आर्थिक साक्षरता
https://bit.ly/3dyRnIj
Reading Time: 3 minutes

‘अ’ अर्थनिर्भरतेचा…

अर्थसाक्षर म्हणजे काय? असा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाचे उत्तर वेगळे असू शकेल. आर्थिक भाषेत त्याचे ढोबळ विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल. आर्थिक साक्षरता म्हणजे उपलब्ध पैशांचे मूल्य जाणणे व असलेल्या पैशांचा संपूर्ण क्षमतेने विनियोग करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे. अजून बारीक विचार केल्यास आपण आपल्या पैशांवर (उत्पन्न-खर्च-बचत-कर्ज-गुंतवणूक) व्याज दर, महागाई दर, विविध वित्तीय आरीष्टांमुळे निर्माण होणारी जोखीम यांचा काय परिणाम होऊ शकतो? याचा अभ्यास असणे म्हणजे आर्थिक साक्षरता. पण दुर्दैवाने आपण गुंतवणूकीवरील परतावा मोजता येणे यालाच आर्थिक साक्षरता समजण्याची चूक करत आहोत आणि आपल्या आजूबाजूस पाहिल्यास त्याची जबर किंमत मोजत आहोत, हे लक्षात येईल.

हे नक्की वाचा: आर्थिक नियोजन आणि पानिपतचा (अर्थ)बोध…… 

२०२० ची तिसरी तिमाही संपतांना –

 • २०२० या वर्षातील तिसरी तिमाही संपतांना वैयक्तिक आर्थिक पातळीवर काय परिस्थिती आहे? असा प्रत्येकाने विचार केल्यास काय झाकावे आणि काय उघडावे? अशीच वस्तुस्थिती असेल.
 • कोविड-१९ मुळे लागू झालेल्या टाळेबंदीत घरून काम करतांना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. 
 • उत्पन्न कमी तेव्हा खर्च देखील कमी, असं किती लोकांसोबत घडलं? याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण मध्यमवर्गीय कुटुंबांचे खर्च वाढलेच आहेत, हे सांगण्यास कुठल्याही आयोगाची गरज नाही. 
 • याच काळात २४ लाख नवीन डी-मॅट खाती उघडली गेली. या २४ लाख नव गुंतवणूकदारांनी समजा सरासरी प्रत्येकी ५०,००० रुपये गुंतविले असतील, तर किती रक्कम बाजारात आली असेल?
 • गुंतवणूक ही केलीच पाहिजे. पण वेळ किंवा पैसा आहे म्हणून करून पाहू असा विचार करून केली असल्यास त्याला काय म्हणावे?
 • विख्यात क्रिकेटपटू म्युच्युअल फंडाच्या जाहिरात करताना कमिशन वाचेल म्हणून डायरेक्ट प्लान सुचवितात किंवा स्टार अभिनेते विमा योजना ऑनलाईन खरेदी करण्यास सुचवितात.
 • खेळाडू घडविण्यासाठी प्रशिक्षकाची गरज असते आणि आर्थिक साधनं विकण्यासाठी वितरक किंवा सल्लागार नको, ही आपली अर्थसाक्षरता?

महत्वाचे लेख: आर्थिक नियोजन आणि सल्लागाराची भूमिका  

संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणूक

 • गुंतवणूक ही संपत्ती निर्मितीसाठी केली जात असते, हे तुम्ही खुपदा वाचलं वा ऐकलं असेल. मग आपण दीर्घकालीन केलेली गुंतवणूक कुठली?
 • थोडा वेळ काढून विचार करा आणि शोधून काढा. गुंतवणूकदाराची वर्तन चिकित्सा ही गुंतवणूकीतील महत्वाची बाब असते. तशीच गुंतवणूक साधनाची देखील वर्तणूक माहित असावी लागते. गुंतवणूक करतांना आपण कुठल्या निष्कर्षांवर निर्णय घेतो हे देखील महत्वाचे असते.
 • उदाहरण द्यायचे झाल्यास बरीच मंडळी विम्यात गुंतवणूक करतात. विमा हा तुमच्या आर्थिक जबाबदारीसाठी असलेले सुरक्षा कवच आहे, या विषयावर भरपूर लेख वाचून तसेच यू-ट्युबवर व्हिडीओज बघून देखील विम्यात का गुंतवणूक केली जाते? अवघड कोडं आहे.
 • सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अगदी काटेकोरपणे काळजी घेऊन देखील कोरोना विषाणू प्रत्येकाला स्पर्श करून गेला किंवा जातोय किंवा जाणार आहे.
 • आर्थिक नियोजनात आरोग्य विमा असला पाहिजे हे दुसऱ्यांना सांगणाऱ्या एका जवळच्या मित्राचा आरोग्य विमा नसावा, हे माहित झाल्यावर माझीच मला कीव आली.
 • अल्प कालावधी करिता “कोरोना सुरक्षा रक्षक” नावाची योजना बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वात आधी ज्यांनी घेतली त्यांचा दावा मंजूर झाला का? झाला असल्यास किती रक्कम कापली गेली? याची माहिती घेण्यात याला कधी लाख रुपये दवाखान्याचा खर्च झाला कळाले सुद्धा नाही.
 • एकदा ४-५ तरुण मित्रांच्या ग्रुपने एकत्र फोन करून टर्म इन्शुरन्सची माहिती घेतली. त्यातल्या एका तंत्रस्नेही मित्राने इतरांना सुचविले की सरकार विम्याचे हफ्ते कमी करणार आहेत, तेव्हा बघू. याच महिन्यात सर्व प्रकारच्या विमा हफ्त्यांचे प्रिमियम वाढवले. त्यांनी पुढे काय केलं? माहित नाही.
 • पैसे वाचविण्याच्या प्रयत्नात आर्थिक सुरक्षेचा निर्णय पुढे ढकलणे नक्कीच शहाणपणाचे लक्षण नाही. पैशांची बचत केली पाहिजे हा आर्थिक नियोजनाचा मुलभूत नियम आहे. पण कुठे आणि कसे? त्याचादेखील आराखडा असला पाहिजे.

लॉक डाऊनमुळे खूप चांगल्या आणि अभ्यासपूर्ण आभासी सभांना उपस्थित राहण्याचा योग आला. Past & Future of 20-20 या आशयाच्या एका आंतरराष्ट्रीय अर्थविश्लेषकांच्या सभेतील चर्चेचा सारांश पुढीलप्रमाणे होता. गेल्या २० वर्षात सामान्य गुंतवणूकदार संपत्ती निर्मिती करू शकला नाही. कारण त्यावेळी माहितीचा स्त्रोत मर्यादित होता. आणि पुढील २० वर्षात देखील सामान्य गुंतवणूकदार संपत्ती निर्मिती करू शकणार नाही. कारण अमर्यादित माहितीचा स्त्रोत त्याची निर्णय क्षमता कमकुवत करेल.

आपण या लेखमालेतून पुढील आठ लेखात आर्थिक नियोजनातील आठ उपयुक्त मुद्द्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. पण गॅलिलिओने सांगितल्याप्रमाणे “तुम्ही कोणालाही शिकवू शकत नाही. फार तर त्यांना त्यांच्या स्वभावाची ओळख करून देण्यात मदत करू शकता” हे लक्षात ठेवूनच…..

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अर्थनिर्भरतेच्या शुभेच्छा!

अतुल प्रकाश कोतकर

94231 87598

[email protected]

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

टीम अर्थसाक्षरतर्फे सर्वाना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा !

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.