संपत्ती विभाजनासाठी संपूर्ण मार्गदर्शन

Reading Time: 3 minutes

अमेरिकन अब्जाधीश व हेज फंड मॅनेजर, “रे डॅलिओ” यांनी संपत्ती विभाजनाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार, “भविष्यात काय होईल ते आपल्याला माहित नाही, असे गृहीत धरून, आपल्याकडे असणाऱ्या मालमत्तेचं विभाजन धोरणात्मक दृष्ट्या केलं गेलं पाहिजे.

संपत्ती विभाजन म्हणजे नेमकं काय? 

 • इन्वेस्टोपिडीया मध्ये दिलेल्या माहितीनुसार, “मालमत्ता विभाजन हा एक गुंतवणूकीचं धोरण आहे ज्यामध्ये व्यक्तीची उद्दिष्टे, जोखीम पेलण्याची क्षमता  आणि गुंतवणूकीची मर्यादेनुसार पोर्टफोलिच्या मालमत्तेची विभागणी करून आर्थिक जोखीम किंवा नफा याचं संतुलन केलं जाते.”
 • थोडक्यात ही एक गुंतवणूकीची पद्धत आहे जी आपण गुंतवलेल्या रकमेचे विविध वर्गामध्ये विभाजन करण्यास मदत करते. 

गुंतवणूकसंच व्यवस्थापन (Portfolio Management) योजना

मालमत्ता निर्धारित करणारे ३ घटक खालीलप्रमाणे –

१. ध्येये –

 • गुंतवणूक करताना त्यामागे विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्ट असणे आवश्यक आहे. तरच, गुंतवणूक चांगली होते. 
 • आपल्या विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्टानुसार गुंतवणुकीमध्ये असणारी जोखीम आणि गुंतवणूकीची क्षमता या गोष्टी ठरतात. 

२. वेळ मर्यादा-

 • एकदा आपले ध्येय निश्चित झाले की त्यानुसार आपण त्या वेळेपर्यंत गुंतवणूक करू शकतो. 
 • उदाहरणार्थ, आज जर आपले मूल ८ वर्षांचं आहे आणि त्याचा शिक्षणाचा खर्च मुलाच्या वयाच्या १८ व्या वर्षी होणार असेल तर, तुमच्याकडे गुंतवणूकीसाठी लागणारा वेळ १० वर्षांचा आहे. 

३. जोखीम पेलण्याची क्षमता-

 • ठराविक कालावधीत पूर्ण होणाऱ्या विशिष्ट उद्दिष्टासाठी किती गुंतवणूक करायला हवी, हे हातात असणा-या वेळेनुसारच ठरवण्यात येते. 
 • उदा. निवृत्तीसाठी २० वर्षांचा काळ असेल तर, या २० वर्षात आपण आर्थिक जोखीम पेलू शकतो. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी केलेल्या गुंतवणूकीबरोबरच तुम्ही निवृत्तीवेतनाचा सुद्धा लाभ घेऊ शकता. ज्याला बोनस किंवा पेन्शन असं म्हणतात. 

ऍसेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात करा.

मालमत्ता विभाजनाचे स्तर-

 • मालमत्ता किंवा संपत्तीच्या विभाजनाचे विविध स्तर आहेत. सोने, स्थावर मालमत्ता, इक्विटी फंड वगैरे प्रकारांमध्ये हे विभाजन होऊ शकतं.
 • बहुतांश वेळा ठराविक म्हणजेच रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रामध्ये मालमत्ता विभाजनाचं विशेष धोरण दिसून येत नाही.  तसेच रिअल इस्टेट क्षेत्रात मालमत्ता विभाजनाचं वास्तविक चित्र समोर येत नाही. इतर वर्गातील मालमत्ता विभाजनाच्या पारदर्शक आणि वास्तविक पद्धतीनुसार रिअल इस्टेट क्षेत्रातही बदल झाले, तर या क्षेत्राचा ही मालमत्ता विभाजनामध्ये समावेश होऊ शकतो.
 • कर्ज घेण्यासाठी बाँड्स आवश्यक असतात किंवा कर्जाचा संबंध म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकीशी येतो. पूर्वी सोने खरेदी गुंतवणूकीसाठी केली जात असे पण आता गोल्ड फंड किंवा ‘ईटीएफ’ चा पर्याय उपलब्ध आहे. 

मालमत्ता विभाजनाचा पहिला स्तर 

 • पहिल्या स्तरानुसार, आपल्याला असणारं कर्ज, सोनं, इक्विटी, फंड्स यांच दोन वर्गामध्ये विभाजन करायला हवं. ते म्हणजे सोनं आणि कर्ज यांच्यासाठी अनुक्रमे १०℅ व २०℅ आणि इक्विटीसाठी ७०℅ असं विभाजन करणं योग्य आहे.
 • अलिकडच्या काळात मालमत्ता वाटपामध्ये इक्विटी ची सर्वात जास्त शिफारस केली जाते. गोल्ड ईटीएफ वर्गाच्या काही कडक नियमांचा विचार केल्यास इक्विटी हा एकमेव योग्य पर्याय आहे. 

मालमत्ता विभाजनाचा दूसरा स्तर 

 • हा विभाजनाचा दूसरा प्रमुख स्तर आहे, यात कोणत्या प्रकारचे विभाजन केले जाईल याचा निर्णय झालेला असेल. 
 • समजा, तुम्ही इक्विटी मध्ये गुंतवणूक करत असाल आणि म्युच्युअल फंडाचा स्थिर पर्याय म्हणून विचार करत असाल, तर त्यासाठी लागणा-या रकमेचं नियोजन आणि स्टॉक पिकींगसाठी लागणारा वेळ व लागणारा निधी यांच योग्य प्रमाण आखण्यात यावे. 

मालमत्ता विभाजनाचा तिसरा स्तर

 • डायरेक्ट स्टॉक्स, म्युच्युअल फंडामध्ये किती गुंतवणूक करायची याचा निर्णय घेतल्यानंतरही वेगवेगळ्या इक्विटीचे वर्ग म्हणजे स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप या प्रकारांमध्ये विभाजन करता येते. 

मूल्य आधारित गुंतवणूक – समृद्धीचा महामार्ग

भौगोलिकदृष्ट्या मालमत्तेचे विभाजन 

 • रिअल इस्टेट क्षेत्राचा गुंतवणूकीसाठी विचार करत असाल, तर भोगोलिक गोष्टींना महत्त्व देणं गरजेचं असतं. विविध ठिकाणी मालमत्ता घेतल्यास गुंतवणूकीच्या पर्यायामध्ये विविधता येते. 
 • दैनंदिन गोष्टी जवळच मिळतात किंवा बाजार जवळच भरतो असा विचार करून मालमत्तेच विभाजन करू नये तर त्यामागे दूरदृष्टी असायला हवी. 

मालमत्ता विभाजनाचं महत्त्व-

खालील काही गोष्टींचा विचार केल्यास मालमत्तेच योग्य विभाजन होणं किती महत्त्वाचं आहे याची कल्पना येईल. 

१. हवे तसे फेरबदल करता येतात किंवा विविध पर्याय मिळतात –

 • असं म्हटलं जातं की, सगळी अंडी एकाच बास्केट मध्ये ठेऊ नये. तसंच आपल्या पोर्टफोलियो मध्ये मालमत्तेच विभाजन सुद्धा वर्गांमध्ये व्यवस्थित व्हायला हवं. 
 • कर्ज आणि इक्विटी या प्रकारातील मालमत्ता ही उलट दिशेने दर्शवण्यात येते. जेव्हा एक वाढतो तेव्हा दुसरा घटतो  , जेव्हा दुसरा पडतो तेव्हा पहिला वाढतो. म्हणून मालमत्तेच विभाजन करताना त्याचं विविधीकरण होणं गरजेचं आहे.
 • बाजारभावाच्या अनिश्चिततेपासून मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी विविधीकरण हा पर्याय महत्त्वाचा आहे.

२. रिस्क -रिटर्न ट्रेडऑफ

 • बहुतेक ठिकाणी, आर्थिक जोखीम आणि गुंतवणूकीवर परत मिळणारी रक्कम या दोन्ही गोष्टी प्रमाणात असतात.
 • या दोन्हींच प्रमाण संतुलित राहण्यासाठी मालमत्ता विभाजन महत्त्वाचं असतं. 

३. ध्येय आणि उद्दिष्टे यांच योग्य समीकरण 

 • आपल्या सर्व आर्थिक स्वप्नांना बळ देण्यासाठी आपण पैसा कमावतो, पैशाची बचत करतो, गुंतवणूक करतो. 
 • मालमत्ता विभाजन पद्धतीच्या सहाय्याने गुंतवणूक उद्दिष्टे साध्य करणे सोपे जाते. 
 • कष्टाने मिळवलेल्या पैशातून योग्य गुंतवणूक केली, तर जास्तीत जास्त रक्कम परत मिळू शकते. 

४. देखभाल कमी 

 • मालमत्ता विभाजनाच्या पद्धती वापरल्याने पोर्टफोलिओमध्ये होणारे बदल पाहण्यासाठी एकदा किंवा दोनदा पाहिलं तरी चालू शकतं. 
 • पोर्टफोलियोची योग्य सुरक्षा या पर्यांयाद्वारे घेण्यात येते.  वर्षातून एकदा याची पुनर्बांधणी करणं गरजेचं असतं. 

५. वैयक्तिक निवडीवर अवलंबून राहणं कमी होणे 

 • मालमत्ता विभाजन हा सर्वांच्या सोयीचा पर्याय आहे, परंतु वैयक्तिक निवडीबाबत काही संशोधन करून ‘रॉजर इबॉट्सन’ यांनी मांडलेल्या काही विरोधाभासी मताप्रमाणे, वैयक्तिक निवडीला अधिक महत्व दिल्यास प्रत्यक्ष मालमत्तेच्या वाटपाचं महत्त्व कमी होतं. निकालाचं महत्व वाढतं. 
 • काही किरकोळ गुंतवणूकदारांकडे वेळ, प्रयत्न आणि कोणत्यावेळी फंड उचलणे याची कमी असते. मालमत्ता वाटपाद्वारे वैयक्तिक निवडीनुसार केलेल्या बदल, आपण पोर्टफोलियो मध्ये आणू शकतो. 

तुमच्या गुंतवणुकीचा योग्य फायदा मिळवण्यासाठी मालमत्ता विभाजन ही प्रमुख गोष्ट आहे. पोर्टफोलियोच योग्य संतुलन मिळवण्यासाठी मालमत्ता विभाजन महत्त्वाचं असतं. 

– अपर्णा आगरवाल

(वरील लेख अपर्णा आगरवाल यांचा https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. अपर्णा या प्रमाणित आर्थिक योजनाकार (Certified Financial Planner) असून विविध आर्थिक विषयांवर तज्ञ ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात.त्यांना तुम्ही aparna@elementummoney.com या ईमेल आय.डी. वर आणि Elementum Money या फेसबुक पेजवर संपर्क करू शकता.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माफ करा, आपण हे कॉपी करू शकत नाही.