Reading Time: 2 minutes

आपल्याकडे वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे. “Time is money” हे ऐकत आपण मोठे झालो आहोत. खरच वेळ इतका महत्वाचा आहे का? केवळ शिक्षण, साधना, अध्ययन, मेहनत याच बाबतीत नाही तर पैशाच्या बाबतीत देखील वेळ महत्वाचा असतो का? तर होय! पैशाच्या बाबतीत आणि त्यातही पैशाची गुंतवणूक करताना वेळेला खूप महत्व आहे.

तुम्ही कोणत्या वेळी गुंतवणूक करता या पेक्षा तुम्ही किती वेळ गुंतवणूक करत आहात हे फार महत्वाचे आहे. दीर्घकाळ गुंतवणूक तुमच्या सर्वचिंता निरसनाची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच, जाणून घ्या चक्रवाढ गुंतवणुकीत वेळेचे काय महत्व आहे.      

  • अमेरिकेचा प्रबोधनकार नेता, बेंजामिन फ्रँकलिन याचा जेव्हा १७९० मध्ये मृत्यू झाला तेव्हा त्यांनी बोस्टन आणि फिलाडेल्फिया या दोन आवडत्या शहरांना ५,००० डॉलरची भेट दिली. त्याने या पैशांची गुंतवणूक केली आणि भेट जाहीर केल्याच्या तारखेनंतर दोन विशिष्ट तारखांना दोन्ही शहरांना दिलेली ती भेट हस्तांतरित केली गेली.  
  • पहिल्या तारखेला १०० वर्षांनी आणि दुसऱ्या तारखेला २०० वर्षांनंतर पैसे काढले जाऊ शकत होती. १०० वर्षांनंतर,  सार्वजनिक शहरांच्या प्रकल्पांसाठी प्रत्येक शहराला ५०००,००० डॉलर काढण्याची परवानगी देण्यात आली. तर २०० वर्षांनंतर, १९९१ मध्ये त्यांना बाकी शिल्लक मिळाली. ती रक्कम प्रत्येक शहराला अंदाजे २० दशलक्ष डॉलर्स इतकी मोठी होती.
  • फ्रँकलिनचे उदाहरण आपल्याला गुंतवणुकीतील वेळेचे महत्व पटवून देते. फ्रँकलिनने स्वत: कंपाऊंडिंगच्या फायद्यांचे उदाहरण रचून जगासमोर या गुंतवणूक पर्यायाचा आदर्श उभा केला. पैश्याने पैसा जोडला जातो आणि जोडलेला पैसा आणखीन पैसा जोडतो.
  • गुंतवणूकीत वेळ खूपच महत्वाचा आहे. गुंतवणूकीचा प्रवास तुम्ही कितीश्या पैशाने सुरु करता याचा काही फरक पडत नाही. महत्वाचे आहे गुंतवणूक करत रहाणे. नियमित आणि गुंतवणूकीच्या शिस्तबद्ध अनुसूचीचे पालन करणे.

 वेळेचे महत्व-

दोन मित्रांचे उदाहरण घेऊया-

  • राहुल आणि अमित हे दोघे मित्र होते. दोघेही त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी नोकरीला लागले. नोकरी लागताच राहुलने तत्काळ दरमहा १० हजार रुपये, १० टक्के उत्पन्न देणाऱ्या योजनेत गुंतवायला सुरुवात केली.
  • अमित हा मजा करणारा मुलगा होता. अमितने आपल्या वयाची चाळिशी उलटेपर्यंत अजिबात गुंतवणूक केली नाही. ४१ व्या वर्षापासून मात्र त्याने राहुलसारखेच १० टक्के उत्पन्न देणाऱ्या योजनेत दरमहा १८ हजार रुपये गुंतवायला सुरुवात केली.
  • जेव्हा दोघे ६० व्या वर्षी निवृत्त झाले तेव्हा दोघांनीही गुंतवलेली रक्कम ४३ लाख २० हजार ही समान होती.
  • मुद्दलाची रक्कम सारखी असली तरी २५ व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करणाऱ्या राहुलला निवृत्तीच्या दिवशी मिळाले तब्बल ४ कोटी १४ लाख रुपये,तर अमितला मिळाले केवळ १ कोटी ३६ लाख रुपये. राहुलला अमितच्या तुलनेत चौपटीहून अधिक रक्कम मिळण्याचे कारण म्हणजे राहुलने गुंतवणुकीला लवकर सुरुवात केली.
  • मुद्दलावर कंपाउंडिंग होण्यासाठी राहुलने ३६ वर्षे दिली. ३६ वर्षे अखंड कंपाउंडिंगची प्रक्रिया होत राहिल्याने, दरमहा १० हजार रुपयांची लहान रक्कम गुंतवूनही राहुल एक धनाढय बनला.
  • दुसरीकडे अमित केवळ १५ वर्षे गुंतवणूक करत राहिला. त्याने राहुलपेक्षा खूपच अधिक रक्कम दरमहा गुंतवूनही अमितच्या हातात राहुलपेक्षा २ कोटी ७८ लाख रुपये कमी आले.
  • अमितने गुंतवणूक उशिरा सुरु करण्याची आणि त्यामुळे त्याने  गुंतवणुकीला कमी काळ देण्याची किंमत मोजली असे म्हणावे लागेल.  
  • राहुल आणि अमितची गोष्ट तक्त्याच्या स्वरुपात पुढील प्रमाणे आहे :

गुंतवणुकीला लवकर सुरुवात करणाऱ्या श्री. राहुल यांचे यश

तपशील          श्री. राहुल      श्री. अमीत
गुंतवणुकीला सुरुवात करतानाचे वय              २४ वर्षे         ४० वर्षे
दरमहा गुंतवलेली रक्कम             रु. १०,०००/-        रु. १८,०००/-
निवृत्तीचे वय       ६० वर्षे          ६० वर्षे
गुंतवणुकीचा कालावधी             ४३२ महिने         २४० महिने
उत्पन्नाचा दर              १०%          १०%
एकूण गुंतवलेल्या मुद्दलाची रक्कम            रु. ४३,२०,०००/-        रु. ४३,२०,०००/-
निवृत्तीवेळी मिळणारी रक्कम            रु. ४,१४,९४,७११/- रु. १,३६,३५,५९८/-

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2UESHiU )

 

चक्रवाढ व्याजाची जादू ,  आर्थिक नियोजनातून श्रीमंती

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.,

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…