Dharampal Gulati: MDH मसालेवाले आजोबा
चालू वर्षात म्हणजेच सन 2020 मध्ये अनेक लोकप्रिय व दिगग्ज व्यक्तींचे निधन झाले. आज अशाच एका लोकप्रिय व्यक्तीचे निधन झाले, ती व्यक्ती म्हणजे, MDH मसाल्यांच्या जाहिरातीतील ‘दादाजी’ धर्मपाल गुलाटी (Dharampal Gulati).
Dharampal Gulati: MDH मसाल्यांच्या जाहिरातीतील ‘दादाजी’
- MDH मसाल्यांच्या जाहिरातीत दिसणारे धर्मपालजी एखाद्या नामांकित मॉडेलइतकेच पेक्षकांना भावले. धोतर आणि पांढरा कुर्ता, त्यावर जॅकेट व डोक्यावर लाल पगडी घालून बसलेले आजोबा ही MDH मसाल्यांची खरी ओळख बनली.
- खरंतर धर्मपाल यांचे MDH मसाल्यांच्या जाहिरातीतील काम हे काही त्यांनी ठरवून केले नव्हते.
- या जाहिरातीत वधूचा पिता म्हणून दुसऱ्याच एका कलाकाराची निवड झाली होती. पण शूटिंगच्या वेळी मात्र तो कलाकार पोचू शकला नाही.
- शुटिंग थांबवण्यापेक्षा दिग्दर्शकाने धर्मपालजींनाच वधूचा पिता होण्यासाठी आग्रह केला. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि ते तयार झाले. त्यांनतर MDH मसाल्यांच्या प्रत्येक जाहिरातीत ‘दादाजी’ आपल्याला दिसले.
Dharampal Gulati: पूर्वायुष्य
- धर्मपाल गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ रोजी पाकिस्तानातील सियालकोट येथे झाला होता. अभ्यासाची त्यांना विशेष आवड नसल्याने त्यांचे शालेय शिक्षण केवळ पाचवी पर्यंतच झाले होते.
- शाळेत शिक्षक ओरडल्यामुळे त्यांनी शाळा सोडली आणि छोटी मोठी कामे करू लागले.
- सुरवातीला हार्डवेअरच्या दुकानापासून अगदी मेंदीच्या कामापर्यंत सर्व प्रकारची कामे त्यांनी केली.
- भारत- पाकिस्तान फाळणीच्या दिवसांत त्यांच्या कुटुंबाचे बरेच हाल झाले. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले आणि दिल्लीला स्थायिक झाले.
- दिल्लीमध्ये धर्मपाल यांनी सुरुवातीला टांगा चालवण्यापासून अनेक प्रकारची कामे केली.
- मसाल्याचा व्यापार हा जुना असल्याने, त्यामध्ये त्यांना यश मिळण्याची खात्री वाटली आणि त्यांनी मसाल्याचे दुकान सुरू केले.
- सुरुवातीला ९ बाय १४ फुटाच्या दुकानात सुरू झालेला व्यवसाय आज लंडन -दुबईपर्यंत सर्वदूर पसरला आहे।
Dharampal Gulati: टांगेवाला ते ‘मसाला किंग’
- मसाल्यांचे दुकान सुरू केल्यावरही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण तरीही धर्मापाल यांनी मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर या सर्वावर मत केली.
- मसाल्यांच्या व्यवसायात धर्मापाल यांचा चांगला जम बसू लागला. काही दिवसांतच ते ‘डेगी मीर्चवाले’ या नावाने प्रसिद्ध झाले.
- कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केला की यश तुमच्यापासून फार दूर राहत नाही, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे धर्मापाल गुलाटी. मसाल्यांच्या व्यवसायात त्यांची महाशियां दी हट्टी (MDH) ही मसाल्यांची कंपनी देशभरात प्रसिद्ध झाली.
- आज त्यांच्या कुटुंबाची तिसरी पिढी मसाला उद्योग यशस्वीपणे सांभाळत आहे.
Dharampal Gulati: पद्मभूषण पुरस्कार विजेते ‘दादाजी’
- धर्मपाल गुलाटी हे सन 2019 सकाळचे पद्मभूषण पुरस्कार विजेते होते. व्यापार आणि खाद्यप्रक्रिया क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले होते.
- समाजाप्रती असलेल्या आस्थेमुळे धर्मपाल यांनी अनेक शाळा आणि रुग्णालये सुरू केली. त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नाच्या जवळपास 90% उत्पन्न त्यांनी दान केले आहे.
- त्यांच्या समाजसेवेमुळे ते जनमानसात प्रचंड लोकप्रिय झाले आणि लोक त्यांना ‘दादाजी’ म्हणून ओळखू लागले. अगदी अलीकडेच करोना संसर्गाच्या काळात त्यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ७५०० पीपीई किट देखील उपलब्ध करून दिले होते.
- आपल्या आरोग्याच्याबाबतीत कमालीचे जागरूक असणारे दादाजी रोज पहाटे चार वाजता उठून 1000 पावले चालत असत, तसंच नियमितपणे योग करत असत. तरुणांना ते नेहमी प्रामाणिकपणा आणि चिकाटीने काम करायचा सल्ला देत असत.
काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. परंतु, त्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते. प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे गेले काही दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. आज पहाटे 5:39 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 98 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आर्य समाजासह देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies