बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक

Reading Time: 3 minutes

बचत आणि गुंतवणूक हे शब्द बऱ्याचदा समानार्थी वापरले जातातपण व्यावहारिक दृष्टीने पाहिलं तर आपल्याला सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी या दोघांचीही आवश्यकता असते

जेव्हा कधी आर्थिक विषयांवर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत चर्चा करतो, त्यातले जवळपास सगळेच आपल्याला असा सल्ला देतात, की महिन्याच्या शेवटी तुमच्यापाशी एक ठराविक रक्कम उरली पाहिजे. जेणेकरून, तुम्हाला तुमची सगळी देणी देऊन व दैनंदिनखर्च भागवून जी रक्कम हातात उरेल रकमेतून एकतर बचत करता येईल, किंवा गुंतवणूक करता येईल. पण मुळात या सगळ्याच गोष्टी बव्हंशी तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवरही अवलंबून असतात.

बऱ्याचशा गुंतवणूकदारांना बचत आणि गुंतवणूक यातला फरक समजत नाही. या दोघांचीही उद्दिष्टेही वेगवेगळी आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी या दोघांमधला मूलभूत फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे

बचत आणि गुंतवणुकीचे काही नियम

बचत म्हणजे काय?

 • आत्ताच्या घडीला आपल्या वापरात नसलेली ठराविक रक्कम ही आपत्कालीन स्थितीसाठी किंवा भविष्यातील खर्चासाठी बाजूला काढून ठेवणे म्हणजेच बचत होय
 • हा असा पैसा आहे, जो तुम्हाला ठराविक वेळी अगदी सहजगत्या उपलब्ध झाला पाहिजे. त्यात कोणतीही जोखीम असू नये आणि त्याच्यावर कमीत कमी कर लागू असावा
 • आर्थिक संस्था आपल्याला बचतीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देतात. त्याच्यामध्ये निरनिराळ्या सरकारी बचत योजना आणि इतर पर्यायांचा समावेश आहे. आर्थिक मंदीचा काळ पाहिलेले अनेक गुंतवणूकदार सुद्धा आपत्कालीन स्थिती साठी म्हणून काही प्रमाणामध्ये पैसे बाजूला काढून ठेवण्याचा सल्ला देतात

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?

पैसे गुंतवणे म्हणजे काय?

 • गुंतवणूक म्हणजे पैसे किंवा संपत्ती वापरून अशा मालमत्ता (Assets) विकत घेणे, ज्यामध्ये तुमच्या अभ्यासानुसार एक सुरक्षित आणि ठराविक दराने परताव्याची संभावना सर्वाधिक आहे. जेणेकरून आर्थिक मंदी किंवा आर्थिक अडचणीच्या काळात सुद्धा आपल्याकडे पैशाचा एक अविरत प्रवाह सुरू राहील
 • व्यावहारिक भाषेत अशा चांगल्या पर्यायांना प्रॉडक्टिव असेट्स असे म्हणतात, ज्यामध्ये समभाग, बॉण्ड आणि स्थावर मालमत्तेचा समावेश होतो

बचत म्हणजे सन्मानाने जगायचा सोपा मार्ग

सारांश –

 • या सगळ्या अभ्यासातलक्षात घेण्यासारखी बाब अशी की, तुमचा जो काही दैनंदिन खर्च आहे, त्यामध्ये तुमच्या कर्जांचे हप्ते, तारण म्हणून ठेवलेल्या गोष्टी, विम्याची किंमत, आपल्या दैनंदिन वापरातल्या सेवा आणि वस्तूंचा खर्च या सगळ्यांचा समावेश होतो
 • या सगळ्याची किंमत पुढील कमीत कमी सहा महिन्यांसाठी फेडता येईल किमान इतकी तरी बचत करा. त्यामुळे एकदा का याची निश्चिती झाली, की उद्या तरी काही कारणाने जरी तुमची नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन हातचे गेले, तरी तुमच्याकडे आयुष्यात कोणतेही अमुलाग्र, नकोसे बदल करता, काही काळ काढता येईल, एवढी शिलकी बाकी असेल
 • आयुष्यातले असे कोणतेही ध्येय, ज्याला पुढील पाच वर्षांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची गरज लागणार आहे, ते मात्र गुंतवणूक आधारित असण्यापेक्षा बचतीवर आधारित असावे. कारण छोट्या कालावधीसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक ही अतिशय दोलायमान ठरू शकते.
http://bit.ly/2vxYBKz

फरकाचे मुद्दे:     

. जोखीम – 

 • गुंतवणूक आणि बचत यांच्या मधला फरकाचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे जोखीम
 • जेव्हा तुम्ही तुमचे पैसे एखाद्या बचत खात्यामध्ये ठेवले, तर ते पैसे गमवण्याचा धोका हा अतिशय कमी असतो, पण त्याच वेळेला त्यातून मिळणार परतावाही फार लक्षणीय नसतो.
 • उलटपक्षीजेव्हा तुम्ही पैसे एखाद्या ठिकाणी गुंतवता, त्यावेळेला त्याच्यातून खूप चांगला परतावा मिळण्याची शक्यता जरी जास्त असली तरी तेवढ्याच प्रमाणामध्ये नुकसान होण्याची जोखीम सुद्धा असते

गुंतवणूक – कला का शास्त्र?

. परताव्याचा दर –

 • आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्याजाचा दर किंवा नव्याने उत्पन्न होणारा पैसा.  
 • गुंतवणूक करताना आपल्या पैशातून अधिक जास्त पैसा उत्पन्न व्हावा असे आपले उद्दिष्ट असते.  पण त्याच वेळेला बचत करताना आपल्याला आपला फक्त पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवायचा असतो.  त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात परताव्याची अपेक्षा नसते.

यशस्वी गुंतवणूक आणि बचत –

 • एक खूप यशस्वी गुंतवणूकदार होणे, संपत्ती मध्ये वाढ करणे आणि वेगवेगळ्या मालमत्ता कमावणे खरेतर सहज शक्य आहे. पण त्याचवेळेला दैनंदिन आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. कारण नजीकच्या काळातील आर्थिक खर्चावर आधारित खाचखळगे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने आपण नियोजन करत नाही
 • प्रत्येक आठवड्याला किंवा ठराविक कालावधीने काही रकमेची बचत जी तुम्ही करता करता, ते करणं योग्य तर आहेच, पण दीर्घकालीन विचार करता, त्या बचत केलेल्या पैशांमधून आपला निवृत्तीनंतरचा आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाचा किंवा इतर खर्च भागविण्याची क्षमता खूप कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित होते.  

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

वरील विवेचनातून आपल्या हे लक्षात आलंच असेल की बचत आणि गुंतवणूक अशा दोन्हीही बाबतीत काही ठराविक मुद्दे, त्यांच्या क्षमता आणि आणि कार्यक्षेत्रे असली तरी, यशस्वी आर्थिक नियोजनासाठी आणि सुरक्षित भवितव्यासाठी दोघांचीही तितकीच आवश्यकता आणि महत्त्व आहे

र्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *