Anugrah Karvy
https://bit.ly/39zonQA
Reading Time: 4 minutes

अनुग्रह /कार्वी (Anugrah / Karvy)

अलीकडेच दोन दिवसाच्या फरकाने अनुग्रह व कार्वी (Anugrah / Karvy) यांचे ब्रोकिंग लायसन्स सेबीकडून रद्द करण्यात आले. या दोन्ही ब्रोकिंग फर्मबद्धल गुंतवणूकदारांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. तरीही अगदी सुरुवातीला त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. काही दिवसात तक्रारी वाढल्या पण सेबीने सूचना देऊनही एक्सचेंजकडून याबाबत टोलवाटोलवी करण्यात आली. यानंतर अनुग्रहच्या गुंतवणूकदारांना उच्च न्यायालयातून संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धती विरोधात आदेश मिळवावे लागले. यानंतर एक दुसऱ्याकडे बोट दाखवून किंवा सारवासारव ही प्रकरणे दडपण्याकडे संबधित यंत्रणांचा कल असल्याने भांडवल बाजाराच्या विश्वासार्हतेवर शंका उत्पन्न होते. यातील सर्वात मोठा धोका हा एकदा की असा विश्वास तुम्ही गमावलात तर आज वाढलेला शेअरबाजार पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळायला वेळ लागणार नाही. 

हे नक्की वाचा: SEBI: सेबीला नक्की कुणाचे संरक्षण करायचे आहे? 

अनुग्रह /कार्वी (Anugrah / Karvy) :

  • या दोन फर्मच्या विरोधात एक्सचेंजने  ज्या दिवशी आदेश काढले त्याच आसपास 26 नोव्हेंबर 2020 रोजी सेबीच्या बाजार सल्लागार समितीची बैठक होती. 
  • ही समिती ब्रोकर्स, शेअरबाजार, गुंतवणूकदार, डिपॉसीटरी यांचे प्रतिनिधित्व करते. सेबीला सल्ला देण्याचे काम करते, सेबीच्या सूचनांवर विचार करून शिफारसी करते. 
  • या अनुषंगाने बाजारात झालेल्या वेगवेगळ्या सुधारणा यावर खरंतर या आठवड्यात लिहावे असा माझा  विचार होता. तो अर्धवट सोडून या विषयाचे गांभीर्य जास्त असल्याने मी यावर लिहीत आहे.
  • वरील दोन्ही फार्मच्या गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व पुराव्यांसह आपल्या तक्रारी आणि दावे संबंधित यंत्रणांकडे सादर करायचे आहेत. 
  • कार्वी विरोधात गेले वर्षभर कारवाई चालू आहेत. यासाठी आरबीट्रेटर नेमला फर्मच्या व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असून, त्याचा अहवाल सेबीला दिला गेला आहे, तर अनुग्रह विरोधात न्यायालयीन आदेशाने कंपन्या संचालक यांच्या मालमत्ता जप्ती यासारख्या कारवाया चालू असून विविध तपास यंत्रणा यांच्याकडून शोध घेत आहेत. 

