Reading Time: 3 minutes

जपानमधील ओकिनावा प्रांतातील लोक वयाच्या १०० वर्षांपर्यंत अतिशय आनंदाने निरोगी आयुष्य जगतात. काय कारण असावे? संशोधन केले असता ती लोकं इकीगाय (Ikigai) या प्रणालीचा वापर करून आपल्या जगण्याचा उद्देश ठरवितात आणि त्यानुसार अनुकरण देखील करतात. इकीगाय म्हणजे आपल्या आयुष्याचं मूल्य. असंच काहीसं गुंतवणूक करताना करावं  का? सामान्य माणूस गुंतवणूक करताना काय करतो? याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला.

गुंतवणूक ही कला आहे कि शास्त्र? असा प्रश्न तुम्हाला विचारल्यास तुमचं उत्तर काय असू शकेल?

  • खरंतर गेल्या १५ वर्षात आपल्याला माहितीचा प्रचंड स्त्रोत गवसला आहे. अगणित संकेतस्थळे, मोबाईल ॲप्स, कॅल्क्युलेटर्स, व्हिडीओज, दृक-श्राव्य जाहिराती, उरलेसुरले वर्तमानपत्रात येणारे लेख आणि या सगळ्यांमुळे आपल्या आजूबाजूस तयार झालेले मुक्त मोफत अर्थतज्ञ असा एवढा लवाजमा असतांना देखील समभाग निगडीत योजनांमधे गुंतवणूकदारांची संख्या वाढत नाहीये.
  • मार्च २०१७ च्या अखेरीस बचत व चालू खाते मिळून १५७.१० करोड बँक खाती अस्तित्वात होती. म्युच्युअल फंडात मार्च २०१९ अखेर १.५ करोड खात्यांची संख्या होती. म्हणजेच गुंतवणूकदारांची संख्या १% पेक्षाही कमी आहे.
  • सगळे भावी गुंतवणूकदार आभासी(Virtual) श्रीमंतीचा उपभोग घेताय असे म्हणण्यास वाव आहे. मानवी मेंदूचे ३ प्रमुख भाग असतात. यात मोठया मेंदूचे उजवा व डावा असे २ उपप्रकार आणि लहान मेंदू असे वर्गीकरण असते. उजवा मेंदू साठवणूक करत असतो, तर डाव्या मेंदूचे कार्य तर्क करण्याचे असते. लहान मेंदू कायम बचावात्मक पवित्रा घेत असतो. मानवाच्या उजव्या मेंदूत पैशांबाबत झालेली साठवणूक खूपदा नकारात्मक असते. त्यामुळे गुंतवणूकीचे निर्णय घेतांना बऱ्याचदा डावा मेंदू नकारात्मक तुलना करत असतो. आणि मग लहान मेंदू बचावात्मक पवित्रा घेतो.
  • मागील आठवडयात एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे (HDFC Mutual Fund) मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री.प्रशांत जैन सरांना भेटण्याचा योग आला. श्री.प्रशांत जैन गेल्या २५ वर्षांपासून एका म्युच्युअल फंड योजनेचे यशस्वीरित्या नियोजन करत आहे.
  • या योजनेने गुंतवणूकदारांना वार्षिक १८% दराने चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळवून दिले आहे. गुंतवणूक करतांना योजना, फंड घराणे, फंड व्यवस्थापक, गुंतवणूकीची वेळ की गुंतवणूक कालावधी यापैकी महत्वाचे काय? असा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर होते, “यापैकी एकही नाही.”
  • गुंतवणूक करतांना मत्ता विभाजन सर्वात महत्वाचे असते, असे त्यांनी सुचविले. योजना कमी अधिक परतावा देऊ शकतील परंतु मत्ता विभाजन गुंतवणुकीवरील परताव्यात २% पेक्षा अधिक फरक पडू देणार नाही.
  • बचत तुम्हाला गरीब होऊ देत नाही आणि गुंतवणूक संपन्न होण्यापासून थांबवू शकत नाही, अशा आशयाची एक म्हण आहे. सामान्य माणूस बचत कासवाच्या गतीने करतो पण श्रीमंत मात्र सशाच्या वेगाने होण्याचा प्रयत्न करतो. असं का होत असावं? कारण बचत ध्येय ठरवून केली जाते. त्या ठीकाणी बचावात्मक पवित्रा असतो. त्यामुळे परताव्याची फिकीर नसते. याच्या बरोबर उलट गुंतवणूक केली जाते.
  • परतावा हेच ध्येय समजून केलेली गुंतवणूक ही योजनेला मिळालेली प्रसिद्धी, आपल्या आजूबाजूस कुणी गुंतवणूक केली आहे यावरून ठरत असते. त्यामुळे गुंतवणूक कला देखील नाही आणि शास्त्र देखील नाही तर ती नक्कल असते. आणि नक्कल जास्त काळ टिकत नाही असे इतिहास सांगतो.
  • आज चाळीशीत असलेल्या पदवीधर पालकांचा एकूण शैक्षणिक खर्च आणि त्यांच्या पाल्याच्या शिशू विद्यामंदिरातील शैक्षणिक शुल्क समान आहेत. फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांना शुभेच्छा देताना पुढील मुद्द्याची जाणीव झाली. वडिलांनी त्यांच्या उत्पन्नातून आपल्या पाल्यांचे उत्तम शिक्षण व्हावे हेच गुंतवणूक भान ठेवले असेल. पण आता काळ बदलला आहे. तुम्हाला शिक्षणासोबत इतर न चुकवता येणारे खर्च सुद्धा करायचे आहेत. तेव्हा सजगता वाढवून भानावर येणे महत्वाचे.
  • विश्वचषकाच्या निमित्ताने “म्युच्युअल फंड सही है…” या अभियानाची आधुनिक व्यायामशाळेतील म्युच्युअल फंडातील डायरेक्ट गुंतवणुकीची जाहिरात सध्या चर्चेचा विषय आहे. शारीरिक कसरतीची आवड असणे आणि शरीर घडविण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असणे यातला फरक त्यात अधोरेखित होत नाही.

२१ जूनला जागतिक योगदिन आहे. माझ्याकडे किमान ४ पुस्तके व मोबाईलमधे यूटयूब असतांना देखील ६ महिन्यांचे ४,००० रुपये शुल्क भरून योगाभ्यासाचा क्लास लावलाय. सामान्य माणूस गुंतवणूक करतांना शाश्वती शोधत असतो. परंतु शाश्वत हा फक्त बदल असतो. सही है ना?

– अतुल प्रकाश कोतकर

– 9423187598

(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी atulkotkar@yahoo.com वर संपर्क साधून आपले प्रश्न विचारू शकतात.)

एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…