आर्थिक नुकसानाचा फोबिया
https://bit.ly/3k7UqcX
Reading Time: 3 minutes

तुमचा बीटा काय?

आर्थिक नुकसानाचा फोबिया म्हणजे मनुष्याला सतत वाटणारी आर्थिक असुरक्षतेतीची भावना. ही भावना का निर्माण होते, कशी निर्माण होते यापेक्षा ती दूर कशी करायची हे जास्त महत्वाचे.

हे नक्की वाचा: नवरात्र विशेष: आर्थिक साक्षरता म्हणजे नक्की काय? 

आर्थिक नुकसानाचा फोबिया

  • मनुष्य हा भावनाशील प्राणी म्हणून ओळखला जातो. जन्माला येण्यापूर्वी त्याला आईच्या गर्भाचं सुरक्षा कवच लाभलेलं असतं. परंतु तो जन्माला येतांना भीती सोबत घेऊन येत असतो. भीती ही असुरक्षिततेची भावना असते.
  • कारण गर्भापासून अलग होणे म्हणजे आपली सुरक्षितता हिरावली जाणे, ही भावना वाढीस लागते. यालाच “फोबिया”ही मानसशास्त्रीय संज्ञा आहे.
  • एखादया घटनेने किंवा अनुभवाने (आभासी किंवा प्रत्यक्ष) मनात भीतीदायक विचार निर्माण होणे म्हणजे “फोबिया”.
  • बाह्य कारणांमुळे किंवा घटनांमुळे मनात भीती निर्माण होत असते. त्यांना तुम्ही कसा प्रतिसाद देता? यावर तुमची वर्तन चिकित्सा होत असते. आर्थिक निर्णय हे बहुदा तुलनात्मकरित्या घेतले जातात. कारण त्यात मिळविण्यापेक्षा गमविण्याची भीती जास्त असते. त्याला Fear Of Losing Out (FOLO) म्हणजेच ‘आर्थिक नुकसानाचा फोबिया’ असं म्हणता येईल.
  • तुमची मानसिकता तुमच्या सभोवताली कुठली माणसं वावरतात किंवा तुम्ही कोणासोबत राहतात, यावर अवलंबून असते. आर्थिक मानसिकता सुद्धा याच तत्वाने विकसित होत असते.
  • सध्या तुमचा मोबाईल तुमच्यासोबत जास्त काळ असतो. तेव्हा तुमचे सर्वाधिक निर्णय मोबाईल मधील उपयोजनं (Apps) घेतात, असे म्हंटल्यास चुकीचे ठरणार नाही.
  • ही सर्व माणसं किंवा उपयोजनं पर्याय सुचवू शकतात. पण निर्णय क्षमता कशी विकसित करावी? हे सांगणार नाही. त्यासाठी त्या क्षेत्राशी निगडीत व्यक्तीच तुम्हाला मदत करू शकते.

संबंधित लेख: आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब 

जोखीम घेण्याची क्षमता

  • एका गृपवरची चर्चा पुढीलप्रमाणे होती. ‘अ’ व्यक्तीला ‘क्ष’ रक्कम ५ वर्षांसाठी गुंतवायची होती. त्याने ग्रुपवर पोस्ट टाकली. त्याच्या प्रश्नाला दोन-तीन प्रतिक्रिया आल्या. त्याचा प्रश्न स्पष्ट होता पण त्याला मिळालेली उत्तरं प्रश्नाला पूरक नव्हती.
  • अर्थात ‘अ’ व्यक्तीचा उत्तरं देणाऱ्यांवर विश्वास असावा म्हणून त्याने विचारले असावे.
  • आर्थिक निर्णय घेतांना तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि अस्थिर वातावरणात मानसिक संतुलन जपण्याचे कौशल्य या दोन गोष्टी महत्वपूर्ण ठरतात.
  • त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीने अपेक्षित परतावा न देणे, हे आर्थिक असुरक्षिततेचे कारण ठरू शकत नाही.
  • माझ्या एका क्लायंटने नव्याने एकरकमी गुंतवणूक करायची आहे म्हणून कळविले. त्यांना “भारी” परतावा हवा होता. मी त्यांच्या जोखीम क्षमता आणि उपलब्ध गुंतवणूक कालावधीनुसार कशात गुंतवणूक करू शकता ते सुचविले.
  • त्यांचा निर्णय महिनाअखेरीस होणार होता. आणि त्याच दिवशी शेअर बाजार १,००० पेक्षा अधिक अंकांनी गडगडला. त्यांचा निर्णय काय असेल? मी सांगण्याची गरज नाही.
  • आर्थिक घडामोडींचा बारकाईने अभ्यास करणारा माझा मित्र पुष्कर कुलकर्णी नेहमीच अभ्यासपूर्ण माहिती शेअर करत असतो. त्याने पाठविलेली माहिती आहे तशीच देत आहे.

