DigiLocker
Reading Time: 5 minutes

DigiLocker -दस्तावेज साठवण्याची आधुनिक तिजोरी

डिजीलॉकर (DigiLocker) म्हणजे डिजिटल लॉकर. बँकेतील लॉकरमध्ये ज्याप्रमाणे आपण मौल्यवान वस्तू महत्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवतो, त्याचप्रमाणें या आधुनिक तिजोरीत, सरकारी विभाग आणि सरकारने मान्यता दिलेले आपले अधिकृत महत्वाचे दस्तावेज तसेच आपल्याला महत्वाची वाटत असणारी अन्य कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ओळखपत्रे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवता येतात. आवश्यकता पडल्यास यातील अधिकृत कागदपत्र मूळ कागदपत्रांसारखी वापरता येतात. अन्य व्यक्ती/ संस्था यांना संदर्भ म्हणून देता येतात. 

DigiLocker: डिजीलॉकर म्हणजे काय? 

  • सरकारने प्रत्येक भारतीयाला ही सेवा सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी आणि सूचना प्रोद्योगिक मंत्रालयाने (MEITY) 1 जुलै 2015 पासून उपलब्ध करून दिली आहे. 
  • आपली महत्वाची कागदपत्रे जसे आधार, पॅन, विविध गुणपत्रके, प्रमाणपत्रे इ. याचा वापर कागदविरहित पद्धतीने प्रत्येकाला करता यावा, वेळ व पैसा यांची बचत व्हावी त्याचबरोबर  पर्यावरणाचे रक्षण व्हावे असा यामागील हेतू आहे. 
  • हे एक पोर्टल असून तेथे विविध प्रकारचे दस्त सुरक्षित राहतील अशी जागा असून त्यासाठी क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर केलला आहे. 
  • आपली ओळख पटवून काही सूचनांचे पालन केल्यास आपल्याला अनेक गोष्टी विविध ठिकाणांहून घेऊन या ठिकाणी सुरक्षित ठेवता येतात. 
  • या सारख्या जारी केलेल्या महत्वाच्या गोष्टींसह आपल्याला स्वतःला उपयुक्त वाटत असलेले अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती आपण तेथे अपलोड करून साठवून ठेवू शकतो.

सध्या डिजीलॉकरच्या माध्यमातून-

  • केंद्र सरकारशी संबंधित 22 विभाग,
  • 36 राज्य सरकार संबंधित विविध विभाग,
  • 89 सरकारी, खाजगी आणि स्वायत्त शैक्षणिक क्षेत्रे संबंधित गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे,
  • बँकिंग आणि इन्शुरन्स संबंधित 32 सरकारी/ खाजगी आस्थापना,
  • 6 आरोग्यविषयक सरकारी/ स्वायत्त संस्था,
  • 5 संरक्षण विभागाशी संबंधित शैक्षणिक संस्था,
  • 6 इतर संस्थाशी संबंधित प्रवेशपत्र, ओळखपत्र, गुणपत्रक.

यांच्याकडील आपल्याशी संबंधित कागदपत्रे मिळवता येतात.

DigiLocker: डिजीलॉकर कसे वापराल?

  • याचा वापर लॅपटॉप किंवा पी सी मध्ये करायचा असल्यास  www.digilocker.gov.in या संकेतस्थळावर जावे अथवा प्ले स्टोअर/ ॲप स्टोअर वरून डिजीलॉकर नावाचे चित्रातील लोगोत दाखवल्याप्रमाणे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करावे. 
  • जर सरकारी किंवा डिजिलॉकर संबधीत संस्थांनी दिलेले कागदपत्रे हवी असल्यास आपल्या आधारशी जोडलेल्या मोबाइलद्वारे किंवा नको असतील तर आधार क्रमांकाशिवाय मोबाईलचा वापर करून हे ॲप सुरू करता येईल. 
  • येथे एक संकेतांक (OTP) पाठवला जातो. तो टाकल्यावर आपले खाते सुरू होते. 
  • अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे. याशिवाय काही खाजगी बँकांनी त्यांच्या नेटबँकिंग सेवेबरोबर डिजीलॉकर सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. 
  • ‘उमंग’ या सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ॲप मध्ये डिजीलॉकरची सोय आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून काही आर्थिक कंपन्यांनी (FinTech Company) डिजीलॉकरच्या सहकार्याने आपल्या ग्राहकांची सर्व प्रकारच्या कर्जाना आवश्यक असलेली कागदपत्रे थेट तपासण्यास सुरुवात केली आहे. 
  • ॲप चालू झाल्यावर त्याच्या होम पेजवर वरती डाव्या बाजूस एंटरच्या तीन आडव्या रेषा दिसतील यावर क्लिक केले असता चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल. 
  • यात Home, Issued Document, Uploaded Document, Scan or Code, Profile, About, Setting, Share, Help अशा विविध विंडोज दिसतील.

Home: 

  • यावर क्लीक केले असता आपण ॲप उघडले त्या ठिकाणी मागे जाऊ.

Issued Document: 

  • येथे क्लीक केल्यावर वरील सरकारी/ स्वायत्त/ खाजगी संस्थानचे विभाग, उपविभाग आहेत त्यावर जाऊन आपले कागदपत्र मिळवता येईल. 
  • प्रत्येक संस्थेची पद्धत आपल्याला अनुसरावी लागेल. उदा आधार हवे असल्यास त्याच्याकडून आलेला ओटीपी द्यावा लागेल. काही ठिकाणी फक्त नंबर दिला असता संबंधित कागदपत्र दिले जातात. 
  • या पद्धतीने मिळवलेली सर्व कागदपत्रे मूळ कागदपत्राच्या समान दर्जाची असून ती माहिती व तंत्रज्ञांन कायद्यानुसार (IT Act 2000)  कोणीही नाकारू शकत नाही. 
  • अशाप्रकारे मिळवलेली कागदपत्रे त्यासोबत येणाऱ्या पर्यायानुसार पाहता येतील, विविध माध्यमातून पाठवता येतील, PDF किंवा अन्य स्वरूपात डाउनलोड करता येतील, आवश्यक असल्यास त्याची अलीकडील कॉपी अद्ययावत करता येईल. त्याचा तपशील म्हणजे कोणते कागदपत्र, कुणी दिले, त्यांचा संदर्भ क्रमांक, कधी दिले ई. दिलेले असते.

Uploaded Documented: 

  • यात आपण स्वतंत्रपणे मिळवलेली कागदपत्रे साठवली जातात. 
  • याची खात्री पटवता येत नसली तरी विविध कागदपत्रे हाताळण्यापेक्षा संदर्भ म्हणून आपल्याला उपयोग होईल अशा गोष्टी येथे साठवून ठेऊ शकतो.

Scan or Code: 

  • येथे एक क्यू आर कोड असून त्यांचा वापर आपणास डिजीलॉकरच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या पत्राची सत्यता पडताळण्यास होतो.

Profile: 

  • येथे आपली म्हणजेच, वापर करणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती जसे ॲप वापरकर्ता म्हणून नोंदवलेले संकेत नाव, आपले नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाइल क्रमांक आणि नॉमिनी यांची माहिती असते.

About: 

  • यामध्ये डिजीलॉकरचे फायदे त्याच्या संबंधीचे सर्वसाधारण विचारले जाणारे प्रश्न (FAQ) व त्यांची उत्तरे, यासाठी वापरण्यात आलेली सॉफ्टवेअर, वापर करताना काही अडचणी आल्यास संपर्क आणि डिजीलॉकरच्या वापरातील आवृत्तीचा क्रमांक ही माहिती आहे.

Setting: 

  • यामध्ये जाऊन अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने 4 अंकी मोबाइल पिन आपल्या मर्जीनुसार सेट करता येणे शक्य आहे.

Share: 

  • या पर्यायात आपणास डिजीलॉकर ही संकल्पना आवडली असल्यास  हा सुयोग्य पर्याय असून याद्वारे आपण आपला आधार, पॅन, डायव्हिंग लायसन्स, आपली शैक्षणिक नोंदी डिजिटल पद्धतीने मिळवू शकतो  व एकाच ठिकाणी साठवू शकतो. 
  • माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार ही कागदपत्रे मूळ कागदपत्रांच्या बरोबरीची आहेत, ही माहिती विविध माध्यमातून आपल्या मित्र, हितचिंतक, नातेवाईक यांना कळवता येईल.

