Arthasakshar शेअर बाजार गुंतवणूक
https://bit.ly/2Esyzwz
Reading Time: 3 minutes

शेअर बाजार गुंतवणूक – महत्वाच्या टिप्स

शेअर बाजार हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य कौशल्ये आणि ज्ञानाच्या बळावर शेअर बाजार हा संपत्ती निर्माण करण्यासाठीचा मोठा स्रोत बनू शकतो. शेअर गुंतवणुकीतून आश्चर्यकारक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या कथा सोशल मिडियावर दिसत असतात. तुमच्या गुंतवणुकीवर इक्विटीमध्ये जास्त उत्पन्न मिळवण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला पुढील घटकांचे अनुसरण करण्याची गरज आहे.

मूलभूत गोष्टी जाणून घ्या: 

  • हा एक वैश्विक नियम आहे. नव्या जगात प्रवेश करण्याकरिता त्या संदर्भातील मूलभूत गोष्टी जाणून घ्याव्यात. गुंतवणूकही त्याला अपवाद नाही. 
  • पहिल्यांदा तुम्ही विद्यार्थी बनणे आवश्यक आहे. प्रत्येक आवश्यक गोष्ट शिका लागेल. कारण ‘ज्ञान हीच शक्ती आहे.
  • शेअर बाजार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक संकल्पनांबद्दलच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. 
  • तुमचे डिमॅट खाते सांभाळणाऱ्या ब्रोकरकडूनही तुम्ही आवश्यक माहिती मिळवू शकता.

इंट्रा डे ट्रेडिंग : योग्य स्टॉक्सची निवड कशी कराल?

अचूक वेळ महत्त्वाची: 

  • गुंतवणुकीचा विचार केल्यास, योग्य वेळ हेच सर्वकाही असते. तुमची योग्य आरओआय (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) मिळवण्याची संधी पूर्णपणे यावर अवलंबून असते. 
  • असे म्हणताकी, शेअर्स जेव्हा अगदी निचांकी पातळीवर व्यापार करतात, तेव्हा बाजारात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, किंमती उच्चांकी स्थितीत असतात, तेव्हा बाहेर पडणे उत्तम असते. 
  • तुम्ही शेअर्सवर पैसा लावण्यापूर्वी तुमचा उच्चांक ठरलेला असावा. 
  • उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या शेअरवर १५ टक्के परतावा मिळवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. तुमची गुंतवणूक ज्यावेळी या पातळीला स्पर्श करेल, तेव्हा लोभी होऊ नका. 
  • हाच नियम नुकसानीच्या स्थितीतही लागू पडतो. तुमच्या आवडत्या स्टॉकवर ५ टक्के नुकसान होण्याची जोखीम असल्यास, त्या वेळेला विक्री करण्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करू नका.
  • दरम्यान, आपण गुंतवणुकीसाठी ज्या कंपन्यांची निवड केली आहे, ती अत्यंत योग्य असावी. 
  • आपण सुरक्षित व्यवहार करून प्रसंगी प्रोफेशनल ट्रेडर्स आणि विश्लेषकांचे अहवालही अभ्यासू शकता. 
  • असा दृष्टीकोन ठेवल्यास, आपल्याला बाजाराच्या कामकाजावर पकड घेण्यास मदत होईल. तथापि, गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी विवेकी विचार गरजेचा आहे.
  • उदाहरणार्थ, बऱ्याच वेळा, शॉर्ट टर्ममध्ये, बाजार आणि प्रोफेशनल ट्रेडर्स तात्कालिक अफवा आणि शेअर्सच्या खऱ्या मूल्यावर परिणाम न करणाऱ्या बातम्यांवर अवलंबून गुंतवणूक करतात.
  • गुंतवणूकदार म्हणून, इतर लोक जे करतात, तेच अनुकरण करण्याचा मोह आपल्याला होऊ शकतो. मात्र तुमचे बाजाराविषयीचे ज्ञान आणि शेअरच्या क्षेत्रांबद्दलचा दीर्घकालीन दृष्टीकोन तयार असेल तर इतरांपेक्षा जास्त परतावा मिळवता येईल.

शेअर बाजार – गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार?

गुंतवणुकीची रक्कम ठरवा: 

  • इक्विटीमध्ये तुम्हाला किती विस्तार हवा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. 
  • आपण तरुण गुंतवणूकदार असल्यास, तुमच्यासमोर अजून ३० वर्षे कामाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी जास्त पैसे गुंतवा. विविध क्षेत्रांशी संबंधित शेअर्सचा मोठा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. 
  • याउलट तुम्ही पन्नाशीत शेअर बाजारात प्रवेश केला तर खबरदारी बाळगणे, हेच महत्त्वाचे आहे. स्थिर परतावा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शेअर्समध्येच पैसा गुंतवा.

चुकांमधून शिका; चुकांमुळे निराश होऊ नका: 

  • तुमच्या पोर्टफोलिओचे नियमितपणे निरीक्षण करा आणि चुका ओळखा. 
  • या क्रियेमुळे भविष्यात एकच चूक पुन्हा पुन्हा करणे टाळता येईल. तसेच अधिक अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली पाहिजे, त्या व्यापारातून जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
  • प्रोफेशनल ट्रेडर्सदेखील चुका करतात. त्यामुळे चूक झाल्यावर निराश होऊ नका. 
  • सतत शिकत राहणे परिपूर्ण होण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक चूक म्हणजे अनुभवी गुंतवणूकदार होण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

शेअर्स खरेदीचं सूत्र

तुमच्या वित्तीय उद्दिष्टांबद्दल स्पष्ट रहा: 

  • गुंतवणुक करताना, तुम्ही आपले उद्दिष्ट आणि भविष्यात आपल्याला रक्कम पुन्हा कधी हवी आहे, त्याबद्दल  निश्चिती करायला हवी. 
  • तुम्हाला तुमचा आरओआय (ROI) काही वर्षातच हवा असेल, तर तुलनेने कमी अस्थिर असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. 
  • तुम्हाला दीर्घकालीन योजना हवी असेल, जसे की, तुमच्या मुलांचे परदेशात शिक्षण किंवा स्वप्नातील घर विकत घेणे, तर तुम्ही त्यानुसार, गुंतवणूक केली पाहिजे.

योग्य स्टॉक ब्रोकर कसा निवडावा?

महत्वाची सूचना: 

  • गुंतवणूकदार म्हणून, सेक्टर्स आणि शेअर्सबद्दल सखोल माहिती घेतानाच, तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा जाणून घेणेही आवश्यक आहे. 
  • सर्व कंपन्या लाभदायक नसतात त्यामुळेच तुम्ही चतुराईने निवड करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. 
  • आपण योग्य अभ्यास व प्रयत्न केले, तर एक चांगली सुरुवात करता येईल. यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसंबंधी जोखीम कमी करण्यास व यशस्वी होण्यास मदत होईल.

श्री. जयकिशन परमार, 

वरिष्ठ इक्विटी रिसर्च नलिस्ट, 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
1 comment
  1. Equity मार्केट ट्रेडिंग संबधी माहिती पुरवणारा नेमका कोणता NISM चा कोर्स करावा याची माहिती पुरवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…