DIY Excel Calculator
निवृत्ती नियोजन करताना एक्सेल कॅल्क्युलेटरची (DIY Excel Calculator) मदत घेतल्यास तुम्हाला निवृत्ती नियोजन करणं सहज शक्य आहे. आजच्या लेखात याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
एक दिवशी एका जवळच्या महाविद्यालयीन मैत्रिणीशी बोलत होतो, ती ही ‘एलीमेंटम मनी’ ची नियमित वाचक होती. आम्ही दोघीही वैयक्तिक नियोजनाचा सतत विचार करणाऱ्या, या वयात गुंतवणूक केलेली म्हणजे निवृत्तीच्या वेळेस कसे आर्थिकदृष्ट्या स्थिर असू याबद्दल आम्ही बोलत होतो. तेव्हा ती म्हणाली की ती कधीकधी एका गोष्टीबद्दल चिंतीत असते ती म्हणजे, “सेवानिवृत्तीसाठी किती गुंतवणूक पुरेशी असेल?”
तिला सोप्या भाषेत समजवण्यासाठी मी तिला काही आकडे विचारले जेणे करून तिच्यासाठी योजना करू शकेल. माझीच मैत्रीण असल्याने ती ‘स्वत: नियोजन करेल’ अशी इच्छा दर्शवली.
एलीमेंटम मनी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीच आहे हे मला लक्षात आले. त्यासाठी डीवायआय(DYI) अर्थात ‘स्वतः करा निवृत्ती नियोजन’ मार्गदर्शन वाचकांसाठी उपयुक्त ठरेल. तर, स्वतः करा स्वत: चे आर्थिक नियोजन!
हे नक्की वाचा: निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन
सेवानिवृत्ती योजनेची पूर्वकल्पना:-
- सेवानिवृत्ती नियोजन ही एक सोपी प्रक्रिया आहे. फक्त यामध्ये काही अवघड प्रश्न आहेत ते म्हणजे,
- नियोजन ‘किती काळा’साठी आणि ‘किती रकमेचे’ असावे?
- तुमच्यासाठी निवृत्ती घेण्याची आदर्श वेळ काय आहे?
- निवृत्तनंतरचे आयुष्य तुम्ही कश्या प्रकारे घालवू इच्छिता?
- आपले नियोजन बदलूही शकते त्यामुळे नियोजनासाठी पैसे कसे गुंतवावे? याचं नियोजन आणि आराखडा आपली डोक्यात असलाच पाहिजे. ते कसं करायचं ?
- निवृत्ती नियोजांचा विचार करणे हा एक चांगला अभ्यास आहे. आपल्या वयानुसार आवश्यक तितकी रक्कम आपण जमा करू शकतो का असा प्रश्न स्वतः ला विचारून गुंतवणुकीस सुरवात करा.
- खरंतर, संशोधनाअंती हे सिद्ध झालं आहे की जेव्हा आपण स्वतःकडे नीट बघतो तेव्हा सेवानिवृत्तीसाठी बचत करणे आणि नियोजन करणे अधिक गरजेचे आहे हे लक्षात येते.
- मला खात्री आहे की जितक्या तुम्ही सेवानिवृत्तीच्या कल्पना रंगवाल तितके तुम्ही भविष्यात रममाण व्हाल आणि त्या वेळेसाठी जास्त पैसे कसे मिळवता येतील आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील याचही काळजी घ्याल.
महत्वाचा लेख: तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा
सेवानिवृत्ती योजनेच्या 3 पायऱ्या:
माझ्या मैत्रिणीबरोबरच्या संभाषणानंतर मला जाणवलं की सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी ‘डीआयवाय एक्सेल गणनयंत्र (DIY Excel Calculator) कोणीही वापरु शकतो. आपल्या या यंत्राचा वापर करून सेवानिवृत्तीसाठी आपल्याला किती पैसे आवश्यक आहे याची कल्पना येईल आणि महिन्याला किती गुंतवणूक करणे गरजेचे आहे हे लक्षात येईल. पुढील ३ पायऱ्याचा वापर करा
१. निवृत्तीसाठी एक आदर्श वय ठरवा:-
- सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निवृत्ती कधी घेणार आहात? हे ठरवा. आपण ठरवत असलेले वय ६० वर्षापेक्षा अधिक नाही ना? हे निश्चित करा. जरी आपण कधीच निवृत्त होऊ इच्छित नसाल तरी आर्थिक नियोजन वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत पूर्ण केले पाहिजे.
- आपण अशा हजारो लोकांपैकी असू शकता ज्यांना वर्षानुवर्षे नोकरी करणे अजिबात पसंत नाही आणि जे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची वाट पाहत आहेत. तुम्हीही लवकर निवृत्त होण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजनाशिवाय इतर मार्गांचा विचार करा.
- निवृत्तीसाठी किती वर्षे बाकी आहेत त्यानुसार खर्च कसा बदलतो आणि नियोजन ही बदलावे लागते. साधारण ८५ व्या वर्षी पर्यंत लोक नियोजन करत असतात. तुमच्या साठी हे खूप जास्त असेल, काही हरकत नाही, उच्च रक्कम साठवून ठेवा आणि उर्वरित पैसे आपल्या पुढील पिढीला द्या किंवा दान करा.