Help: 

  • येथे जाऊन जारी केलेल्या कागदपत्रातील त्रुटी किंवा अकाउंट आधारशी  लिंक करताना येणाऱ्या अडचणी कळवता येतील.

Logout: 

  • यावर क्लिक केले असता आपण यातून बाहेर पडतो पुन्हा जॉईन होण्यासाठी नव्याने लॉग इन करावे लागते. 
  • यातून लॉग आऊट झाल्यावर पुन्हा लॉग इन करायचे असल्यास वेळ लागतो. 
  • काही वेळा ॲप काढून टाकून पुन्हा डाऊनलोड करावे लागते काही वेळा ते हँग होत असेल तर युजर नेम बदलावे लागते. 
  • तेव्हा बाहेर पडण्याची खरोखरच आवश्यकता नसेल तर यावर क्लिक करू नये.

DigiLocker: डिजिलॉकरमध्ये  समाविष्ट करता येण्याजोगी महत्वाची कागदपत्रे –

  • कागदपत्रे:
    • सर्व प्रकारच्या विमा पॉलिसीचे करार, 
    • बँकांचे  फिक्स डिपॉजिट व पोस्टाच्या योजनांची प्रमाणपत्रे, 
    • डिपॉजिटरी स्टेटमेंट व म्युच्युअल फंड स्टेटमेंट, 
    • आयकर विवरणपत्र भरल्याची पोहोच, 
    • मालमत्ता कराची मागणी व भरल्याचे बिल व वीज बिल, 
    • निवडणूक ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मालमत्ता प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, पासपोर्ट यासारख्या सोई सर्वाना येथे उपलब्ध करून देता येणे शक्य आहे.
  • या गोष्टी मूळ स्वरूपात वापरताना एकाच वेळी काही किंवा सर्व गहाळ होण्याचा धोका असल्याने डिजिटल स्वरूपात घेणे सोईचे आहे.

मी स्वतः हे ॲप गेली 3 वर्ष माझ्या मोबाईलमध्ये वापरत असून त्यात जारी केलेल्या कागदपत्रात आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे आर सी बुक, गाडीची इन्शुरन्स पॉलिसी घेतली असल्याने तर त्याच्या मूळ प्रती जवळ बाळगण्याची जरूर पडत नाही. याशिवाय एलपीजी सबस्क्रिप्शन व्हाउचर, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, EPFO चे पेन्शन प्रमाणपत्र, लिव्ह अँड लायसेन्स ॲग्रिमेंट, कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र  डिजिटल स्वरूपात घेतले आहे. ज्याचा उपयोग मला गरजेनुसार करता येईल. अपलोड केलेल्या कागदपत्र विभागात मला महत्वाचे वाटलेले संदर्भ लागल्यास लगेच पाहता येतील असे विविध दस्त एकत्रित ठेवले आहेत. यामध्ये प्रत्येक नागरिकाला 1GB मर्यादेत डेटा साठवता येतो. प्रत्येक फाईलला 10 MB कमालमर्यादा असून पीडीएफ, जेपीईजी आणि पीएनजी प्रकारातील फाईल या किंवा याहून कमी आकारात पाठवली तरच अपलोड होऊ शकते. मोठी फाईल कॉम्रेस करून आकार कमी करता येतो त्याची माहिती जाणकाराकडून करून घ्यावी.

काही राज्यांनी आपल्या राज्यातील लोकांना यातील सुविधा अंशतः देऊ केल्या आहेत. तेव्हा भविष्यात या आणि अशा प्रकारच्या मूल्यवर्धित सेवा सुविधा देशातील सर्वानाच देता येतील का? यादृष्टीने विचार व्हायला हवा. लवकरच येथे डिजिटल स्वरूपात पासपोर्ट व त्यासंबंधीची सेवा उपलब्ध होणार असल्याचे संकेत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार व्यवहार खात्याच्या राज्यमंत्र्यांनी अलीकडेच दिले आहेत. डिजीलॉकरवर सध्या उपलब्ध असलेल्या सोयी उपयुक्त, सोप्या, सुरक्षित आणि विनामूल्य असल्याने आपण सर्वांनीच त्याचा वापर मुक्तपणे करायला हरकत नाही.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: DigiLocker in Marathi, DigiLocker Marathi Mahiti, DigiLocker mhanaje kay?, DigiLocker Marathi, 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.