Reading Time: 3 minutes

कर्ज अशी गोष्ट आहे , जी ठरवलेल्या कालावधीत परतफेड करावी लागते . मग क्रेडिट कार्ड वर खरेदी केलेल्या एखाद्या वस्तूचे 12 महिन्याचे ईएमआय भरणे असो किंवा वर्षानुवर्षे सुरू असणारे गृहकर्ज असो . कर्जाची परतफेड तुम्हाला त्या संबंधित वस्तूची किंवा वास्तूची मालकी हक्क प्रदान करण्याच्या जवळ आणत असते . त्यामुळे बरेच जण हा कर्जाचा डोंगर लवकरात लवकर कसा चढून पार करता येईल याचा विचार करत असतात . 

आजच्या या लेखामधून आपण गृहकर्जाची परतफेड कशा प्रकारे केली म्हणजे लवकर कर्ज मुक्त होऊ शकू याची माहिती घेणार आहे. 

 • कर्जाचा कालावधी आणि मासिक हप्ता : ( Tenure of loan and EMI )
 • कर्ज दिलेल्या वेळेच्या आधी फेडणे म्हणजे तुमचे आर्थिक व्यवस्थापन योग्य हवे !  कर्जाचा कालावधी कमी करायचा म्हणजे थोडक्यात ईएमआय ची रक्कम वाढवणे. 
 • तुमची सध्याची असलेली ईएमआय ची रक्कम थोडी जरी वाढवली तरी त्याचा तुमच्या कर्जाच्या एकूण रकमेत मोठा बदल होऊ शकतो. 
 • एक उदाहरण बघू ,

कर्जाची रक्कम – Rs. 30,00,000

व्याजदर 8 % वार्षिक 

कर्जाचा कालावधी – 20  वर्षे 

ईएमआय – Rs. 25,039 

या  उदाहरण मध्ये एकूण व्याज जो तुम्ही कर्ज कालावधी मध्ये भरता – Rs. 30,22,368 

आणि 

एकूण रक्कम जी तुम्ही कर्जाची परतफेड म्हणून करता – Rs. 60,22,368

————————————————————————————–

हेच जर तुम्ही ईएमआय ची रक्कम थोडी वाढवली तर कर्जाचा कालावधी कमी होईल. 

कर्जाची रक्कम – Rs. 30,00,000

व्याजदर 8 % वार्षिक 

कर्जाचा कालावधी – 15  वर्षे 

आता तुमचा – ईएमआय – Rs. 28,670 

या  उदाहरण मध्ये एकूण व्याज जो तुम्ही कर्ज कालावधी मध्ये भरता – Rs. 21,60,521  

आणि 

एकूण रक्कम जी तुम्ही कर्जाची परतफेड म्हणून करता – Rs. 51,60,521

Rs. 30,22,368 – Rs. 21,60,521  = Rs. 8,61,847 इतके पैसे वाचू शकता !

आणि अर्थात ही काही थोडी – थोडकी रक्कम  नाही !

 • अर्थात महिन्याचे केवळ Rs. 3631 वाढवून तुमचे किती तरी पैसे वाचवू शकतो , याचे कारण तुम्ही जास्तीची भरलेली रक्कम ही मूळ रकमेत जमा होते. त्यामुळे पर्यायाने तुमच्या एकूण व्याजाच्या रकमेवर याचा परिणाम होतो.
 • आर्थिक व्यवस्थापन आणि  प्राधान्य :  ( financial management and priority )
 • प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. घरातील कमावणारा व्यक्ती एकच असेल तर त्यावर निर्भर अशा अनेक गोष्टीचे व्यवस्थापन करणे अवघड होऊ शकते . 
 • यासाठी प्राधान्यक्रम ठरवला तर अनेक महत्वाच्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करता येऊ शकते. 
 • गृहकर्ज , क्रेडिट कार्ड बिल , युटिलिटी बिल , विमा हप्ते , स्वास्थ्य – औषध उपचार , दैनंदिन गरजा या सगळ्यांना प्राधान्य दिल्यावर जी काही रक्कम उरत असेल तर महिना  3 ते 4   हजार देखील तुम्हाला उपयोगी पडणार आहे. याचे उत्तम उदाहरण आपण आताच वर पहिले. 

हे वाचा : आपण SIP वाढवणार का गृहकर्ज घेणार? कोणते आर्थिक नियोजन करायला आपण प्राधान्य द्याल?

 

 •  पगार वाढ , बोनस , इन्सेंटिव्ह याचा योग्य वापर

 ( best utilization of salary hike , bonus , incentives ) : 

 • दिवाळीचा बोनस म्हणा किंवा अतिरिक्त कामाचा इन्सेंटिव्ह म्हणा , जी काही रक्कम तुम्हाला पगारा व्यतिरक्त मिळत असेल ती साठवून एकरकमी रक्कम गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी वापरल्यास फायदेशीर ठरू शकते. 
 • नोकरीमधली पगार वाढ तुम्हाला मासिक हप्त्याची रक्कम वाढवून देण्यास उपयोगी पडू शकते. गृह कर्जाची रक्कम फेडण्यास ही संधी उपयुक्त ठरू शकते . 
 • नोकरी मध्ये केलेला बदल देखील पगारवाढ घेऊन येतो तेव्हा गृह कर्जाचा मासिक हप्ता वाढवून लवकरात लवकर गृहकर्ज फेडू शकता .
 • क्रेडिट स्कोअर रेटिंग ( credit score rating ) : 
 • आरबीआय ने नागरिकांचे पत मानांकन तपासण्यासाठी परवानगी दिलेल्या संस्थांपैकी एक म्हणजे CIBIL आहे. ही संस्था नागरिकांनी घेतलेले कर्ज , त्याची परतफेड या संबंधित सगळी माहिती गोळा करत असते . 
 • क्रेडिट स्कोअर हा साधारण 300 ते 900 च्या दरम्यान असतो , तुमचा स्कोअर 750 च्या वर असणे अपेक्षित असते .
 • तुम्ही आधी काही छोट्या कालावधी चे कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड योग्य वेळेत , मासिक हप्ते न चुकवता केली असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असू शकतो . याचा थेट संबंध तुमच्या नवीन कर्ज  मंजूरी साठी उपयोगी पडतो. 
 • तुम्ही गृहकर्ज घेताना जी संस्था निवडाल ती तुम्हाला किती व्याजदराने कर्ज देत आहे, यापेक्षा कमी व्याजदर तुम्हाला अजून कुठल्या वित्त संस्थेमधून मिळत आहे का, याची चौकशी करा. 
 • क्रेडिट स्कोअर उत्तम असल्यास तुम्ही वाटाघाटी ( negociation ) करू शकता ,जेणेकरून कमी व्याजदराने कर्ज मिळू शकल्यास ईएमआय कमी होण्यास मदत मिळू शकते. 

 

हे वाचा “ या ” स्मार्ट टिप्स सोबत वेतनवाढीचा आनंद द्विगुणित करा !

 

 • गृहकर्जाचे डाऊन पेमेंट : ( down payment for home loan ) : 
 • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गृहकर्जाच्या सुरुवातीलाच डाऊन पेमेंट जास्त करणे . असे केल्यास पर्यायाने तुमची कर्जाची मूळ रक्कम कमी घेतली जाते. 
 • गृहकर्जाचे डाऊन पेमेंट साठी रक्कम गोळा करणे अर्थात एक दिवसाची गोष्ट नाही . यासाठी तुम्हाला दूरदृष्टी ठेवून किमान पाच वर्षे आधी बचत सुरू करणे आवश्यक आहे. 

निष्कर्ष : 

अतिशय सोप्या पण महत्वाच्या अशा या “ पंचसूत्रीचा ”  अवलंब केला तर नक्कीच गृह कर्जाच्या परतफेडीचा उत्तम आराखडा तयार होईल आणि लवकरात लवकर गृहकर्ज फेडण्यास मदत होईल . 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…