अनुग्रह /कार्वी – गुंतवणूकदारांची भूमिका 

  • या सर्वच प्रकारात गुंतवणूकदार गोंधळून गेले असून अनेकांना आपल्या गुंतवणुकीच्या भवितव्याचा प्रश्न पडला आहे. 
  • याउलट काही गुंतवणूकदार इतके बेफिकीर आहेत की त्यांना आपल्या गुंतवणुकीची काळजी आहे का? असे वाटते. आज एवढे दिवस होऊन गेल्यावरही या लोकांना या फर्मच्या विरोधात अशी काही कारवाई चालू आहे याचा पत्ताच नाही. 
  • गुंतवणूकदारांनी जे शेअर्स मार्जिन म्हणून गहाण ठेवले होते त्याच्यासंबंधी तक्रार असल्यास ब्रोकर्स, शेअरबाजार आणि डिपॉसीटरी यांच्याकडून त्यांचे व्यवहार पत्र (Transaction statement) घ्यावे आणि स्वतः किंवा जाणकाराच्या मदतीने पडताळणी करून ब्रोकिंग फर्म आणि एक्सचेंज यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करावा. 
  • या फर्मची ब्रोकिंग लायसन्स एक्सचेंजने रद्द केली त्यामुळे डिपॉजीटरी ऍक्टनुसार या फर्म डिपॉजीटरी पार्टीसिपंट म्हणून काम करू शकत नाहीत. 
  • यासाठी सर्वप्रथम डिपॉसीटरी व डिपॉसीटरी पार्टीसिपंट या दोन्ही संकल्पना समजून घेणे जरुरीचे आहे. 
  • डिपॉसीटरी म्हणजे अशी संस्था जिथे आपले शेअर्स बॉण्ड युनिट्स हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवले जातात. 
  • सध्या NSDL व CDSL या दोन कंपन्याना डिपॉसीटरी म्हणून मान्यता आहे. 
  • डिपॉसीटरी पार्टीसिपंट म्हणजे यासंबंधीच्या आवश्यक सेवा देणारी मान्यताप्राप्त संस्था. थोडक्यात डिपॉसीटरी म्हणजे बँक असेल तर डिपॉसीटरी पार्टीसिपंट म्हणजे त्या बँकेचा एक्सटेंशन काउंटर होईल. 
  • आपली सर्व गुंतवणूक ही आपल्या डिपॉसीटरीकडे म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉसीटरी लिमिटेड किंवा सेंट्रल डिपॉसीटरी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडे असते.
  • डिपॉजीटरी पार्टीसिपंट होण्याची मुख्य अट म्हणजे संबंधित फर्मकडे ब्रोकिंग लायसन्स असावे लागते आणि डिपॉसीटरीच्या नियमांचे पालन करावे लागते.  
  • 26 नोव्हेंबर 2020 पासून या दोन्ही फर्मची डिपॉजीटरी लायसन्स रद्द करण्यात आली असून 11 डिसेंबर 2020 नंतर या खात्यांच्या संदर्भात त्यांना कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. 
  • या दोन तारखा कशासाठी? जर लायसन्स रद्द झाले तर आणखी 15 दिवसांची मुदत कशाला? अशी शंका अनेकांना वाटते? ती रास्त आहे. परंतू असे लायसन्स रद्द केले तरी गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी 15 दिवसांचा अवधी मर्यादित व्यवहार करण्यास करू देण्याची तरतूद डिपॉसीटरी कायद्यात आहे.

महत्वाचा लेख: शेअर ट्रेडिंग: मार्जिन प्लेज/ अनप्लेज नवे नियम, कोणास तारक? कोणास मारक? 

अनुग्रह /कार्वी (Anugrah / Karvy) – गुंतवणूकदारांनी काय करावे?

संबंधित डिपॉजीटरी पार्टीसिपंट खात्यात अनेक गुंतवणूकदारांचे शेअर्स, बॉण्ड, युनिट आहेत. अशा गुंतवणूकदारांनी गोंधळून न जाता –

  • 11 डिसेंबर 2020 पूर्वी आपल्या अशाच अन्य खात्यात हे सर्व शेअर वर्ग करावेत. 
  • जर असे खाते नसेल तर ते काढून घ्यावे. डिपॉजीटरी खाते सध्या आपल्याला घरबसल्या उघडता येते. यासाठी पॅन व आधार याची गरज असून ते एक किंवा दोन दिवसात कार्यान्वित (Activate) होते.
  • डिपॉजीटरी कायद्यातच बंद झालेल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटची खाती अन्य डिपॉजीटरी पार्टीसिपंटकडे हस्तांतर करण्याची तरतूद आहे. 

