असेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात करा.

Reading Time: 2 minutes
 • जेव्हा जेव्हा शेयर बाजारामध्ये मोठी पडझड होते तेव्हा छोटे सामान्य गुंतवणूकदार आपला आत्मविश्वास गमावतात व पडझडीला घाबरून आपली गुंतवणूक काढून घेतात.

 • त्यात त्यांचे खूप नुकसान होते. असे हे नुकसान झालेले गुंतवणूकदार पुन्हा शेयर बाजाराकडे वळत नाहीत.

 • जर आपण शेयर बाजाराचा ३९ वर्षाचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येते की जेव्हा जेव्हा शेयर बाजारात मोठी पडझड झाली, त्यानंतर येणाऱ्या काळात शेयर बाजार अधिक जोमाने वरच्या पातळीवर येत राहिला.

 • सामान्य गुंतवणूकदार मग शेयर बाजाराकडे सट्टा किंवा जुगार म्हणून पाहतो व दूर राहतो. मात्र शेयर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे जुगार नसून, उत्तम कंपन्यांचे भागीदार होण्याची संधी असते.

 • जर आपण स्वतः कंपन्यांचा अभ्यास करू शकत नसलो तर आपण शेयर बाजारात म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करू शकतो.

 • म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स उत्तम कंपन्या शोधून आपले काम सोपे करतात. त्याच प्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये सर्व योजना या शेयर बाजाराशी संबंधित नसतात.

 • म्युच्युअल फंड आपल्याला साधारण ३६ प्रकारच्या योजना देतात. या योजनांची निवड आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार करायची असते.

 • जेव्हा आपण फक्त समभाग संबंधित ‘इक्विटी फंड’ मध्ये आपली सर्व गुंतवणूक करतो तेव्हा, शेयर बाजाराच्या उतरत्या काळात आपल्या गुंतवणुकीत घट येते व नुकसान होते. मात्र आपण डेब्ट/ हायब्रीड आणि इक्विटी फंड मध्ये आपली गुंतवणूक विभागली तर पडत्या बाजारात आपल्याला नुकसान कमी होते तसेच आपल्या डेब्ट किंवा हायब्रीड गुंतवणुकीतून बाजाराच्या खालच्या पातळीवर इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक वाढवण्याची संधी मिळते. ह्याची आपण सविस्तर माहिती मिळवू.

 • म्युच्युअल फंड च्या डेब्ट (debt) कॅटेगरी च्या योजना ह्या साधारणतः जास्त सुरक्षित मानल्या जातात. इक्विटी कॅटेगरी च्या योजना सर्वात जास्त जोखीम वाल्या मानल्या जातात. हायब्रीड कॅटेगरी मध्ये डेट व इक्विटी चे मिश्रण असल्याने हायब्रीड कॅटेगरी च्या योजना इक्विटी पेक्षा कमी मात्र डेब्ट पेक्षा जास्त जोखीमवाल्या असतात. जर आपण या तीनही कॅटेगिरी मध्ये आपली गुंतवणूक विभागली तर आपली जोखीम कमी होते. 

 • गुंतवणूक सल्लागार हे साधारण संख्या १०० वजा आपले वय इतकी रक्कम इक्विटी मध्ये गुंतविण्याचा सल्ला देतात. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचे वय ४० असेल तर त्याने ६०% रक्कम हि इक्विटी योजनांमध्ये गुंतवावी. मात्र वैयक्तिक जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार हे प्रमाण कमी अधिक असू शकते.

 • गुंतवणूकदार हे साधारण तीन प्रकारचे असतात, अधिक जोखीम घेणारे (अग्रेसिव्ह), कमी जोखीम घेणारे (मॉडरेट) व अजिबात जोखीम न घेणारे (कॉन्सर्व्हेटिव्ह) .

खालील तक्ता डेट / हायब्रीड / इक्विटी मधील ऍसेट अलोकेशन ची टक्केवारी दर्शवितो. वैयक्तिक जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार ही टक्केवारी बदलू शकते.

इक्विटी 

हायब्रीड 

डेब्ट

कॉन्सर्व्हेटिव्ह

३० %

१० %

६० %

मॉडरेट

३५ %

२० %

४५ %

अग्रेसिव्ह 

४५ %

२५ %

३० %

 • गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक सल्लागाराने आखून दिलेले ‘ऍसेट अलोकेशन’ कायम पाळले तर दीर्घावधी मध्ये आपली जोखमी कमी होऊन सातत्यपूर्ण परतावा मिळू शकतो.

 • आपल्या नजीकच्या काळातील गरजांसाठी आपण डेब्ट कॅटेगरी मधील गुंतवणूक काढू शकतो जेणेकरून आपल्या पूर्ण गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होणार नाही.

 • आपल्या ऍसेट अलोकेशन वर बाजारातील उतार चढावाचा परिणाम होत असतो. जेव्हा शेयर बाजार खूप वर असतो तेव्हा आपली इक्विटी अलोकेशन ची टक्केवारी वर जाते. त्यावेळी आपण इक्विटी मधील काही लाभ हा डेब्ट कॅटेगरी मध्ये वळवून आपली निर्धारित ऍसेट अलोकेशन पूर्वपदावर आणू शकतो.

 • तसेच जेव्हा शेयर बाजार खूप खाली असतो तेव्हा डेब्ट कॅटेगरी मधील टक्केवारी वर जाते, अशा वेळी काही रक्कम डेब्ट मधून इक्विटी मध्ये वळती करावी. असे करण्याने आपल्या गुंतवणुकीला शिस्त लागते. कारण जेव्हा शेयर बाजार वर असतो तेव्हा आपण आपल्याला झालेला लाभ काढून घेतो व जेव्हा शेयर बाजार खाली जातो तेव्हा न घाबरता आपण आपली इक्विटी मधील गुंतवणूक वाढवतो.

 • आपल्या आर्थिक सल्लागाराशी संवाद साधून आपला ‘ऍसेट अलोकेशन’ करून घ्या आणी शिस्तबद्ध गुंतवणूक करून म्युच्युअल फंडाचा लाभ मिळवा.

– निलेश तावडे

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2J1GS0E )

One thought on “असेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!