहीच करायचे नाही. त्याची किंमत कमी होते वाढते याची चिंता करायची नाही. बरेचदा भीतीमुळे गुंतवणूकदारांकडून अयोग्य वेळी खरेदीविक्री केली जाते त्यामुळे म्हणावा तेवढा फायदा होत नाही किंवा त्यांचे नुकसान होते. आपण गुंतवणूक केलेल्या 3, 4 कंपन्यांनी जरी भविष्यात अनपेक्षित वाढ दाखवली तर पूर्ण गुंतवणुकीची भरपाई होऊन त्यावर अनेकपट परतावा मिळू शकतो.

★मागणी असलेल्या उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक- ज्या उद्योगास मागणी आहे किंवा नजीकच्या भविष्यात मागणी येऊ शकेल अशा उद्योगात गुंतवणूक करणे. यात चालू होणारी तेजी पकड घेताना किंवा उत्कर्षबिंदुस पोहोचण्यापूर्वी त्यात सामील होऊन मागणी स्थिर झाली अथवा कमी होण्यास सुरुवात होण्यापूर्वी यातून बाहेर पडणे अशा प्रकारची ही गुंतवणूक आहे. सध्या आटोमोबाईल क्षेत्र जोरात आहे आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याने अशा कंपन्यांत गुंतवणूक करण्याचा विचार करता येईल.

★वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांतील गुंतवणूक: ही गुंतवणूक मागणी असलेल्या उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीसारखीच आहे यात कंपनीच्या मागील एक ते तीन वर्षे कारकिर्दीचा विचार करून या कालावधीत सरस आर्थिक कामगिरी दाखवणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक केली जाते.

★मूल्यवर्धित कंपन्यांतील गुंतवणूक: बाजारात आपल्याला अनेक कंपन्यांचे भाव दिसतात. एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला त्या कंपनीचे मूल्य शोधायचे असते. ते आपल्याला जितक्या लवकर शोधाता येईल तेवढा अधिक फायदा होऊ शकतो.

★कमी बाजारमूल्य असणाऱ्या कंपन्या – ज्या कंपन्याच्या विक्रीत वाढ होऊन सातत्याने नफा दर्शवित आहे त्यात गुंतवणूक करावी अशी या मागील भूमिका आहे. आज ज्यांना आपण मोठ्या ब्लु चिप कंपन्या समजतो त्या एकेकाळी छोट्या कंपन्या होत्या तेव्हा अशा कंपन्या शोधून त्यात गुंतवणूक केल्यास त्याचा अधिक लाभ होऊ शकेल. यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्यांच्या भावात होणारी वाढ ही बाजारात तेजी आल्यानंतर होते मात्र बाजारात मंदी आल्यास सर्वात आधी आणि सर्वाधिक भाव या कंपन्यांचे कमी होतात.

हेही वाचा – Future Valuation Of Technology Stock : आयटी कंपन्यांचे मूल्यमापन करताना विचारात घ्या गोष्टी

★डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमधील गुंतवणूक: सातत्याने पैसे मिळत राहावे ही काही व्यक्तींची गरज असते. यात पेन्शन न मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्याचा समावेश होतो. हे लोक मिळणाऱ्या डिव्हिडंडची तुलना बँकेतील व्याजदाराशी करतात.

★ईएसजी क्षेत्रातील गुंतवणूक: जगभरात पर्यावरण रक्षणाची चळवळ जोर धरत असून अनेक जण पर्यावरण पूरक पद्धतीने केलेली उत्पादने वापरीत आहेत. आपल्याकडेही अशा कंपन्यांचा वेगळा निर्देशांक असून यातील कंपन्यांनी दिलेला परतावा निफ्टीहून अधिक आहे. तेव्हा या निर्देशांकात समावेश असलेल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करणे असे गुंतवणूक धोरण ठरवता येईल.

★फॅक्टर इन्व्हेस्टमेंट: ही गुंतवणूक मूल्यवर्धिक गुंतवणुकीसारखी असली तरी ही गुंतवणूक करताना इतर अनेक मूलभूत विश्लेषणाचे घटक विचारात घेतले जातात. फॅक्टर इटीएफमध्ये बाजारात आणताना निर्देशांकतील अशाच कंपन्यांचा विचार केला जातो.

★निष्क्रिय गुंतवणूक: ही गुंतवणूक निर्देशांकात केली जाते यातील प्रत्येक कंपनीच्या निर्देशांकतील टक्केवारी प्रमाणे गुंतवणूक केली जाते आणि त्यात जसा बदल होईल तेवढाच बदल केला जातो.

★भविष्यवेधी कंपन्यांतील गुंतवणूक- या पद्धतीने केलेली गुंतवणूक ही कंपनीचा भविष्यातील दीर्घकालीन कामगिरीचा विचार करून केली जाते. जी प्रामुख्याने ब्लु चिप कंपन्या, भविष्यवेधी कंपन्या यांचा विचार करून केली जाते.

★बाजाराच्या कलानुसार गुंतवणूक- यात बाजाराचा कल (तेजी/ मंदी) पाहून खरेदी विक्री केली जाते आणि अधिकाधिक फायदा मिळवला जातो.

★विविध मालमत्ता प्रकारातील गुंतवणूक – यात गुंतवणूकदार जोखीम पत्करण्याच्या प्रमाणात विविध मालमत्ता प्रकारात विभागून गुंतवणूक करतो.

हेही वाचा – भारतीय बँकांची दुरावस्था आणि अनुत्पादक मालमत्ता (NPA)

      यातील एक वा अनेक पद्धतीने अथवा त्यांचे मिश्रण करून स्वतःची वेगळी गुंतवणूक पद्धत बनवता येईल.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…