यानुसार आपल्या डिपॉसीटरीकडून अशी घोषणा 11 डिसेंबरपूर्वी होऊ शकते असे झाल्यास-

  • नवीन ठिकाणी आपण खाते ट्रान्सफर करायचे की नाही यासाठी गुंतवणूकदारांस 15 दिवसाची वाढीव मुदत मिळेल. 
  • या तारखेपर्यंत काही न कळवल्यास खाते हस्तांतर करण्यास संमती असल्याचे गृहीत धरून याप्रमाणे त्यातील शेअर्ससह नव्या डिपॉसीटरी पार्टीसिपंटकडे ती वर्ग करण्यात येतील. 
  • यासाठी गुंतवणूकदाराने काहीही करण्याची आवश्यकता नाही. यासंबंधीचे पत्र त्यास मिळेल.
  • डिपॉसीटरीने नियोजित केलेल्या पार्टीसिपंटकडे जायलाच पाहिजे अशी गुंतवणूकदारावर सक्ती नाही. 
  • या वाढीव कालावधीत ते आपल्या मर्जीनुसार खाते खोलून यातील होल्डिंग तेथे वर्ग करू शकतात किंवा डिपॉसीटरीकडे नकार कळवून नंतर सवडीने दुसरीकडे खाते उघडून मुदत संपल्यावरही आपले होल्डिंग नेऊ शकतील. 
  • जर आपल्या डिपॉसीटरीकडून अशी सोय झाली नाही आणि 11 डिसेंबर 2020 पर्यंत आपण यातील होल्डिंग ट्रान्सफर करून न घेतल्यास घाबरून जायचे कारण नाही. 
  • या तारखेनंतर ही सर्व खाती आपल्या डिपॉजीटरीकडून म्हणजे थेट NSDL किंवा CDSL कडून चालवली जातील. तेव्हा यानंतरही आपण त्यातील होल्डिंग आपल्या मनाप्रमाणे हवे तिथे घेऊ शकाल. आपले सर्व होल्डिंग येथे सुरक्षित असेल. 
  • सारखीच नावे असलेल्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात आपले होल्डिंग नेण्यात कोणतीही अडचण नसून यासाठी कोणताही आकार लागत नाही.
  • जे शेअर उदा. येस बँक ली. किंवा टॅक्स सेव्हिंग करता घेतलेले इ एल एल एस युनिट लॉक इन मध्ये असल्याने तीन वर्षे विकता येत नाहीत.  ते त्याच डिपॉसीटरीच्या डिपॉसीटरी पार्टीसिपंटकडे वर्ग करण्यात कोणतीच अडचण नाही मात्र दुसऱ्या डिपॉसीटरीकडे न्यायचे असल्यास वर्ग करण्याची विनंती ही त्या कंपनीस किंवा त्यांच्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीस द्यावी लागेल. कॉर्पोरेट ऍक्शन द्वारे ते शक्य आहे. 

या सर्व सर्वातून महत्वाचा बोध घेण्याची गोष्ट म्हणजे-

  • शेअरबाजाराच्या तपास यंत्रणा मुर्दाड असून यापुढे आणखी ब्रोकर्स डिफॉल्टर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे कितीही चांगला ब्रोकर असेल तरी आपल्या व्यवहारांबद्दल आपण जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.
  • ज्याप्रमाणे आपण आपल्या बँकेतील व्यवहार पासबुक अपडेट करून वेळोवेळी तपासत असतो त्याप्रमाणे आपले खरेदी केलेले शेअर्स मागणी केलेले पैसे वेळोवेळी योग्य मुदतीत आपल्या खात्यात येतात की नाही हे तपासून पाहावे. 
  • मार्जिन प्लेज / अनप्लेजचे शेअर्स खात्यातून वजा / जमा होतात की नाही तपासावे.
  • अनियमितता आढळल्यास प्रथम ब्रोकरकडे त्यानंतर एक्सचेंजकडे आणि सेबीकडे तक्रार करावी. 
  • ब्रोकर्स कडून आलेली बिले, मेल जपून ठेवावेत. आपल्या ब्रोकर्सकडील खात्याची, डी मॅट खात्याची तपासणी ऑनलाईन करता येते. तक्रारी ही ऑनलाईन करता येतात. 
  • आयत्या वेळी धावपळ करण्यापेक्षा स्वतःस शिस्त लावून घ्यावी.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…