जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत

Reading Time: 3 minutes

जीवन विमा पॉलिसी आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अविभाज्य भाग तर आहेच शिवाय आजच्या युगात त्याकडे उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणूनही बघितले जाते. ही पॉलिसी केवळ मृत्यूपश्चात कव्हरेज पुरवत नाही तर तात्पुरते अथवा कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आल्यास त्यासाठीही या पॉलिसी अंतर्गत कव्हरेज मिळते. गुंतवणूक व कर-लाभ (Tax benefit) एकत्रीतपणे मिळवून देणारा एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणजे जीवन विमा पॉलिसी.

जीवन विमा पॉलिसी म्हणजे काय?

 • जीवन विमा पॉलिसीबद्दल माहिती नसणारं क्वचितच कोणी असेल. सोप्या शब्दात सांगायचं तर जीवन विमा पॉलिसी हा विमा कंपनी व ग्राहकांमधील (विमा खरेदी करणारा) एक करार आहे, ज्याद्वारे पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या नियम व अटींच्या आधारे धारकाला मृत्यूपश्चात अथवा ठराविक कालावधीनंतर अथवा ठराविक परिस्थितीमध्ये पैसे दिले जातात. अर्थात यासाठीच हप्ता (प्रिमिअम) ग्राहकाने नियमीतपणे भरणे आवश्यक आहे.

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार:

जीवन विमा पॉलिसीचे वेगवेगळे प्रकार आहे. प्रत्येक प्रकार हा मॅच्युरिटी, विमा कालावधी, इतर लाभ यानुसार ठरतो.

 • टर्म प्लॅन – शुद्ध जोखीम संरक्षण: सर्वसामान्यांना परवडणारी सर्वात स्वस्त अशी ही विमा योजना आहे. यामध्ये व्यक्तीच्या मृत्यूपश्चात विम्याची  रक्कम त्याच्या वारसास मिळते.
 • युनिट-लिंक्ड विमा योजना (युलिप) – विमा + गुंतवणूक संधी: या योजनेमधून विमा (Insurance) आणि गुंतवणूक (Investment) अशी दोन्ही उद्दिष्टही सफल होत असली तरीही या योजनेतून संपूर्ण विमासंरक्षण मिळत  नाही.
 • एंडॉवमेंट प्लॅन – विमा + बचत: या योजनेमधून विमा (Insurance) आणि बचत (Saving) अशी दोन्ही उद्देश सफल होतात. यामध्ये ठराविक काळानंतर बोनस मिळतो.
 • मनी बॅक (Money Back ):- यामध्ये अंशतः रक्कम करारात नमूद केलेल्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने परत मिळते आणि उर्वरित रक्कम अधिक बोनस हा मुदतपूर्तीच्या वेळेस मिळतो. यामध्ये करारात नमूद केल्याप्रमाणे विमासंरक्षण मिळते.
 • आजीवन विमा योजना (Whole Life Insurance):- यामध्ये संपूर्ण आयुष्यासाठी जीवन विमा संरक्षण मिळते. कालावधी जास्त असल्याने विम्याचा हप्ताही तुलनेने जास्त असतो.
 • मुलांसाठीच्या विमा योजना (Child Plan):- आपल्या मुलांसाठीही काही विमा योजना आहे. जसं शिक्षण, विवाह इ. पूर्ण करणे. अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी या विमा योजना मोलाची मदत करतात.
 • सेवानिवृत्ती योजना (Retirement Plan):- यामध्ये ठराविक कालावधीनंतर करारात नमूद केल्याप्रमाणे निवृत्तीवेतन मिळते.

