Reading Time: 3 minutes

आर्थिक वर्ष संपायला आता केवळ थोडेच दिवस शिल्लख आहेत. अशा वेळी कराचे नियोजन करताना काही चुका होऊ शकतात. आर्थिक बाबतीत आपण केलेली एक चूक म्हणजे प्रचंड आर्थिक नुकसानच. ते टाळण्यासाठी पुरेसे सावध राहणे गरजेचे आहे. त्यासाठीच उपयोग व्हावा या हेतूने लिहिलेला हा लेख-

  1. शेवटच्या क्षणी बेसावधपणे केली जाणारी चुकीची गुंतवणूक :
  • अनेकदा 80 C खाली सवलत मिळवण्यासाठी  करण्यात येणारी गुंतवणूक ही इन्शुरन्स कंपन्यांच्या गुंतवणूक योजनांत किंवा युलीप सारख्या साधनात केली जाते. गुंतवणूक म्हणून त्यातून मिळणारा लाभ अन्य ठिकाणातून मिळणाऱ्या लाभापेक्षा कमी असतो.
  •  यावर मोफ देण्यात येणारे विमा संरक्षण अपुरे असते. या गुंतवणूकीतून बाहेर पडण्यासाठी किमान पाच वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक असल्याने आपली भविष्यातील आर्थिक जबाबदारी वाढते. 
  • याशिवाय मधेच पैसे काढून घेतल्यास पहिल्या वर्षी भरलेला बराचसा हप्ता परत मिळत नाही, त्यामुळे पैसे मिळाले तरी त्यावरील निव्वळ परतावा मामुली असतो. 
  • जीवनविमा हवा असेल तर टर्म इन्शुरन्स हा योग्य पर्याय राहील कर वाचवायचा असेल तर म्युच्युअल फंडाच्या करबचत योजना आहेत त्यात केवळ तीन वर्षे गुंतवणूक अडकून राहू शकते. 
  •  याशिवाय पीपीएफ, एनएससी, इपीएफ यासारखे अन्य सुरक्षित पर्यायही उपलब्ध आहेत. करबचत करण्यासाठी करण्यात येणारी गुंतवणूक किंवा खर्च हे 31 मार्चपर्यत केल्यासच मान्य होतात हे लक्षात ठेवावे.
  1. आरोग्य विम्याचा हप्ता:
  • स्वतःसाठी कुटुंबासाठी तसेच आपल्या पालकांचा आरोग्यविमा असल्यास त्यावर 80 DDB नुसार आयकरात सूट मिळू शकते. 
  • जोखीम व्यवस्थापन म्हणून या योजना घ्याव्यात, वेळेवर त्याचे हप्ते भरावेत.
  1. एनपीएस मधील गुंतवणूक:
  • यातील पन्नास हजाराच्या गुंतवणूकीस 80 CCD 1 B नुसार अधिकची करसवलत आहे. अशी गुंतवणूक करून आपण अधिक करबचत करू शकतो.
  1. अग्रीम कर न भरणे: 
  • मुळातून करकपात होणं आणि आपल्याला कर द्यावा लागणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्याचे उत्पन्न खरोखरच कर मर्यादेच्या आत आहे ते मुळातून कर कापू नये यासाठी 15 G / H फॉर्म भरून सूचना देऊ शकतात, परंतु ज्याचे उत्पन्न निश्चित करपात्र आहे हे माहिती असूनही असा फॉर्म भरून देणे चुकीचे आहे. 
  • अनेकदा बँका त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून ग्राहकांना असा फॉर्म भरून देण्यास सांगतात आणि कोणताही विचार न करता तो तात्काळ भरून दिला जातो. उत्पन्न अधिक असल्यास नियमानुसार अग्रीम कर वेळोवेळी भरावा लागतो, तो न भरल्यास त्या तारखेपासून दंड विनाकारण भरावा लागतो.
  • तेव्हा आपल्या उत्पन्नाची कच्ची नोंद ठेवून एकूण उत्पन्नाचा अंदाज घेऊन वेळोवेळी करभरणा करावा. 15 मार्चपर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या अपेक्षित करभरणा पूर्ण करावा असा नियम आहे नाहीतर त्यावर दंड बसेल. 
  • या वर्षी शेअरबाजाराने अनेकांना मालामाल केल्याने उत्पन्नात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे, मिळणाऱ्या रकमेतून मुळातून करकपात केली जात नाही. 
  •  त्यामुळे भरावा लागणारा कर आणि त्यावरील दंडव्याज अधिक होऊ शकते याचा अंदाज घेऊन अग्रीम कराचा भरणा व्याजासह ताबडतोब करावा, काही फरक निघत असल्यास विवरणपत्र भरताना त्याचे समायोजन करता येईल.

नक्की वाचा – Share Market Investment – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवा

  1. टॅक्स लॉस हार्वेस्टिंग:
  • शेअरबाजारातील झालेल्या भांडवली नफ्यामध्ये भांडवली तोटा समायोजित करून आपले करदायित्व कमी करता येते. 
  • आपल्या गुंतवणूक संचात असलेले तोट्यातील शेअर्स विकून तोटा होईल हा तोटा अल्प आणि दीर्घ मुदतीच्या फायद्यात मिळवला असता निव्वळ फायदा कमी म्हणजेच करदेयता कमी होते. 
  • तोट्यात विकलेले शेअर्स आपल्याला ठेवायचे असल्यास विकलेल्या किंवा त्याच्या आसपासच्या भावात खरेदी केल्यास आपल्या गुंतवणूक संचात काहीच बदल होणार नाही आणि अधिक करबचत होईल. हे पूर्णपणे कायदेशीर असून त्यास टॅक्स लॉस्ट हार्वेस्टिंग म्हणतात.

कर विषयक बऱ्याच सवलती या जुन्या पद्धतीने करमोजणी केल्यासच मिळतात तेथे कराचा दर अधिक आहे तर नवीन पद्धतीने केलेल्या करमोजणीस बहुतेक ठिकाणी त्या मिळत नाहीत पण तेथे करदर कमी आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीचा स्वीकार करत असलात तरी त्यामुळे करात फरक पडू शकतो. तेव्हा कोणत्या पद्धतीने कर मोजणी करावी ते दोन्ही पद्धतीने करमोजणी करून ठरवावे. नवीन पद्धतीने करमोजणी करायचे स्वीकारले तरीही गुंतवणूक करण्याचे थांबवू नये कारण हीच गुंतवणूक तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणारी आहे. 

याशिवाय सर्वसाधारण लक्ष म्हणून आपल्याला मिळणाऱ्या एकूण मिळकतीचा त्यातून झालेल्या करकपातीचा सर्वसाधारण आढावा घेत राहावे  यासाठी आयकर विभागाने AIS या नावाचे एक अँप उपलब्ध करून दिले आहे.  त्यामध्ये मागील दोन वर्षासह चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्न आणि करकपातीची माहिती आहे, हे अँप प्ले स्टोर अथवा अँप स्टोरवरून घेऊन चालू करावे. त्यात या आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंतचे उत्पन्न, त्यातून आपला किंवा आपण दुसऱ्याचा मुळातून कापलेला कर, विशिष्ठ आर्थिक व्यवहार, आपण स्वतंत्ररित्या भरणा केलेला अग्रीम कर, विभागाकडून करण्यात आलेली मागणी किंवा दिलेला रिफंड याशिवाय अन्य माहिती सहज मिळू शकते. बहुतेक ही माहिती अचूक असते तरीही मला आलेले अनुभव असे-

नक्की वाचा : आयकर विवरणपत्रावरील प्रक्रिया आणि परतावा

  • दोन कंपन्यांनी मला दिलेला डिव्हिडंड (रक्कम किरकोळ आहे) याची त्यात नोंद नव्हती.
  • प्रधानमंत्री वयवंदन योजनेतील एलआयसीने दिलेले मासिक व्याज, पोस्टाच्या योजनेतील व्याज, सहकारी बँकेतील ठेवींवरील व्याजाचा त्यात समावेश नाही.
  • विशेष आर्थिक व्यवहारामध्ये – मी लार्सनचे सर्व शेअर्स पुनर्खरेदीस दिले होते त्यातील काही शेअर्स स्वीकारून उरलेले शेअर्स परत आले असले तरी सर्वच शेअर्स 3200 ने विकल्याची चुकीची नोंद आहे. 

 वरील व्यवहारातील नफा 10 (34A) नुसार करमुक्त असला तरी प्रत्यक्षात या ठिकाणी कदाचित चुकीची नोंद किंवा नोंदच नाही असेही असू शकते, तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवूनच उत्पन्नाची मोजणी करावी. तसेच व्यवहारांच्या  नोंदींसमोर सबमिट फीडबॅक असा पर्याय असेल तर आपले म्हणणे थोडक्यात पण नेमकेपणाने सांगावे.

 या आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीच्या उत्पन्न आणि कराच्या नोंदी प्रत्यक्ष कराचा भरणा झाल्यावर म्हणजे 15 मे किंवा त्यानंतरच्या 7 दिवसात तेथे अद्ययावत होतात त्या त्यापासून खात्री करून घ्याव्यात. आपल्याकडून उत्पन्नाची मोजणी करून त्यावरील कर योग्यच दिला जाईल ते पाहावे. तरीही त्यात त्रुटी राहिली तर विवरणपत्र भरले आहे ते मंजूरही झाले आहे तरीही सुधारीत विवरणपत्र 31 डिसेंबरपूर्वी  भरून द्यावे. अधिक भरलेला कर हा मागणी न केल्यास परत मिळत नाही आणि कोणत्याही कारणाने कमी कर भरला असेल तरीही खात्याकडून मागणी नोटीस येऊ शकते.

उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकाराणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…