Saving & Investment Rules
Reading Time: 3 minutes

Saving & Investment Rules

आपण मिळवलेल्या पैशाचे योग्य विनिमय करायचा असेल, तर सर्वात आधी बचत आणि गुंतवणुकीचे नियम (Saving & Investment rules) समजून घेणं आवश्यक आहे. हे नियम नक्की काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

नवीन लोकांना भेटणं आणि नवीन मित्र बनवणं याची मला आवड आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या जुन्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी एका व्हाटसप ग्रुप मध्ये मला ऍड केलं. त्या ग्रुपमुळे मी मुंबईतील बऱ्याच लोकांच्या संपर्कात आले. आम्ही थाई पद्धतीच्या जेवणाच्या निमीत्ताने भेटलो आणि बऱ्याच चर्चा झाल्या. उत्तम जेवण आणि वैयक्तीक वित्त व्यवस्थेबद्दल झालेल्या गप्पा माझ्यासाठी एक मेजवानीच होती.
त्यादिवशी बऱ्याच महिलांनी काही प्रश्न माझ्या समोर उपस्थित केले.

“मी किती बचत करावी?”

“मी किती गुंतवणूक करावी?”

“मी इक्विटीमध्ये किती रक्कम ठेवावी?”

या साऱ्या प्रश्नांची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असतात, असं मला वाटत. तरीही काही मुलभूत नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. यांना आपण थंब रुल्स (Thumb Rules ) म्हणू.

हे नक्की वाचा: काटकसर म्हणजे नक्की काय?

Saving & Investment Rules: बचत आणि गुंतवणुकीचे काही नियम

१. ७२चा नियम

 • माझ्या आवडत्या नियमांपैकी एक आणि कामाला येणारा महत्वाचा नियम आहे.
 • नियम- जर आपल्याला X वर्षांमध्ये गुंतवणूक दुप्पट करण्याची इच्छा असेल तर परताव्याचा (Return) आवश्यक दर तुम्ही x ला ७२ ने विभाजीत करून मिळतो..
  स्पष्टीकरण-
 • “७२ च का?” याचं उत्तर चक्रवाढ व्याजाच्या  जादूमध्ये आहे. ७२ आणि १०० मधील फरक चक्रवाढ पद्धतीने भरला जाऊ शकतो. हा नियम अंदाजे काम करत असला तरीही, आपल्या निर्णयावर बरेच यश अवलंबून आहे.
 • समजा, आपण ६ वर्षांमध्ये आपले गुंतवणूक दुप्पट करू इच्छित असाल तर रक्कम दुप्पट होण्यासाठी निदान १२% व्याज दर मिळायला हवा. हा एक प्रभावी नियम आहे.

२. उत्पन्नाच्या १०% उत्पन्न बचत करा

 • मत भिन्नता असली तरीही, निदान १०% बचतीचा सल्ला सगळेच देतात .
 • नियम- आपल्या बचतीच्या एक भाग म्हणून आपल्या उत्पन्नाच्या १०% बाजूला ठेवावे.
 • हे का शक्य होत नाही? हा नियम दुर्लक्षित करतो त्याची कारणे आहेत.
 • सर्वप्रथम, आपल्या पदावर आणि पगारावर या गोष्टी अवलंबून आहेत. मोठ्या शहरामध्ये खूप खर्च आणि कमी पगार या हिशोबात १०% बचत अशक्य वाटते. दुसरे, आपल्या जीवनातील स्थितीवरही अवलंबून असते.
 • आपण घरातील एकूलती एक कमावती व्यक्ती असाल, तर १०% बचत कठीण गोष्ट वाटेल. आपण नुकतेच कमावते झाले असाल आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असेल तर  ही बचत अशक्यच वाटेल. आपले ध्येय लिहून काढणे आणि त्यानुसार काम करणे ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे.

विशेष लेख:  काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला? 

३. जीवन विम्यासाठी वार्षिक उत्पन्नाच्या १० पट तरतूद

 • हा नियम बऱ्याचदा वापरला जातो. कारण बहुतेक लोकांना त्यांना किती रकमेचा जीवन विमा आवश्यकत आहे? हे समजत नाही. मलाही ती बरीच वर्ष कळली नव्हती.
 • नियम- आपण जेव्हा जीवन विमा खरेदी करतो तेव्हा तेव्हा त्याची भरपाई रक्कम आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १० पट किमतीची असावी.
 • अपवाद- या नियमात बरेच आक्षेप आहेत. ज्यामुळे जीवन विमा खरेदी करण्याचे काम जटिल होते.  विचार करा हा नियम ५५ वर्षांच्या एका व्यक्तीस लागू होईल का?- अर्थात नाही. हा नियम असंख्य प्रश्न विचारात घेत नाही, जसे –
  • आपण किती खर्च करता?
  • आपल्याला किती वर्षे खर्च करण्याची आवश्यकता आहे?
  • आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्यांना तुमची किती व किती वर्ष गरज आहे?
  • आपल्या घरात  आपण केवळ एकटे कमावते आहात किंवा आपला पती/पत्नी देखील कमावते आहे?
 • आपल्या कुटुंबासाठी जीवन विम्याची निवड करताना दोन चांगले मार्ग आहेत.
  • सर्वात आधी आपल्या आयुष्यभराच्या अपेक्षीत कमाईचे सध्याचे मूल्य लक्षात घ्या.
  • दुसरा मार्ग म्हणजे सर्व आर्थिक उद्दिष्टांचे वर्तमान मूल्य आणि आपल्या उर्वरित आयुष्यातील अपेक्षित खर्च विचारात घ्या.

४. निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम वार्षिक खर्चाच्या २५ पट

 • हा नियम मी नुकताच समजून घेतला आहे.
  नियम- सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम तुमच्या वार्षिक खर्चाच्या २५ पट असल्यास पुढील कित्येक वर्षासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या पुरेसे सक्षम असता.
 • हा नियम  श्रीमान मनी यांच्या ४% सुरक्षा दर नियम वर आधारित आहे. सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या निधीपैकी प्रत्येक वर्षी ४% इतकी रक्कम तुम्ही सुरक्षितपणे काढू शकता. असा विचार करा की, तुमचा २५ टक्के वार्षिक खर्च तुमच्या निवृत्ती निधीतूनच भागवला जातो..
 • अडथळे- हा नियम गृहीतकांवर अवलंबून आहे. निवृत्तीनंतर मिळणारा व्याजदर आणि महागाईचा दर. वेगवेगळ्या बाजारपेठेत वेगवेगळा दाखवला जातो. हे दराचे आकडे बदलतात तेव्हा पैसे काढण्याचा दर बदलतो आणि त्यामुळे सेवानिवृत्तीनिधीची आपली आवश्यकता देखील बदलते.

महत्वाचा लेख: पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

५. इक्विटीमध्ये ‘१००’ची गुंतवणूक करा

 • गुंतवणूकीच्या नियमांपैकी हा आणखी एक नियम आहे.
  नियम- हा नियम सांगतो की एखाद्या व्यक्तीने १०० च्या टक्केवारीत इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी. उदाहरणार्थ, ३० वर्षांच्या व्यक्तीने  इक्विटीमध्ये ७०% गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
 • अडथळे- प्रत्येक व्यक्तीची जोखीम घ्यायची तयारी वेगवेगळी असते. चांगला परतावा मिळविण्यासाठी काही लोक जास्त जोखीम घेतात. दुसरीकडे, नव्याने बाजारात गुंतवणूक करणारे तरुण धोका घेत नाहीत. उदाहरणार्थ, मी माझ्या टीमच्या सदस्यांना त्यांचे गुंतवणूक पोर्टफोलिओ बनविण्यात मदत करत होते. दीर्घ चर्चा केल्यानंतर, तिने असेट अलोकेशन (Asset allocation) व डेट फंड (Debt Fund) चे प्रमाण  ६०:४० इतके निश्चित केले. हे प्रमाण ती जास्तीत जास्त ४०:६० पर्यंत निश्चित करू शकली असती कारण तिचे वय फक्त २६ वर्षे होते.

इन्व्हेस्टोपीडिया म्हणतो की हे नियम आता कालबाह्य झाले आहेत. परंतु, आपण मुलभूतपणे अवलंबू शकता किंवा अनुभवाद्वारे समजला आहे असा दुसरा कोणताही थंब रूल नाही का? असल्यास आम्हाला जरूर कळवा.

– अपर्णा अगरवाल

aparna@elementummoney.com

(वरील लेख अपर्णा अगरवाल यांचा  https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. अपर्णा या Certified Financial Planner असून  आर्थिक तज्ज्ञ  तसेच ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना Elementum Money या त्यांच्या फेसबुक पेजवर संपर्क करू शकता.)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web Search: Rules of Saving & Investment Marathi Mahiti, Rules of Saving & Investment in Marathi, Saving & Investment Rules Marathi Mahiti, Saving & Investment Rules in Marathi, Saving & Investment Rules Marathi

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…