Reading Time: 4 minutes

आज सकाळी मोबाईलवर बँकेकडून एक लघुसंदेश आला…

“Premium of Rs 12 is due in May 2019 for renewal of Pradhan Mantri Suraksha Bima Yojana. Please maintain sufficient balance in A/c for auto debit.”

सध्या डिजिटलच्या जमान्यात टेक्स्ट मेसेजेस वाचणे म्हणजे आपल्या राहणीमानात पदनावती करून घेण्यासारखे आहे.

मेसेज वाचत असतांना माझ्या मित्राच्या दुकानात काम करणाऱ्या संतोषची आठवण झाली. महिन्याकाठी मिळणाऱ्या पगारावर कुटुंबातील ५ जणांची पोटं भरणारा. धनी अचानक निघून गेल्यावर काय आबाळ होते, ते पाहणारा मी एक प्रत्यक्षदर्शी होतो. नंतर माझ्या मित्राने संतोषच्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी एकरकमी तरतूद करून दिली तो भाग निराळा. आशा करूया  की, त्या अप्रिय घटनेनंतर त्यांनी दुकानातील इतर कर्मचाऱ्यांना सरकारी विमा योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त केले असेल. पण सहज आणि स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या योजनांची आपण माहिती असून देखील अंमलबजावणी करत नसू तर त्यात दोष कुणाचा समजावा?

  • आर्थिक नियोजनातील सर्वात महत्वाचा भाग काय? सुरक्षितता की गुंतवणूक? अशी विचारणा करणारे ईमेल्स आणि फोन येत असतात. तेव्हा कमवित्या व्यक्तीने त्याच्या उत्पन्नाशी निगडीत असणाऱ्या जबाबदाऱ्या सुरक्षित करण्यासाठी केलेला खर्च, हा आर्थिक नियोजनातील सर्वात महत्वाचा भाग असायला हवा. शेवटच्या वाक्याचा अर्थ समजल्यावरच पुढील लेख वाचा.
  • मृत्यू हे जीवनातील एकमेव सत्य बाकी सर्व मिथ्य आहे, असं व.पु.काळेंनी लिहून ठेवलं आहे. परंतु मला काहीच होणार नाही, या अविर्भावात राहणे म्हणजे बुडत्याचा पाय आणखीन खोलात अशी अवस्था होऊ शकते. वित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.
  • शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी (Sum Insured) रक्कम विमा पॉलीसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास (Nominee) देय असते. विमा पॉलीसीची मुदत संपल्यानंतर विमा धारक हयात राहिल्यास विमा कवच बंद होते. परिणामी कुठलीही रक्कम देय राहत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नसून एक खर्च आहे. विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर कुठलाही दावा करता येत नाही, या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.
  • असं म्हणतात की, सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून योजनांची आखणी करत असते. सरकारने अतिशय कमी रकमेत दोन वैयक्तिक विमा योजना देऊ केल्या आहेत. आज आपण त्यांची माहिती करून घेऊ. परंतु किती अर्थसाक्षर लोक या योजनेचा लाभ घेत आहेत? हा संशोधनाचा विषय आहे. कारण सरकारी योजना म्हणजे वेळखाऊ काम अशी मानसिकता तयार करण्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. इतर वित्तीय योजनांची माहिती देणाऱ्या बँकेतील आर्थिक सल्लागारास या योजनांची माहिती विचारून अर्ज करूनच बँकेतून बाहेर पडायचं आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना:

ही भारत सरकारतर्फे प्रभावीपणे राबविली जाणारी मुदतीची शुद्ध विमा (Term Insurance) योजना आहे. या विमा योजनेची ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत.

  • प्रतिवर्ष ३३० रुपये भरून २ लाख रुपयांचे विमा कवच प्राप्त करण्यासाठी व्यक्तीचे वय १८ ते ५० आहे.
  • हे विमा कवच वयाच्या ५५ वर्षांपर्यंत सुरु राहते.
  • ही एक वर्ष मुदत असणारी शुद्ध आयुर्विमा योजना आहे.
  • विमा अर्ज मंजूर झाल्यापासून ४५ दिवसांनी दावा करता येऊ शकतो.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना:

ही भारत सरकारतर्फे प्रभावीपणे राबविली जाणारी अपघाती विमा (Personal Accidental Insurance) योजना आहे. या विमा योजनेची ठळक वैशिष्टये पुढील प्रमाणे आहेत.

  • प्रतिवर्ष १२ रुपये भरून २ लाख रुपयांचे अपघाती विमा कवच प्राप्त करण्यासाठी व्यक्तीचे वय १८ ते ७० (७० नजीकची जन्म तारीख) आहे.
  • अपघातामुळे कायमस्वरूपी पूर्णतः शारीरिक दुर्बलता आल्यास २ लाख रुपये तर अंशतः शारीरिक दुर्बलता आल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे.
  • हे विमा कवच वयाच्या ७० वर्षांपर्यंत सुरु राहते.

या दोन्ही विमा योजनांकरिता पुढील काही अटी व नियम आहेत.

  • या विमा योजनांची मुदत १ वर्ष आहे. त्यामुळे दरवर्षी नुतनीकरण आवश्यक आहे.
  • सरकारने या विमा योजनांचा कालावधी १ जून ते ३१ मे असा निर्धारीत केला आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक मुलभूत पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.
  • हे विमा कवच घेण्यास कुठलाही भारतीय नागरिक पात्र आहे.
  • या विमा योजना घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नसतो.
  • एकाच व्यक्तीची अनेक बँक खाती असली तरी कुठल्याही एकाच खात्यावरून विमा उतरविता येतो.
  • तांत्रिक कारणांमुळे विमा योजना खंडीत झाल्यास काही अटींची पूर्तता करून विमा योजना पुनर्जीवित करता येते.
  • या विमा योजना घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची आरोग्य चाचणी केली जात नाही.
  • तुम्ही इतर विमा योजना घेतल्या असतील तरी देखील या योजनांमधे सहभागी होऊ शकता.
  • या विमा योजना घेण्यासाठी बँकेचे पासबुक व आधार कार्डची छायांकीत प्रत सोबत नेणे अनिवार्य आहे.
  • जन-धन योजनेचे खाते असणारे ग्राहक देखील या योजनेसाठी पात्र आहेत.

अर्थसाक्षर होण्यासाठी सर्वप्रथम शुद्ध विमा,वैयक्तिक अपघाती विमा व कुटुंबासाठी आरोग्य विमा या ३ बाबींवर खर्च केला पाहिजे. दररोज १ रुपयांपेक्षाही कमी खर्च करून ५ ते ६ लाखांचे वैयक्तिक विमा कवच उपलब्ध असतांना त्याचा फायदा न घेणे याला पढतमूर्ख लक्षण नाही तर काय म्हणावे?

  • दररोज १.५ जीबी डेटा खरेदी करण्यासाठी अंदाजे ४.५० रुपये आपण सहज खर्च करत आहोत. हा खर्च मनोरंजन, आवश्यकता की गरज म्हणून करत आहोत, हे पडताळून पाहिल्यास या विमा योजनांचे महत्व जाणवेल.
  • ज्या व्यापारी किंवा उद्योजकांकडे कर्मचारी असतील त्यांनी दिवाळी भेट देतात तशी अर्थसुरक्षेची भेट म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यास स्वतःसोबत या दोन्ही विमा योजना खरेदी करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच ज्यांना अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असते त्यांनी बँकेत खाते असलेल्या १ किंवा २ व्यक्तींना या योजना खरेदी करण्यास हातभार लावल्यास नक्कीच समाज सेवेचे समाधान मिळू शकेल.
  • येत्या ३१ मे पर्यंत या दोन्ही विमा योजनांचा हफ्ता भरणाऱ्या व्यक्तीस पुढील १ वर्ष विमा कवच सुरु राहील. तेव्हा अर्थसाक्षर बनण्याच्या मोहिमेचे शिलेदार होतांना स्वतःसोबत अजून फक्त २ व्यक्तींना या आठवडयात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना घेण्यास आग्रह करावयाचा आहे. तुमच्या शेतात, दुकानात, ऑफिसात, कारखान्यात, दवाखान्यात, घरात काम करणारी ताई अशी कितीतरी आपुलकीची माणसं आपल्या अवतीभवती आहेत आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला देखील त्यांची काळजी आहेच. त्यांना नक्की आठवण करून सांगायचय. मग पुढच्या वर्षी त्यांना देखील असे लघुसंदेश येतील आणि ते पुन्हा २ व्यक्तींना अर्थसाक्षर करण्याच्या मोहिमेत सहभागी होतील.

गेल्या पंधरडयात दोन घटना घडल्या. पहिली जान्हवी मोरे नावाची उगवती कॅरमपटू वाहन चालकाच्या चुकीमुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडली. तर दुसरी घटना म्हणजे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिकांनी हेल्मेट वापरावे म्हणून शहराला छावणीचे स्वरूप आणले होते. असं का होत असावं? कारण सुरक्षितता ही आपली प्राथमिकता कधीच नसते ती असायला हवी. मग विचार कसला करताय?

अतुल प्रकाश कोतकर

9423187598

(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी [email protected] वर संपर्क साधू शकता.)

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत,

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!,

आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?,

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.