गेल्या ४ दशकांत गुंतवणूक करण्याच्या किती संधी चालून आल्या होत्या याची यादीच पुढे दिली आहे. 

1982 – 𝐖𝐨𝐫𝐬𝐭 𝐫𝐞𝐜𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐢𝐧 40 𝐲𝐞𝐚𝐫𝐬, 𝐝𝐞𝐛𝐭 𝐜𝐫𝐢𝐬𝐢𝐬.

1983 – 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐡𝐢𝐭𝐬 𝐫𝐞𝐜𝐨𝐫𝐝 – “𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐭𝐨𝐨 𝐡𝐢𝐠𝐡“.

1984 – 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝 𝐔.𝐒. 𝐅𝐞𝐝𝐞𝐫𝐚𝐥 𝐝𝐞𝐟𝐢𝐜𝐢𝐭𝐬.

1985 – 𝐄𝐜𝐨𝐧𝐨𝐦𝐢𝐜 𝐠𝐫𝐨𝐰𝐭𝐡 𝐬𝐥𝐨𝐰𝐬.

1986 – 𝐃𝐨𝐰 𝐧𝐞𝐚𝐫𝐬 2000 – “𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐭𝐨𝐨 𝐡𝐢𝐠𝐡

1987 – 𝐓𝐡𝐞 𝐂𝐫𝐚𝐬𝐡𝐁𝐥𝐚𝐜𝐤 𝐌𝐨𝐧𝐝𝐚𝐲.

1988 – 𝐅𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐑𝐞𝐜𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧.

1989 – 𝐉𝐮𝐧𝐤 𝐁𝐨𝐧𝐝 𝐜𝐨𝐥𝐥𝐚𝐩𝐬𝐞.

1990 – 𝐆𝐮𝐥𝐟 𝐖𝐚𝐫, 𝐰𝐨𝐫𝐬𝐭 𝐦𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐝𝐞𝐜𝐥𝐢𝐧𝐞 𝐢𝐧 16 𝐲𝐞𝐚𝐫𝐬.

1991 – 𝐑𝐞𝐜𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧 – “𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐭𝐨𝐨 𝐡𝐢𝐠𝐡

1992 – 𝐄𝐥𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧𝐬, 𝐦𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐟𝐥𝐚𝐭.

1993 – 𝐁𝐮𝐬𝐢𝐧𝐞𝐬𝐬𝐞𝐬 𝐜𝐨𝐧𝐭𝐢𝐧𝐮𝐞 𝐫𝐞𝐬𝐭𝐫𝐮𝐜𝐭𝐮𝐫𝐢𝐧𝐠.

1994 – 𝐈𝐧𝐭𝐞𝐫𝐞𝐬𝐭 𝐫𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐫𝐞 𝐠𝐨𝐢𝐧𝐠 𝐮𝐩.

1995 – 𝐓𝐡𝐞 𝐦𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐢𝐬 𝐭𝐨𝐨 𝐡𝐢𝐠𝐡.

1996 – 𝐅𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐈𝐧𝐟𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧.

1997 – 𝐈𝐫𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐄𝐱𝐮𝐛𝐞𝐫𝐚𝐧𝐜𝐞.

1998 – 𝐀𝐬𝐢𝐚 𝐂𝐫𝐢𝐬𝐢𝐬.

1999 – 𝐘2𝐊.

2000 – 𝐓𝐞𝐜𝐡𝐧𝐨𝐥𝐨𝐠𝐲 𝐂𝐨𝐫𝐫𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧.

2001 – 𝐑𝐞𝐜𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧, 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐓𝐫𝐚𝐝𝐞 𝐂𝐞𝐧𝐭𝐞𝐫 𝐀𝐭𝐭𝐚𝐜𝐤.

2002 – 𝐂𝐨𝐫𝐩𝐨𝐫𝐚𝐭𝐞 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠 𝐒𝐜𝐚𝐧𝐝𝐚𝐥𝐬.

2003 – 𝐖𝐚𝐫 𝐢𝐧 𝐈𝐫𝐚𝐪.

2004 – 𝐔.𝐒. 𝐡𝐚𝐬 𝐦𝐚𝐬𝐬𝐢𝐯𝐞 𝐭𝐫𝐚𝐝𝐞 & 𝐛𝐮𝐝𝐠𝐞𝐭 𝐝𝐞𝐟𝐢𝐜𝐢𝐭𝐬.

