Indian Economy
Reading Time: 3 minutes

Indian Economy

कोरोनाच्या संकटाने संघटीत क्षेत्राला अधिक बळ दिल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसू लागले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) होत असलेला हा मोठा बदल असून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा या प्रवाहात भाग घेणे आता क्रमप्राप्त आहे. 

कोरोना आणि शेअर बाजार 

  • कोरोना संकटानंतर संघटीत क्षेत्र वेगाने पुढे जाणार आहे, याची चर्चा आपण पूर्वी केली आहे. मात्र ते इतक्या वेगाने पुढे जाईल, याची कल्पना कोणालाच आली नाही.
  • संघटीत क्षेत्र म्हणजे अर्थातच मोठ्या कंपन्या. त्यातील अनेक भांडवली बाजारात म्हणजे शेअर बाजारात लिस्टेड असतात. त्यातील काही कंपन्यांचे बाजारमूल्य गेल्या वर्षांत उच्चांकी वाढले आहे. कोरोना केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या अर्थकारणात मोठे बदल घडवून आणतो आहे. ज्याची आपल्याला दखल घ्यावीच लागणार आहे. 
  • भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराचा किती संबंध आहे, हा नेहमीचा चर्चेचा विषय राहिला आहे. 
  • शेअर बाजार उद्याच्या आशेवर चालत असतो तर देशाचे अर्थकारण अनेकदा वर्तमानातील आर्थिक प्रश्नांमध्ये अडकून पडलेले असते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था किती खालावली आहे, अशी चर्चा समाजात सुरु असते आणि ही स्थिती सुधारणार आहे, हे गृहीत धरून शेअर बाजाराने आपली वाट धरलेली असते.
  • कोरोनाच्या गेल्या सव्वा वर्षांच्या प्रवासातही नेमके तसेच झाले आहे. शेअर बाजार जरा जास्तच तापला आहे, असा इशारा रिझर्व बँकेचे शशिकांत दास यांनी दिला, पण त्यालाही शेअर बाजार घाबरला नाही

भारतीय शेअर बाजारातील काही उदाहरणे

  • भारतीय शेअर बाजारातील थेट काही उदाहरणेच आता आपण पाहू यात. कोविड संकटाच्या गेल्या एका वर्षांत भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांचे मूल्य तब्बल १.६८ ट्रीलीयन म्हणजे जवळपास भारताच्या एकूण जीडीपीच्या निम्म्यापेक्षा अधिक वाढले आहे. 
  • देशाचा जीडीपी लॉकडाऊनमुळे ७.३ टक्क्यांनी कमी झाला असताना ही किमया झाली आहे. 
  • केवळ शेअर बाजारातील कंपन्यांचे मूल्य वाढल्याने याकाळात अनेक गुंतवणूकदार करोडपती झाले. 
  • मार्च २०२० मध्ये शेअर बाजार कोसळला होता. त्यानंतर तो पुन्हा वर जाण्यास सुरवात झाली आणि वर्षभरात त्याने १२२.७७ लाख कोटी रुपयांची भर घातली, याचाच अर्थ गुंतवणूकदार तितके श्रीमंत झाले. 
  • बीएससीमध्ये नेहमी व्यवहार होणारे दोन हजार ३६८ शेअर आहेत, त्यातील एक हजार ४७४ कंपन्यानी या काळात १०० टक्के परतावा दिला आहे. यातील काही कंपन्या दुपटीने तर काही थेट २१ टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत. 
  • आता काही कंपन्यांची उदाहरणे पाहू. तानला प्लटफॉर्म नावाची सोफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी आहे, ती २२ टक्के वाढली आहे. तिचा मार्च २०२० मधील भाव ६२ रुपये होता, तो एका वर्षानंतर एक हजाराच्या घरात गेला आहे. 
  • इंटलेक्ट डिझाईन अरेना, सीजी पॉवरसारख्या कंपन्या याच काळात दहा पट वाढल्या आहेत. याचा अर्थ एखाद्याने यातील एक कंपनी हेरून तीत १० लाख रुपये गुंतविले असते तर तो आज एक कोटींचा धनी झाला असता! अर्थात, कोरोनाने शेअर बाजार कोसळल्यावर त्या कंपनीत इतके पैसे गुंतविणारा गुंतवणूकदार शोधून सापडणार नाही. पण याचा अर्थ ज्यांनी या कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले, त्यांना मोठा परतावा मिळाला आहे, हे नाकारता येत नाही. 

Indian Economy: शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था

  • अर्थात, हा बदल केवळ भारतात झाला आहे, असे मानण्याचे काही कारण नाही. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था सुस्तावली असल्याने तिला गती देण्यासाठी सर्व देशांच्या सरकारांनी तरलता वाढविली. म्हणजे पैसा सहजपणे उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केली. त्यामुळेच जगातील भांडवली बाजारांचे मूल्य तब्बल ३१ टक्के वाढले. 
  • भारतात ते त्याही पेक्षा अधिक वाढले एवढेच. 
  • मार्च २०२० ला भारतीय भांडवली बाजाराचे मूल्य १०१ लाख कोटी एवढे खाली आले होते, ते आज २३२ लाख कोटी एवढे झाले आहे. लोकसंख्या आणि गेल्या काही वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था लवकर वेग घेऊ शकते, असे परकीय गुंतवणूकदारांना वाटत असल्याने त्यांनीही याकाळात भारतात भरपूर गुंतवणूक केली आहे. आता हे आकडे काय सांगतात, हे अधिक महत्वाचे आहे. 
  • भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने संघटीत होत असून नागरिकांच्या गुंतवणुकीच्या सवयीही बदलत चालल्या आहेत, हे यावरून सिद्ध होते. भारतीय शेअर बाजार आज एका विक्रमी उंचीवर जाऊन उभा आहे. 
  • आजच्या परिस्थितीत ते आपल्याला पटत नसले तरी ती वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. ही स्थिती जर एखाद्या महिन्यापुरती मर्यादित असती तर आपण त्याकडे दुर्लक्ष केले असते, पण तो गेले किमान आठ महिने सातत्याने वर जातो आहे. त्यामुळे त्यात दिसणाऱ्या आशावादाची दखल घ्यावी लागते. 
  • अर्थात, त्याला केवळ आशावादही म्हणता येत नाही. कारण बहुतांश कंपन्यांचे आर्थिक निकाल अतिशय चांगले लागले आहेत. त्यात केवळ औषधी कंपन्या असत्या तर त्याकडेही आपण दुर्लक्ष केले असते, पण त्यात सर्व प्रकारच्या कंपन्या आहेत, हे लक्षात येते. 
  • या काळात किमान एक दीड कोटी गुंतवणूकदार शेअर बाजारात वाढले असून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्याही अशीच वाढती राहिली आहे. 
  • याचा अर्थ ही आता तात्कालिक बाब राहिलेली नसून त्याला काही आधार मिळतो आहे. या प्रकारच्या गुंतवणुकीवर भारतीय नागरिकांचा विश्वास वाढत चालला आहे, हेही त्यातून दिसून येते आहे. 

भारतीय बँकाविषयी आणि त्यात बुडणाऱ्या पैशांविषयी गेले काही वर्षे सातत्याने चर्चा सुरु असते आणि या बँकावरील नागरिकांचा विश्वास कमी होत असल्याचे बोलले जाते. मात्र बँकांइतकीही सुरक्षित न मानल्या जाणाऱ्या म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात जेव्हा नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात, तेव्हा नागरिकांचा आर्थिक पायाभूत सुविधेवर विश्वास नाही, हे आपले मत आपल्याला बदलावे लागते. याचा थोडक्यात अर्थ असा की अर्थव्यवस्थेत होत असलेले बदल भारतीय नागरिकही स्वीकारताना दिसत आहेत, हे महत्वाचे आहे. त्यामुळे त्याविषयीच्या शंकाकुशंकांना मनात ठेवण्यापेक्षा पुरेशी काळजी घेऊन आपणही या प्रवाहात भाग घेतला पाहिजे.

 – यमाजी मालकर

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Indian Economy in Marathi, Indian Economy Marathi mahiti, Covid impact on Indian Economy Marathi, Corona and Indian Economy Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.