Reading Time: 2 minutes

आर्थिक दृष्ट्या स्मार्ट असणे आज काळाची गरज आहे. पैसे वाचविण्यास जितके  महत्व दिले पाहिजे तितकेच महत्त्व पैसे वाढविण्यास देखील दिले पाहिजे. यामुळे गुंतवणुकीचे आपल्या आर्थिक भविष्यासाठी असणारे महत्त्व आजच्या पिढीला चांगलेच माहित आहे. नोकरीला लागल्यावर व उत्पन्न चालू झाल्यानंतर गुंतवणुकीचा विचार केला जातो. लवकरात लवकर चालू केलेली गुंतवणूक तुमच्या आर्थिक भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.  (Investments marathi) 

परंतु आजच्या पिढीमध्ये गुंतवणूक संदर्भात काही सामान्य चुका पाहायला मिळतात त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या आर्थिक भविष्यावर होतो. ( Investment options marathi) 

हेही वाचा : गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

यामुळे गुंतवणुकी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

१) गुंतवणूकी संदर्भात संपूर्ण माहिती नसणे – 

 • गुंतवणूक करायची आहे परंतु त्या संबंधित काहीच ज्ञान नाही  ही गोष्ट सामान्यपणे आढळून येते. गुंतवणूक करायची म्हटल्यावर सर्वात प्रथम गुंतवणूकीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 • कोणतीही गुंतवणूक करताना  त्यामध्ये किती जोखीम आहे, चक्रवाढ व्याज यासारख्या काही सामान्य गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे किंवा केलेली गुंतवणूक खरंच आपल्या आर्थिक भविष्या करिता फायदेशीर आहे का हे पहाणे देखील नक्कीच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे व त्यामधील मूलभूत संकल्पना जाणून घेणे आवश्यक आहे.

२) आर्थिक ध्येय नसणे – 

 • गुंतवणूक सुरू करायची आहे परंतु आर्थिक उद्दिष्टेच जर स्पष्ट नसतील तर केलेली गुंतवणूक  फायदेशीर ठरत नाही.
 • अनेकदा आपल्याला कशी  गुंतवणूक करायची आहे व कोणत्या प्रकारची गुंतवणूक आपल्यासाठी योग्य आहे हे माहीत नसताना व हा विचार न करता गुंतवणूक केली जाते व ती गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरत नाही.
 • यामुळे सर्वात प्रथम आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे हे जर स्पष्ट असेल तर ते आर्थिक ध्येय गाठण्यासाठी आपल्यासाठी कोणत्या प्रकारची गुंतवणूक योग्य आहे हे लक्षात येते.

३) गुंतवणूक करण्यास विलंब करणे-

 • तरुणांकडून गुंतवणुकीच्या बाबतीत होणारी आणखीन एक चूक म्हणजे गुंतवणुकीस विलंब करणे व गुंतवणुकीस महत्त्व न देणे. 
 • नोकरीला लागल्यावर सॅलरी चालू झाल्यानंतर मौज मस्ती, पार्ट्या, बाहेर फिरायला जाणे यासारख्या सर्व गोष्टींवर वायफळ पैसे खर्च करणे यास आजकालची तरुण पिढी जास्त महत्त्व देते.
 • तरुण वय हे नक्कीच मौज मस्तीचे वय आहे परंतु बचत व गुंतवणुकीस संपूर्ण आयुष्य पडले आहे ही मानसिकता ठेवणे देखील चुकीचे आहे.
 • जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात करा तेवढेच तुमच्या आर्थिक भविष्य साठी ते फायदेशीर आहे. 

हेही वाचा: गुंतवणुकीच्या सर्वमान्य पद्धती

४) झटपट नफा मिळवण्यास महत्व देणे – 

 • झटपट नका सगळ्यांनाच हवा असतो व त्यासाठी झटपट व जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याच्या मागे लागले जाते परंतु हे धोकादायक ठरू शकते. 
 • आपल्या चांगल्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे त्यामुळे झटपट नफा देणाऱ्या  गुंतवणुकीपेक्षा  दीर्घकालीन नफा मिळणाऱ्या गुंतवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. 
 • इतरांचे पाहून आपत्कालीन नफ्याच्या मागे पळण्यापेक्षा भविष्याचा विचार करून दीर्घकालीन गुंतवणुकीस जास्त महत्त्व दिले पाहिजे.

५) आर्थिक सल्लागाराचा सल्ला न घेणे – 

 • अनेकदा आपल्या मित्रांनी गुंतवणूक केली म्हणून कसलाही विचार न करता फक्त इतरांचे पाहून गुंतवणूक करणे हे नक्कीच शहाणपणाचे नाही.
 • गुंतवणुकीचा कोणताही अनुभव नसताना त्याविषयी अधिक जाणून  पैसे गुंतवणे हे धोकादायक आहे म्हणूनच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे हे नक्कीच फायदेशीर आहे.

६) गुंतवणुकीपेक्षा अनावश्यक खर्च प्राधान्य देणे – 

 • नियमित गुंतवणुकीसाठी खर्च आटोक्यात आणणे व अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. 
 • महिना अखेरीस पगार शिल्लक राहत नाही म्हणून गुंतवणुकीत तडजोड करणे ही सर्वात मोठी चूक आहे. 
 • गुंतवणूक कमी करण्यापेक्षा अनावश्यक खर्च कसा कमी करता येईल यावर जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे व बजेट तयार केले पाहिजे यामुळे अनावश्यक खर्च नियंत्रणात येण्यास मदत होईल व गुंतवणूक जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा: बँक सेविंग अकाउंट मध्ये तुम्ही खूप पैसे साठवता का? मग ‘हे’ नक्की वाचा !

तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा ते तुम्ही गुंतवणुकी द्वारे कसे अजून पैसे मिळवून द्यायच्या कामाला कसे लावता हे महत्वाचे आहे.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…