काह-केह-बोह
https://bit.ly/2HktXKn
Reading Time: 3 minutes

दादा मामाचा काह-केह-बोह…..

काह-केह-बोह…..

ए “मिडलक्लास…” असा संवाद जेव्हा ‘माझा होशील का….’ या मालिकेत ऐकायला येतो तेव्हा तुमच्या मनात (मालिका बघत असाल तर) कुठली भावना निर्माण होते? आदित्यच्या तुटपुंज्या उत्पन्नाची, बरोबर ना? त्या मालिकेतील सर्व पात्र आपापली भूमिका न्याय्यपणे निभावताय. पण माझ्या व्यावसायिक चष्म्यातून लक्षात राहिलेले पात्र म्हणजे दादा मामा. तो इमाने इतबारे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसविण्याचा प्रयत्न करत असतो. रात्री झोपण्यापूर्वी रोजनिशी घेऊन पै-पै चा हिशेब जुळवत असतो. कशासाठी? कुटुंबाच्या दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीच ना?

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

काह-केह-बोह म्हणजे काय?

 • जपान हा देश शिस्तीचा देश म्हणून ओळखला जातो. परंतु या देशातील नागरीक हे वैयक्तिक आर्थिक शिस्तीकडे जास्त काटेकोरपणे लक्ष देतात.
 • स्वतःत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी कैझन असेल किंवा इकीगाई अशा विविध पद्धतीचं अनुकरण करत असतात.
 • अशीच बचतीची सवय वाढीस लागण्यासाठी जपानमधील पहिली महिला पत्रकार हानी मोटोको हिने “काह-केह-बोह” पद्धत विकसीत केली.
 • ही पद्धत मानसशास्त्रीयदृष्टया तुमच्या खर्चांच्या सवयींवर सकारात्मक संस्कार करण्याचा प्रयत्न करते. त्यातून तुम्हाला बचतीची सवय लागणे हे अंतिम उद्दिष्ट असते.
 • तसं पाहायला गेलं तर काह-केह-बोह पद्धती इतरांसारखीच जमा-खर्च किंवा वैयक्तिक ताळेबंद(बजेट) करण्यास सांगते. पण तिचा आग्रह दादा मामा सारखं हाताने लिहिण्याचा आहे.
 • त्यामागचा शास्त्रीय दृष्टीकोन असा की हाताने लिहिलेल्या गोष्टी मेंदूला निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. काह-केह-बोह अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ध्येय (गोल प्लानिंग) ठरवायला शिकविते. 

नवरात्र विशेष लेख क्र. २: आर्थिक नुकसानाचा ‘फोबिया’

काह-केह-बोह – सुरुवात कशी कराल?

१. मासिक उत्पन्नाचे स्रोत व रक्कम

२. निश्चित (फिक्स्ड) मासिक खर्च

३. या महिन्यात किती रक्कम बचत करणे अपेक्षित आहे?

४. कुठल्या इतर कारणांसाठी किती खर्च करायचा आहे?

 • वरीलप्रमाणे गोष्टी लिहून झाल्यानंतर आता आठवड्याचे बजेट करायचे आहे.
 • या आठवडयात कुठल्या वस्तू/सेवा/पिकनिक वगैरेचे खर्च करायचे आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार तुम्ही बजेट झाल्यानंतर तेवढे रोख पैसे बँकेतून काढायचे व त्यातून खर्च करायचा आहे.
 • ११६ वर्षांपूर्वीच्या पद्धतीत थोडासा बदल करता येईल.
 • एकाच बँकेच्या खात्यातून सर्व खर्च केल्यास खर्चांचा मागोवा घेणे सहज शक्य होईल. .
 • हे करत असतांना बचत किती झाली याचा हिशेब नुसताच ठेवायचा नाही, तर बचत केलेले पैसे बाजूला काढून ठेवायचे आहेत, असे काह-केह-बोहला अपेक्षित आहे.
 • यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडाच्या ओव्हरनाईट किंवा लिक्विड फंडाचा प्रभावीप्रमाणे वापर करू शकता.
 • बहुसंख्य लोकांना समजत असून देखील चुकीच्या आर्थिक सवयी बदलणे अवघड जाते. कारण आपण प्रत्येक कृतीशी भावनिकदृष्ट्या जोडलेलो असतो.
 • काह-केह-बोहच्या तत्वानुसार लक्षपूर्वक केलेले खर्च आणि लक्षपूर्वक केलेली बचत एकमेकांना पूरक असतात.
 • ही पद्धती आपल्याला खर्च करण्याची शास्त्रोक्त कला शिकविते. त्यात खर्च करतांना मुख्यत्वे ४ प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत.

काह-केह-बोह – ४ प्रश्न 

१. माझ्याकडे खर्च करण्यासाठी किती रक्कम आहे?

२. मला या महिन्यात किती रकमेची बचत करायची आहे?

३. मी प्रत्यक्षात किती रक्कम खर्च केली?

४. माझ्या सवयी सुधारण्यासाठी मी काय करू शकतो?

 • याची नोंद केल्यानंतर काही उप-प्रश्न स्वतःला विचारल्यास भावनिकतेला आवर घालून निर्णय घेणे अजून सोपे होते.
 • काह-केह-बोह फक्त जमा-खर्च लिहिण्याची चोपडी नसून ‘गरजा’ आणि ‘इच्छा’ यांच्यातील फरक दाखविणारा आरसा आहे.
 • पुढील प्रश्नांचे नीट अवलोकन केल्यास लक्षात येईल. ज्या वस्तू नाही खरेदी केल्या किंवा पुढे कधी तरी खरेदी केल्या तरी चालतील अशा गटात मोडत असतील त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल.
  1. मी या वस्तूंशिवाय राहू शकतो/शकते का?
  2. या वस्तू विकत घेण्यासाठी मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का?
  3. मी या वस्तूंचा प्रत्यक्ष वापर किती करणार आहे?
  4. माझ्याकडे नवीन वस्तू ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे का?
  5. मी ती वस्तू पहिल्यांदा कुठे पहिली? (जाहिरातीत/शेजाऱ्याकडे किंवा दुकानात)
  6. ती वस्तू विकत घेतांना माझी मानसिक/आर्थिक भावना काय आहे?

पैशाचा मूळ धर्म खर्च होणे (स्पेडींग) हाच असतो. केलेला खर्च कामी आला तर विनियोग नाहीतर….. सध्या फ्लिपकार्ट आणि अमॅझॉनवर ‘बिग बचत सेल’ सुरु झाले आहेत. आणि त्यांचे उपयोजनं तुमच्या मोबाईलमधून काढून टाका म्हणून सुद्धा मेसेजेस फिरताय. तुम्हाला काह-केह-बोह करून पाहण्याची ही नामी संधी आहे.

– अतुल प्रकाश कोतकर

94231 87598

atulkotkar@yahoo.com

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…