2005 – 𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝 𝐨𝐢𝐥 & 𝐠𝐚𝐬 𝐩𝐫𝐢𝐜𝐞𝐬.

2006 – 𝐇𝐨𝐮𝐬𝐢𝐧𝐠 𝐛𝐮𝐛𝐛𝐥𝐞 𝐛𝐮𝐫𝐬𝐭𝐬.

2007 – 𝐒𝐮𝐛𝐩𝐫𝐢𝐦𝐞 𝐦𝐨𝐫𝐭𝐠𝐚𝐠𝐞 𝐜𝐫𝐢𝐬𝐢𝐬.

2008 – 𝐁𝐚𝐧𝐤𝐢𝐧𝐠 & 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭 𝐜𝐫𝐢𝐬𝐢𝐬.

2009 – 𝐑𝐞𝐜𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧 – “𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭 𝐂𝐫𝐮𝐧𝐜𝐡

2010 – 𝐒𝐨𝐯𝐞𝐫𝐞𝐢𝐠𝐧 𝐝𝐞𝐛𝐭 𝐜𝐫𝐢𝐬𝐢𝐬.

2011 – 𝐄𝐮𝐫𝐨𝐳𝐨𝐧𝐞 𝐜𝐫𝐢𝐬𝐢𝐬.

2012 – 𝐔.𝐒. 𝐟𝐢𝐬𝐜𝐚𝐥 𝐜𝐥𝐢𝐟𝐟.

2013 – 𝐅𝐞𝐝𝐞𝐫𝐚𝐥 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞 𝐭𝐨𝐭𝐚𝐩𝐞𝐫𝐬𝐭𝐢𝐦𝐮𝐥𝐮𝐬.

2014 – 𝐎𝐢𝐥 𝐩𝐫𝐢𝐜𝐞𝐬 𝐩𝐥𝐮𝐧𝐠𝐞.

2015 – 𝐂𝐡𝐢𝐧𝐞𝐬𝐞 𝐬𝐭𝐨𝐜𝐤 𝐦𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐬𝐞𝐥𝐥𝐨𝐟𝐟.

2016 – 𝐁𝐫𝐞𝐱𝐢𝐭, 𝐔.𝐒. 𝐩𝐫𝐞𝐬𝐢𝐝𝐞𝐧𝐭𝐢𝐚𝐥 𝐞𝐥𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧.

2017 – 𝐒𝐭𝐨𝐜𝐤𝐬 𝐚𝐭 𝐫𝐞𝐜𝐨𝐫𝐝 𝐡𝐢𝐠𝐡𝐬, 𝐁𝐢𝐭𝐜𝐨𝐢𝐧 𝐦𝐚𝐧𝐢𝐚.

2018 – 𝐓𝐫𝐚𝐝𝐞 𝐖𝐚𝐫𝐬, 𝐫𝐢𝐬𝐢𝐧𝐠 𝐢𝐧𝐭𝐞𝐫𝐞𝐬𝐭 𝐫𝐚𝐭𝐞𝐬.

2019 – 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐆𝐃𝐏 𝐚𝐭 5%.

2020  C𝐨𝐯𝐢𝐝19.

हे नक्की वाचा: अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनच्या ५ स्टेप्स 

गुंतवणूकीची अस्थिरता किंवा निर्देशांकासोबत गुंतवणूकीची असलेली संवेदनशीलता मोजण्याचे प्रमाण म्हणजे “बीटा”. वर नमूद केलेल्या ३९ पैकी कुठल्याही १ घटनेला तुम्ही कशा रितीने प्रतिसाद दिला आहे? पडताळून पाहा. म्हणजे तुमचा “बीटा” किती, हे लक्षात येईल. गुंतवणूकदारांची बखर कोणी तयार केली असती तर त्यात ‘गुंतवणूक न करण्याची हजार कारणं’ असा एक न संपणारा धडा लिहिला गेला असता. ऑगस्ट महिन्यात समाज माध्यमांवर “Give me another March wanna invest once again”……. असा एक संदेश वजा विनोद फिरविला जात होता.

तेजीत गुंतवणूक करून तुम्ही “पैसा” (परतावा) मिळवू शकता पण मंदीत जो गुंतवणूक करण्याचं धाडस करतो तो “संपत्ती” निर्माण करतो.

– अतुल प्रकाश कोतकर

94231 87598

[email protected]

(लेखक म्युच्युअल फंड व विमा वितरक आहेत.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web Search: Financial Phobia, Financial Phobia Marathi Mahiti, Financial Phobia in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.