२. सेवानिवृत्तीचा खर्च आज सारखा ‘दरमहा’ भाषेत सांगा:-
- आपल्या सेवानिवृत्तीच्या नियोजनात ही एक महत्त्वाची माहिती आहे. काही खर्च भविष्यामध्ये करावे लागणार नाहीत अस तुम्हाला वाटतं, जसे की मुलाचे संगोपन खर्च किंवा घर भाडे वा कर्जाचे हप्ते असे खर्च वगळता निवृत्तीनंतर साधारणपणे किमान आणि सरासरी किती मासिक खर्च होऊ शकतो, हे काही अचानक उद्भवणाऱ्या खर्चाचा विचार करून ठरवा.
- आज आपल्याला कदाचित गरज लागत नसेल, पण भविष्यात नक्की होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची रक्कमदेखील या नियोजनात विचारात घेतली जावी. बऱ्याच उतारवयातील लोकांना भेटले, त्यांच्याकडून मी ऐकलेला एक मुद्दा म्हणजे त्यांच्या वैद्यकीय खर्चाची होणारी अडचण. बऱ्याच आरोग्य विमा पॉलिसी सुद्धा या गरजा भागवण्यास अपुरे ठरतात म्हणून वैद्यकीय खर्चासाठी, रक्कम रू. १० लाख ची तरतूद यामध्ये आपोआप होते.
- महागाईचा विचार करून या खर्चात योग्य ती रक्कम वाढवली जाते.
३. इतक्या वर्षांमध्ये एकून गुंतवलेली रक्कम मोजा:-
- सेवानिवृत्तीसाठी ‘सिप’मध्ये (SIP) गुंतवणूक करताना, दोन मार्ग अवलंबू शकता. एक आपण पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) दर वर्षीसाठी ठराविक रक्कम ठरवून किंवा आपण आपल्या नोकरीतील बढतीचा विचार करून, दर वर्षी वाढीव रक्कम विचारात घेऊ शकता.
- माझा मत सांगायचं तर आपल्या ‘मासिक एसआयपी’ रकमेची निवड करा त्यासाठी “समतुल्य”(equal) तक्त्याची निवड करा. प्रत्येक महिन्यात ही ठरवलेली रक्कम गुंतवू शकता असे आपल्याला वाटत असल्यास, इतर खर्च भागवण्यासाठी तुमच्या वाढीव रकमेचा वापर करा.
- जर पहिला पर्याय तुम्हाला उपयुक्त वाटत नसेल, तर दुसरा पर्याय निवडा. पण त्याचवेळी वास्तववादी विचार करून सुरवातीला थोडी कमी रक्कम ठरवा.
- लक्षात ठेवा की या पद्धतीस जास्त शिस्त आणि आदर्श नियोजनासाठी एखाद्या व्यावसायिक सल्लागाराची गरज भासू शकते. पहिली पद्धत त्यामानाने खूप सोपी आहे ज्यामध्ये एकदा रक्कम ठरली की मग नंतर चिंता नसते.
विशेष लेख: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे
DIY Excel Calculator: एक्सेल कॅल्क्युलेटर कसे वापरावे?
यासाठी सर्वात आधी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अथवा लिंक कॉपी पेस्ट करून एक्सेल कॅल्क्युलेटर डाउनलोड करा.
यानंतर,
१. एक्सेल कॅल्क्युलेटर सुत्रावर आधारित आहे (जर सुत्रामध्ये एकाही चूक झाली तरी संपूर्ण पत्रक रद्द करा आणि पुन्हा डाउनलोड करा).
२. हिरव्या रंगाचे कॉलममध्ये या नियोजनात तुमच्या कडून अपेक्षित रक्कम घालणे आवश्यक आहे.
३.नारंगी रंगामध्ये महागाईचा किंवा परताव्याचा अंदाजे रक्कम भरा. उदाहरणार्थ, ५% महागाई दर, १२% (दीर्घकालीन पोस्ट टॅक्स इक्विटी परतावा) आणि सेवानिवृत्तीनंतरचे परतावा ८% गृहीत धरले गेले आहे. हे आकडे सर्वसाधारणपणे अंदाज लाऊन घेतले जातात आणि त्यानुसार आपलेही नियोजनाचा अंदाज लावता येतो.
४. जर तुमच्याकडे सेवानिवृत्तीसाठी काही निधी आधीपासूनच आहे, तर त्यास रकाना क्र. E3 मध्ये जोडा कारण ते पुढील वर्षांमध्ये त्यावर कंपाउंडिंग व्याज (Compounding Interest) मिळेल.
५. हे कॅल्क्युलेटर भारतीय चलनात वापरले जात असले तरी, ते कोणत्याही देशाच्या चलनासाठी काम करू शकते.
६. कोणतेही मोठे आव्हान पेलण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे आव्हान स्वीकारणे आणि त्यासाठी वचनबद्ध असणे.
तुम्ही ही पोस्ट वाचत आहात आणि या वेळी हा कॅलक्युलेटर डाउनलोड केला असल्यास तुमचे अभिनंदन! तुम्ही पहिली पायरी पार केली आहे. परंतु, एका नियोजित सेवानिवृत्तीसाठी सर्वोत्तम मार्ग शोधणे आणि नंतर या योजनेचा पाठपुरावा करणेही गरजेचे आहे.
– अपर्णा आगरवाल
(वरील लेख अपर्णा आगरवाल यांचा https://elementummoney.com/ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद आहे. अपर्णा या Certified Financial Planner असून विविध आर्थिक विषयांवर तज्ञ ब्लॉगर म्हणून ओळखल्या जातात. त्यांना तुम्ही [email protected] या ईमेल आयडी वर आणि Elementum Money या फेसबुक पेजवर संपर्क करू शकता.)
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
web search: DIY Excel Calculator info in Marathi, DIY Excel Calculator Marathi Mahiti, DIY Excel Calculator, DIY Excel Calculator Marathi