Reading Time: 2 minutes
 • आपण एकाच वेळी कर्ज घेणे आणि म्युच्युअल फंड सआयपी चालू करणे, यापैकी कोणता निर्णय घेण्यास प्राधान्य द्याल?  वैयक्तिक आर्थिक नियोजन करताना या दोनही गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे.
 • एसआयपी चालू केली तर महिन्याला विशिष्ट रक्कम भरावी लागते आणि त्यातून दीर्घकाळासाठी चांगला परतावा मिळू शकतो. त्याचवेळी जर गृह कर्ज घेतले तर स्वप्नातील घर पूर्ण तर होतेच पण इन्कम टॅक्स सुद्धा वाचतो आणि महिन्याला भाडे भरण्यापासून सुटका मिळते.
 • एसआयपी चालू केल्यानंतर आर्थिक सल्लागार हा दर वर्षाला 10 टक्क्यांनी वार्षिक पद्धतीने एसआयपी वाढवत जा, असं सांगत असतात. एसआयपी आपण अशा पद्धतीने वाढवल्यावर महागाईपासून संरक्षण, ध्येय लवकर साध्य होणे आणि बचत निधी साचवला जातो. 
 • एकाच वेळी गृहकर्ज काढणे आणि म्युच्युअल फंड एसआयपी करणे अशा दोन्ही गोष्टी करायला सुरुवात केली तर एसआयपीची रक्कम वाढवावी का गृहकर्जाचा हप्ता वाढवावा, हा प्रश्न पडतो. 
 • गृहकर्ज घेतल्यानंतर कर्जावर व्याजदर चालू होतो. दर महिन्याला नियमितपणे हप्तेही भरावे लागतात. जास्त काळासाठी कर्ज घेतले असेल तर त्यावरील व्याजही वाढलेले दिसून येते. कर्ज घेतल्यानंतर प्रीपेमेन्ट करणे हा सर्वात चांगला उपाय असतो. नियमितपणे प्रीपेमेन्ट करत गेलो तर कर्जाचा आकार कमी होऊन लवकर कर्जमुक्त होण्याची शक्यता वाढत जाते. गृहकर्जामुळे स्वतःच घर असावं ही इच्छाही पूर्ण होते. 
 • लक्षात ठेवा – एसआयपीचे हप्ते भरून आपण अतिरिक्त खर्च करू शकत असाल तरच गृहकर्ज घ्यावे. गृहकर्जावरील वाढते व्याज दर आणि एसआयपीच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा किती आहे याचा आधी अभ्यास करून ठेवावा. 

आपण खालील दोन उदाहरणावरून गृहकर्ज आणि एसआयपी यातील गुंतवणुकीचा फरक समजून घेऊया. 

नक्की वाचा : म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापनासंदर्भात ‘हे’ घ्या महत्वाचे निर्णय

पहिले उदाहरण – आपण गृहकर्जाच्या वाढत्या EMI बाबत माहिती घेऊया.

 • आपण 50 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांसाठी 8.5% दराने घेतले असे गृहीत धरू. असं केलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या शेवटी 43,391 रुपये भरावे लागतात आणि एकूण व्याज 54,13,897 रुपयांचे भरावे लागते.
 • समजा आपल्या महिन्याच्या पगारात वाढ होत गेली आणि दर वर्षाला भरला जाणारा EMI 5% ने वाढवत नेला तर आपण 19.5 लाख रुपये व्याजाची रक्कम वाचवू शकतो, तसेच गृहकर्जाचा कालावधी 7.5 वर्षांनी कमी करू शकतो. . 
 • इन्कम टॅक्सच्या नियमानुसार, सेक्शन 80 सी प्रमाणे १.५ लाख रुपयांच्या कर कपातीचा दावा करू शकता आणि कलम 24बी अंतर्गत व्याजाची रक्कम रु. 2 लाखांपर्यंत उत्पन्नातून कमी करू शकता. 

नक्की वाचा : कधी करावी ‘एसआयपी’ मध्ये गुंतवणूक ?

दुसरे उदाहरण – एसआयपीची रक्कम वाढवणे 

 • आपण महिन्याला 40,000 रुपयांची एसआयपी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये सुरु केली, तर 12%चा CAGR गृहीत धरल्यास तर तुम्ही गुंतवलेले एकूण 96 लाख रुपये  3,99,65,917  रुपयां पर्यंत वाढू शकतात. इथे तुमचा भांडवली नफा रु. 3,03,65,917 इतका येतो.
 • एसआयपी करायला लवकरात लवकर सुरुवात करायला हवी. कमी रकमेची एसआयपी जरी लवकर सुरु केली तरी त्यातून मिळणारा परतावा हा दीर्घकाळासाठी जास्त असतो. शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करायला वेळ नसल्यास एसआयपीत गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. करिअरच्या सुरुवातीपासून आपण एसआयपीमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली तर मिळणारा फायदा जास्त असतो.
 • निष्कर्ष : 
  • वरील दोन परिस्थितीची एकमेकांशी तुलना करून आपल्याला काय हवेय आणि काय नको याचा अभ्यास करायला हवा. गृहकर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची रक्कम प्रीपेमेन्ट जर केली तर आपले अतिरिक्त व्याजाचे पैसे वाचू शकतात. 
  • म्युच्युअल फंड एसआयपी चालू करून त्यातील रक्कम हळूहळू वाढवत नेली तर भविष्यात आपले आर्थिक ध्येय पूर्ण होतात.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutes तुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…