जीवन विमा पॉलिसी आणि करबचत (Tax):

 • जीवन विमा पॉलिसीमध्ये केलेल्या  गुंतवणूकीसाठी इन्कम टॅक्स ऍक्ट १९६१,  कलम ८० सी च्या अंतर्गत करमाफी मिळते. कलम ८० सी, ८० सीसी आणि ८० सीसीई अंतर्गत जास्तीत जास्त रक्कम रु .१,५०,०००/-  पर्यंत करसवलत मिळते.
 • आयकर कायदा, १९६१  च्या कलम ८० सी अंतर्गत  
  • स्वतः
  • पती / पत्नी
  • अवलंबून असणारी (Dependent) मुले
  • अवलंबून असणारे (Dependent) पालक  

       या सर्वासाठी खरेदी केलेल्या जीवन विमा पॉलिसीवर  कर सवलत मिळते.

कलम १० (१० डी) च्या अंतर्गत जीवन विमा पॉलिसीच्या देयांवर कर वजावट:-

आयकर कायदा, १९६१ कलम १०(१०डी) अंतर्गत व्यक्तीच्या म्रुत्यूपश्चात नॉमिनीस (लाभार्थीस)  मिळणारी पॉलिसीची रक्कम अथवा विम्याच्या कालावधीची पूर्तता झाल्यावर (On maturity) मिळाणारी रक्कम व बोनस संपूर्णपणे करमुक्त आहेत.

कलम १०(१० डी)- काही महत्वाच्या गोष्टी:

खालील प्रकरणांमध्ये पॉलिसीची रक्कम (पेआउट्स) करमुक्त नाहीत:

 • जर जीवन विमा पॉलिसी १ एप्रिल २००३ रोजी किंवा त्यानंतर  परंतु ३१ मार्च २०१२ रोजी किंवा पूर्वी जारी केलेल्या कोणत्याही जीवन विमा पॉलिसीसाठी मृत्यू लाभ (Death benefit) वगळता इतर कोणतेही लाभ करमुक्त नाहीत.
 • जीवन विमा पॉलिसीच्या कालावधीमध्ये भरलेल्या हप्त्यांची  (प्रिमिअमची) रक्कम मॅच्युरिटीनंतर प्राप्त केलेल्या एकूण सम श्युअर्डच्या २०% पेक्षा अधिक असल्यास सेक्शन १०(१०डी) नुसार करसवलत मिळत नाही.
 • १ एप्रिल २०१२  रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसीसाठी  भरलेल्या हप्त्यांची (प्रिमिअमची) रक्कम मॅच्युरिटीनंतर प्राप्त केलेल्या एकूण सम श्युअर्डच्या १०% पेक्षा अधिक असल्यास सेक्शन १०(१०डी) नुसार करसवलत मिळत नाही.

महत्वाचे मुद्दे

 • ३१ मार्च २०१२ पूर्वी जारी केलेल्या  जीवन विम्यासाठी  कर कपात केवळ विमाराशीच्या जास्तीत जास्त २०% रकमेच्या प्रीमियमसाठीच लागू होते.
 • १ एप्रिल २०१२ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या जीवन विम्यासाठी  कर कपात फक्त विमाराशीच्या जास्तीत जास्त १०% रकमेच्या प्रीमियमसाठी लागू होते.
 • १ एप्रिल २०१३ रोजी किंवा नंतर जारी केलेल्या जीवन विम्यासाठी कलम ८०(यु) मधील तरतुदींनुसार अपंग  व्यक्तीच्या नावे अथवा कलम ८० (डीडीबी) मध्ये नमूद केलेल्या आजारांनी पिडीत असणाऱ्या व्यक्तीसाठी  विमाराशीच्या (सम श्युअर्डच्या) १५% करवजावट मिळते.
 • हिंदू अविभाजित कुटुंब (एचयूएफ) सदस्य देखील आयकर कायदा, १९६१  च्या कलम ८० सी अंतर्गत करवजावटीचा लाभ घेऊ शकतात.

सर्वसाधारण विमायोजना विविध प्रकार,

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!

आरोग्य विमा खरेदी करण्याची 8 महत्वाची कारणे

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *