FinTech
Reading Time: 3 minutes

FinTech

गेल्या आठवड्यात डिजीलॉकर संबंधित लेखात, वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांचा (FinTech) उल्लेख आला होता. या कंपन्यानी डिजीलॉकर सोबत करार केला असेल तर त्यांना आपल्या ग्राहकाविषयीची माहिती, डिजीलॉकर कडून थेट मिळवता येते. त्यासाठी वेगळे कागदपत्र देण्याची  जरूर पडत नाही. यामुळे वेळ पैसा यांची बचतच होते. या फिनटेक कंपन्या म्हणजे काय? आणि भारतातील प्रमुख फिनटेक स्टार्टअप यांना समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करूया.

फिनटेक (FinTech):

 • फिनटेक हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे निफ्टी= एनएससी +फिफ्टी, सेन्सेक्स= सेन्सेटिव्ह+ इंडेक्स.
 • फिनटेक कंपन्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून वित्तीय क्षेत्रांशी संबंधित कार्य करत असतात. 
 • उदाहरणच द्यायचे झाले तर या कंपन्या अशा प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान विकसित करतात ज्यामुळे व्यक्ती व्यक्तीना एकमेकांना (P 2 P) पेमेंट करायचे असेल तर त्याचे खास अँप्लिकेशन्स बनवले जाईल ज्यामुळे हा व्यवहार सुलभ होईल. 
 • फिनटेक हा खूप व्यापक शब्द आहे. अलीकडे इलेक्ट्रॉनिक / डिजिटल व्यवहार वाढले असले जगभरात रोख रकमेचे अनेक व्यवहार होत आहेत. अनेक लोक बँकांना केंद्रित ठेवून त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करतात. यातील काही व्यवहारांसाठी शुल्क आकारणी केली जाते. जर असे व्यवहार सुरक्षित, झटपट व अत्यंत कमी खर्चात किंवा विनामूल्य झाले तर अधिकाधिक लोक त्याकडे आकर्षित होतील. हेच करण्याचे महत्वाचे कार्य या कंपन्या करत असतात.
 • फिनटेक कंपन्यां या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना महत्वाच्या सुविधा देत असतात. 
 • आजकाल प्रत्येकाकडे आपल्या मोबाईलमध्ये किमान एक तरी फायनान्शियल अँप आहे ज्यामुळे आपले जीवन सुसह्य होण्यास मदत झाली आहे. 
 • गुगल पे/ पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली असून अनेकजण अधिकाधिक कल्पकता आणून स्टार्ट अप उद्योग सुरू करीत आहेत व स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यास सरकारी प्रोत्साहनही मिळत आहे.

FinTech: ग्राहकांना देण्यात येणाऱ्या महत्वाच्या सुविधा 

 • पेमेंट देवाण घेवाणीची विशेष प्रक्रिया
 • ऑनलाईन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा
 • पी 2 पी पेमेंट सुविधा
 • फायनान्शियल सॉफ्टवेअरची निर्मिती
 • वित्तीय सेवा

FinTech:महत्वाचे फिनटेक स्टार्टअप 

लेंडिंगकार्ट (lendingkart): 

 • ही ऑनलाईन कर्ज देणारी कंपनी असून तिची स्थापना सन 2014 साली झाली. 
 • कर्ज देणे हा कंपनीचा व्यवसाय असून छोट्या आणि मध्यम उद्योगांना ही कंपनी विनातारण भांडवली साहाय्य देते. 
 • ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, कमीत कमी कागदपत्र  वापरून आणि जलद आहे.
 • उद्योजकाने कॅश फ्लो पेक्षा आपल्या उद्योगावर अधिक लक्ष केंद्रित करून प्रगती करावी असा तिचा हेतू असून अहमदाबाद, बंगलोर, मुंबई येथे त्यांनी कर्ज वितरण केले असले तरी संपूर्ण भारत त्यांचे कार्यक्षेत्र आहे.

मनी टॅप (Moneytap):

 • अँपच्या माध्यमातून छोटी आणि मध्यम कर्ज देणारी ही कंपनी सन 2015 मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून स्मार्टफोन आणि पॅन दिला असता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तुम्हाला किती कर्ज, स्पर्धात्मक व्याजदराने, एकसमान हप्त्यात द्यायचे ते ठरवून त्वरीत वितरित करते. 
 • आपली बँक तसेच ‘आपला ग्राहक ओळखा (KYC)’ व कर्ज मागणी ही ऑनलाईन तपासली जाऊन कर्ज मंजुरी होते. 
 • आपण वापरलेल्या कर्जावर व्याजाची आकारणी केली जाते. यास रिजर्व बँकेची मान्यता असून बिगर बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून तिची नोंदणी करण्यात आली आहे.

इंस्टामोजो (Instamojo):

 • सन 2012 ला स्थापन झालेली ही कंपनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज, उद्योग उभारणी, सुरुवात, विक्री, वसुली, बाजारपेठ आणि व्यवसायवृद्धी यासाठी वेब व मोबाइल प्लँटफॉर्म पुरवते. 
 • याशिवाय व्यक्तिगत उद्योग वाढीसाठीही स्वतंत्र साहाय्य करते.

रझोर पे (Razorpay):

 • पेमेंट देण्याघेण्यासाठी माफक फी आकारून छोटे उद्योजक सर्व प्रकारातून पेमेंट स्वीकारण्याचे पर्याय तो आपल्या संभाव्य ग्राहकांना देऊ शकतो.
 • यामुळे व्यवसायवृद्धीस मदत होते.

पॉलिसीबाजार (Policybazaar):

 • ग्राहकांच्या गरजेनुसार सर्व प्रकारच्या विम्याची तुलनात्मक माहिती आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे कोटेशन येथून मिळू शकते.
 • त्याप्रमाणे ऑनलाईन पॉलिसी काढून त्याचा प्रीमियमही येथून ऑनलाईन भरता येतो. जगातील टॉप इन्शुरन्स प्लेअरमध्ये या कंपनीची गणना होते.

शिक्षा फायनान्स (Shiksha finance):

 • ही कंपनी शैक्षणिक संस्थाना जागा खरेदी, बांधकाम करण्यासाठी, खेळत्या भांडवलासाठी कर्ज देते. 
 • तसेच, पालकांना त्याच्या पाल्यासाठी त्यांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक कर्ज देते.

पाईन लॅब्स (Pinelabs.com):

 • ही कंपनी छोट्या व्यावसायिकांना टॅप अँड पे या माध्यमातून सर्व प्रकारातून पेमेंट स्वीकारण्याची सेवा उपलब्ध करून देत आहे.
 • कंपनीने 3700 शहरातील 350000 व्यापाऱ्यांना पीओएस टर्मिनल उपलब्ध करून दिले आहेत.

इ पे लेटर (epaylater.in): 

 • ‘आज खरेदी करा, पैसे 14 दिवसांनी द्या’ हे या कंपनीचे घोषवाक्य आहे. 
 • अनेक उद्योग संस्थाशी करार करून कोणतेही छुपे खर्च न आकारता ग्राहकांना वस्तू आधी घेऊन पैसे नंतर देण्याचा या कंपनीचा व्यवसाय आहे.

या आणि यासारख्या अनेक कंपन्या व्यवसायवृद्धीस हातभार लावून आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करीत आहेत. आपल्या पेमेंट करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवत असल्याने त्यांचे महत्व अधोरेखित होते.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: FinTech Marathi Mahiti, FinTech in Marathi, FinTech Mhanaje kay

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.