Reading Time: 2 minutes

BSE – शेअर बाजारसाठी बीएसई ॲप

मुंबई शेअर बाजार (BSE) या आशियातील सर्वात जुन्या आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे ॲप गुगल स्टोअरवर उपलब्ध आहे.

भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

  • हे ॲप डाउनलोड करून क्लीक केले की होम पेज उघडण्यापूर्वी शेअरबाजाराची इमारत व ‘Experience The New’ ही ॲपची कॅचलाईन येते आणि होमपेज उघडते.
  • होम पेजवर डिफॉल्ट ऑप्शन म्हणून विविध इंडेक्स, सेन्सेक्स, कमोडिटी, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ दिसतील. परंतू ते आपल्या मर्जीप्रमाणे तयार करता येतील तसेच त्यांचा क्रमही बदलता येईल. होम पेजमध्ये  डाव्या बाजूस असलेल्या तीन आडव्या रेषा हा मेन्यू दाखवत असून त्यातून ॲप मध्ये प्रवेश करता येईल.
  • या शेजारी BSE चा लोगो असून त्याशेजारी माईकचे चित्र आहे. तो गुगलचा व्हाईस सर्च असून त्याद्वारे ॲपमध्ये हाताने टाइप करण्याऐवजी आवाजाचा वापर करून टाइप करता येईल. शेजारी सर्चसाठी दुर्बिणीचे चित्र दिले असून त्यामुळे शेअर, डिरिव्हेटिव, म्युच्युअल फंड/ ई टी एफ,  डिबेंचर आणि इतर गोष्टी यांचे भाव पहाता येतील. या बाजूला असलेले वर्तुळाकार बाण आपणास पहिल्या जागी म्हणजे आपण जेथून सुरुवात केली तेथे नेतील. या शेजारी तीन टिम्ब  आहेत. त्यावर क्लिक केल्यास एडिट वॉचलिस्ट/पोर्टफोलिओ, एडिट होमापेज, री ऑर्डर टेब, सेटिंग, अबाउट अस, हेल्प हे पर्याय दिसतील. यातील हेल्पला क्लिक केले असता होमापेज एडिट कसे करता येईल ते समजते. आपल्या गरजेनुसार ते करता येईल.

 शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

  • मेन्यूला क्लिक केले असता, होम, इक्विटी, इंडीसेस, सेन्सेक्स, एस एम इ , डिरिव्हेटिव, करन्सी, कमोडिटी, इंटरेस्ट रेट डिरिव्हेटिव, इ टी एफ, कॉर्पोरेट, मार्केट स्टेटेस्टीक, मार्केट टर्नओव्हर, आय पी ओ/ ओ एफ सी, लिस्टिंग, नोटिसेस, वॉचलिस्ट, पोर्टफोलिओ हे पर्याय दिसतील. यामुळे आपल्याला खालील अनेक प्रकारची माहिती मिळते.
    • ज्यांचे भाव वाढले / कमी झाले असे समभाग, ज्यांची उलाढाल जास्त झाली असे समभाग, त्याचा आधीचा बंद भाव, उलाढाल, 52 आठवड्यात उच्च आणि नीच किमतीचे समभाग यांचे भाव दिसतील.
    • विविध निर्देशांकांचे भाव, त्याचा बंद भावाशी संबध आणि टक्केवारीतील बदल समजेल.
    • यातून विविध सेन्सेक्स, त्यात समाविष्ट समभाग, त्याचा बंद भाव, त्यातील भावातील फरक, टक्केवारीत झालेला बदल, खरेदी / विक्री किंमत निर्देशांकाशी असलेला संबध समजेल. याशिवाय निर्देशांकांचा आढावा व आलेख दिसेल.
    • ज्या कंपन्या छोट्या आहेत त्यासाठी BSE ने एक वेगळी खरेदी विक्री व्यवस्था सुरू केली असून त्यांना बाजारातून भांडवल उभारणी करता येईल याची स्वतंत्र  व्यवस्था केली असून, त्यांचे भाव, झालेले सौदे, मागील भाव, त्यातील रुपयात पडलेला आणि टक्केवारीत पडलेला फरक आणि खरेदी विक्री संख्या दिसेल.
    • डिरिव्हेटिव कराराचे / करन्सीचे / कमोडिटीचे/इंटरेस्ट रेट डिरिव्हेटिवचे /ई टी एफ या सर्वांचे भाव, उलाढाल, मागील किंमत, त्यात रुपयात आणि टक्केवारीत पडलेला फरक, खरेदी विक्रीची संख्या दिसेल.
    • विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट बेनिफिट दाखवणाऱ्या सूचनांची माहिती मिळेल.
    • बाजारातील विविध आकडेमोड/ उलाढाल, विविध कंपन्या आणि संबंधितांच्या सूचना पाहता येतील.
    • आपण तयार केलेली वॉचलिस्ट आणि पोर्टफोलिओ या संबंधीची सर्व माहिती मिळेल.

 शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक,

नाविन्यपूर्ण अनुभव असे देणारे हे ॲप असून मार्केट व्यवहाराशी संबंधित सर्वांनी ते आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे. या ॲपची माहिती होण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला असून, मी हे ॲप डाउनलोड करून वापरत आहे व ते उपयुक्त आहे असे माझे मत आहे. ॲप निर्माण करणाऱ्या कोणाशीही माझा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक संबध नाही.

शेअर बाजार- विचार बदला……नशिब बदलेल !!!,   

– उदय पिंगळे

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Bw3Tp4 )

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. )

(Disclaimer:  https://arthasakshar.com/disclaimer/  

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.