गृह विम्याच्या या पाच गोष्टी माहीती असायलाच हव्यात

Reading Time: 3 minutes

नैसर्गिक आपत्ती कधीच कोणाला सांगून येत नाहीत. भूकंप,महापूर, वादळे, आग लागणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या काळात स्वतःचा जीव सहीसलामत वाचणे हे महत्वाचे आहेच. 

सध्या महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यात महापूराने थैमान घातले आहे. धुवांधार पाऊस आणि नद्यांची वाढलेली पाणी पातळी यामुळे गावाच्या गाव महापूराच्या पाण्यात बुडाली आहेत. यामध्ये सर्वात जास्त आणि मोठे नुकसान झाले आहे ते राहत्या घरांचे. 

घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. ही घरे पुन्हा नव्याने उभी करणे हे तर आव्हान आहेच पण अशा काळात घराचा उतरवणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे. 

‘घर’ ही तुम्हा-आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याची जागा आहे. ती जागा सुरक्षित करण्यासाठी आपण थोडीशी काळजी तर घ्यायलाच हवी. त्यासाठी आहे ‘गृह विमा पॉलिसी’! गृह विम्याचा लाभ घेताना खालील पाच गोष्टी अर्थात पंचसूत्री माहीत असायला हव्यात.

१. गृह विमा म्हणजे काय?

गृह विम्याचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे पायाभूत अग्नि विमा विमा पॉलिसी आणि दूसरा आहे सर्वसमावेशक विमा पॉलिसी. 

 • अग्नि विमा पॉलिसी:
  • अग्नि विमा पॉलिसीमध्ये घराचे पूर, वादळ, शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेली आग यामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश होतो. 
  • काही विमा कंपन्याचा विमा हफ्ता रक्कम ही जास्त असते. भूकंप आणि अति पावसामुळे जमिनीचे होणारे भुस्खलन अशा मोठ्या आपत्तीमध्ये तुम्हाला गृह विम्याचे अधिक सरांक्षण मिळावे यासाठी ही रक्कम अधिक प्रमाणात असते. 
 • सर्वसमावेशक गृह विमा पॉलिसी:
  • अनेकदा दहशतवाद, दंगे, हिंसाचार यादरम्यान घराचे नुकसान होण्याचा संभव असतो. जाळपोळ किंवा तत्सम घटनेवेळी घराची मोडतोड झाल्यास त्याची विमा रक्कम मिळण्यासाठी घरातील मालमत्तेचाही समावेश तुम्ही गृह विमा पॉलिसी मध्ये करू शकता. सर्वसमावेशक गृह विमा पॉलिसीमध्ये सर्वच गोष्टींचा समावेश होतो. 
  • या गृह विमा पॉलिसी मध्ये एखाद्याचे घर, त्याचे समान, घरातील वापरण्याचे समान, अतिरिक्त जीवनावश्यक वस्तु, तसेच एतर वैयक्तिक मालमत्तेची हानी याशिवाय घरमालकला होऊ शकणार्‍या अपघातचाही समावेश होतो. घराची मोडतोड, शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग याचेही संरक्षण या पॉलिसीमुळे मिळते.

२. घराच्या मालमत्ताचे एकूण बाजारमूल्य कसे ठरवाल?

घराचे मूल्य तीन प्रकारात ठरवले जाते. घरासाठी वापरली जाणारी जागा व तिचे क्षेत्र, इमारतीचे  बांधकाम आणि घराचा परिसर. विमा फक्त बांधलेल्या इमारतीचाच गणला जातो. 

 • जसे की समजा, जर तुमच्या घराची चालू बाजारभावनूसार किंमत १ कोटी एवढी असेल तर त्यातील ३० लाख एवढी रक्कम फक्त इमारतीची किंमत गणली जाते. त्यामुळे तुमची विमा पॉलिसी तुम्हाला फक्त ३० लाख इतके संरक्षण देते. 
 • तज्ञांच्या मते बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर शहरावर व परिसरावर आधारित तुमच्या इमारतीच्या बांधकामाचे मूल्य तुम्हाला सांगू शकतो. पण आपण घर कशा प्रकारचे खरेदी करतो यावरही विमा पॉलिसी अवलबून असते.
 • जर तुमचे जमिनीवरचे घर असेल आणि फक्त इमारतीचे बांधकाम वाहून गेले किंवा पडले तर घर आपण नव्याने बांधू शकतो. पण जर अपार्टमेंट असेल तर मात्र त्या अपार्टमेंटच्या सोसायटीने गृह विमा पॉलिसी घेतल्यास त्या अपार्टमेंटमधील लोकांना त्याचा फायदा मिळेल.
 • बाजार मूल्य निर्धारीत आणि उदभवणार्‍या परिस्थिति नुसार असा दोन प्रकारे गृह विमा घेऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही तुमचे घर चालू बाजार भावानूसार विकता तेव्हा तुम्हाला त्या घराच्या इमारतीसोबतच परिसरावर आधारीत घराची किंमत मिळत असते. 
 • विमाधारकाचे प्रतिवर्षाला घराचे बाजारभाव मूल्य २% घसरत असेल तर ते ५० वर्षात १००% एवढे होईल. पण जर विमाधारकाला घराची पुनर्बांधणी करायचे असेल तर त्याला विमा संरक्षण मिळताना ते बाजारमूल्यानुसार मिळते. 
 • एक लक्षात ठेवले पाहिजे की विमाधारकाला विमा पॉलिसी ही घर बांधल्यावरच काढता येते.

३. विमा उतरवला नाही तर काय होईल?

 • गृह विमा घेतलेल्या प्रत्येक विमाधारकाने विम्याची रक्कम, हफ्ता वेळेत आणि नियमितपणे भरला पाहिजे. तरच तुम्हाला गृह विम्याचे संरक्षण मिळणार आहे. अनेक विमाधारक थोडी किंवा विम्याची अर्धी रक्कम जमा करतात आणि उर्वरित रक्कम वेळेवर भरत नाहीत. 
 • तसेच पॉलिसी मध्येच बंद करतात. असे केल्यास विमाधारक उर्वरित विमा रकमेस स्वतः जबाबदार आहे, असे विमा कंपनी समजते आणि जेवढी रक्कम विम्यापोटी भरली असेल तेवढीच रक्कम विमाधारकास विमा पॉलिसीची कलमर्यादा संपल्यावर मिळते. जर इमारतीची मूल्य ५ लाखापर्यन्त असेल आणि ७.५ लाखपर्यंतची  विमा पॉलिसी खरेदी केली, तर २/३ एवढी रक्कम तुम्हाला भरायची असून २/३ रक्कम हक्कापोटी तुम्हाला भरावी लागेल.

४. या पॉलिसीला किती खर्च येईल?

 • घराचा आणि घरातील साहित्याचा विमा उतरवणे ही खूप महाग गोष्ट नाही. समजा जर घराची बांधकामाची विमा रक्कम जर ३० लाख असेल आणि घरातील इतर साहित्याची रक्कम ५ लाख असेल तर अग्नि विम्यासहित एतर विमा पॉलिसी चाही समावेश करून प्रती वर्ष फक्त २००० रुपये एवढा गृह विमा हफ्ता आकाराला जाईल.
 • घरफोडी आणि चोरी यासंदर्भात विमा काढल्यास प्रती वर्षी ३,१५५ रुपये एवढी रक्कम हफ्त्यापोटी भरावी लागेल. 
 • याशिवाय घरातील इतर जीवनावश्यक वापरायचे साहित्य तसेच विजेवर आधारित वस्तूची मोडतोड,बिघाड यासाठी ४ लाखपर्यंत विमा पॉलिसी काढल्यास प्रतीवर्ष ५,६००रुपये एवढी रक्कम हफ्त्यापोटी भरावी लागेल. 
 • यासाठी जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर लवकरात लवकर घरासाठी विम्याचे कवच जरूर घ्या आणि जर तुम्ही भाडेकरू म्हणून राहत असाल तर घरातील साहित्याचाही विमा उतरवायला विसरू नका

५. विम्याच हक्क मिळवताना नेमके काय होते?

 • आपण कष्टाने बांधलेल्या स्वप्नातील घरचा विमा उतरवणे खूप गरजेचे आहेच पण त्यासाठी हक्क सांगणे आणि तो मिळवणेही महत्वाचे आहे.
 • विम्याचा हक्क मिळवताना विमाधारकाने त्याचे जे काही नुकसान झाले आहे त्याची काटेकोरपणे शहानिशा केली पाहिजे. 
 • नुकसान कशामुळे झाले, कोणत्या प्रकारचे झाले, किती प्रमाणात झाले आणि कसे झाले याची शहानिशा करून त्यासंदर्भातील आवश्यक ते सर्व महत्वाचे पुरावे कागदपत्रांच्या स्वरुपात जोडणे आवश्यक आहे.
 • निकृष्ट दर्जाचे मांधकाम असल्यास किंवा नियमित देखभालीचे काम नसलेल्या तसेच अवैधरित्या बांधलेल्या घराचे नुकसान झाल्यास विमाधारक स्वतः विमाहक्क नाकारू शकतो.  

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत,

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!,

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]