Reading Time: 3 minutes

नोकरीच्या ठिकाणी मिळणारी पगारवाढीची बातमी तसेच प्रोत्साहन स्वरूपातील पैशाचा मोबदला मिळणे म्हणजे तुमच्या चांगल्या कामाची पावती असते. उत्पन्नात होणारी ही वाढ तुमच्या कामातील उत्साह वाढवतो. शिवाय आणखी जोमाने काम करायची उमेद निर्माण करतो. करिअरच्या दृष्टिकोनातून ही घटना जशी आनंददायी असते त्याचप्रमाणे सोबत तुमची जबाबदारी वाढवण्याचे पण काम करते. जबाबदारी, मिळालेल्या वाढीव पैशाच्या योग्य गुंतवणुकीची! आजच्या लेखामधून आपण अशाच विविध पर्यायांबद्दल सविस्तर माहिती घेऊ ज्यामुळे तुमच्या पगारवाढीचा आनंद द्विगुणित होईल. 

  1. वेतनवाढीचा योग्य वापर  :  ( proper utilization of salary increment ) 
  • मासिक वेतनवाढ किंवा प्रोत्साहन रूपातील काही ठराविक रक्कम या उत्पन्न वाढीच्या वळणावर योग्य मार्गाने पैशाचा वापर होणे गरजेचे आहे.
  • अन्यथा आजवर आर्थिक कमतरता भासली नाही म्हणून मिळणारे हे पैसे म्हणजे अचानक लागलेल्या लॉटरी प्रमाणे समजून दरमहा चैनीच्या गोष्टी मध्ये खर्च करायला वेळ लागत नाही. अर्थात आनंद व्यक्त करणे -अनुभवणे आणि पैशाचा अपव्यय करणे यातली पुसटशी रेघ जाणून घेणे गरजेचे आहे. 
  • सुरुवातीलाच घेतलेले योग्य निर्णय कालांतराने तुम्हाला तुमचे दीर्घकालीन ध्येय पूर्ण करण्यात फायदेशीर ठरू शकतात. 
  1. वेतनवाढ आणि गुंतवणुकीचे पर्याय  : ( salary increment and investment options )

खाली काही महत्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आहे , ज्यामध्ये तुम्हाला गंतवणुकीचे पर्याय शोधायला मदत होईल. 

  1. गृहकर्ज परतफेड : (Prepayment of loan)
  • गृहकर्जाचे मासिक हप्ते भरत असाल तर, मासिक हप्त्याची रक्कम वाढवून देऊ शकता. पर्यायाने कर्जाचा कालावधी कमी झाल्याने व्याजाची रक्कम देखील वाचेल.  या सर्व परस्परावर अवलंबून असणाऱ्या गोष्टीमुळे कर्जाची परतफेड लवकर होण्यास मदत होईल.
  • कर्जाची परतफेड योग्य वेळी झाल्यास आर्थिक ओझे कमी होण्यास मदत होते तसेच मानसिक समाधान मिळते. 

हे वाचा : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातील नेमका फरक काय ?

  1. जीवन विमा किंवा आरोग्य विमा : (Life insurance / Health insurance)
  • आधीच्या पगारात इतर खर्च आणि बाकीचे देणे होऊन, रक्कम शिल्लक उरत नव्हती असा पेच असल्यामुळे, या आधी बचतीचा विचार करता येत नव्हता. असे असल्यास आता हातात येणाऱ्या रकमेचा काही भाग जीवन विमा किंवा आरोग्य विमा यासाठी बाजूला काढण्याचा विचार करावा.
  • सध्याची जीवनशैली पाहता आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, आरोग्य विमा तुम्हाला अनेक आजारांच्या समस्यांशी तोंड देताना आर्थिक सहाय्य करू शकतो.
  • जीवन विमा तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबासाठी तुमच्या पश्चात संरक्षण प्रदान करतो. यासाठी काही रक्कम आवर्जून काढण्याचा विचार करावा.    
  1. परदेशवारी : (Abroad trip)
  • जोडीदारासोबत परदेशवारीचे स्वप्न असल्यास वेतनवाढ हे तुमच्यासाठी असणारी खास भेट म्हणावी लागेल. 
  • दरमहा काही रक्कम सुट्टीच्या नियोजनासाठी वाचवली तर नक्कीच परदेशवारीची इच्छा काही वर्षात पूर्ण होऊ शकते.
  • यामुळे आर्थिक ताण न येता सुट्टीचा आनंद घेता येईल. 
  1. लक्झरी कारची खरेदी : (Buying a luxury car )
  • घराप्रमाणेच कार घेणे हे पण बकेट लिस्ट मधील एक महत्वाचे स्वप्न असते. मग गरजेप्रमाणे छोटी कार, मग फॅमिली कार आणि मग स्टेटस ला साजिशी अशी लक्झरी कार असा एका साधारण छोट्या कार पासून ते मोठी कार घेण्याचा प्रवास असतो. 
  • असा विचार करत असाल तर ही वेतनवाढ केवळ त्याच ध्येयापुरता साठवत गेले तर हे स्वप्न ही पूर्ण होण्यास मदत होईल.
  1. गोल्ड मधील गुंतवणुकीसाठी : (Gold  Investment )
  • बऱ्याच जणांना सोने म्हणजे सुवर्ण अलंकार ,सोन्याची आभूषणं यात गुंतवणूक करणे म्हणजे भविष्याची तरतूद वाटते मग ते गुंतवणूक म्हणून किंवा लग्नकार्य म्हणून असो. 
  • सोन्याचा चढता बाजारभाव आणि परतावा बघता गोल्ड मधील गुंतवणूक फायदेशीर समजली जाते. त्यामुळे दरमहा काही ठराविक रक्कम गोल्ड किंवा गोल्ड बॉण्ड मध्ये गुंतवल्यास ती योग्य कारणी लागली असे म्हणता येईल.
  1.  निवृत्ती नंतरचे नियोजन : (Retirement plan)
  • वेतन आणि उत्पन्न जोपर्यंत तुम्ही नोकरी करत आहे तोपर्यंत विनासायास मिळत राहणार.  मात्र निवृत्ती नंतर चे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागणार.
  • यासाठी NPS सारख्या सुविधांचा लाभ घेणे हा योग्य निर्णय असू शकतो. आज दरमहा काढून ठेवलेली काही ठराविक रक्कम निवृत्ती नंतर आर्थिक स्वावलंबनाची पहिली पायरी ठरू शकते. 

हे वाचा : जेष्ठ नागरिकांना महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

  1. पगारवाढीच्या किती प्रमाणात गुंतवणुकीचे विभाजन करावे ? (How much exactly should you invest from increased salary)
  • गुंतवणूक कुठे करावी हे काही पर्याय इथे सांगितले मात्र किती रक्कम गुंतवणे योग्य राहील असा विचार केला तर? याचे उत्तर कदाचित तुमच्या प्राधान्य देण्याच्या क्रमवारीला ठरवू देणे योग्य ठरेल.
  • तुम्ही कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य देता आणि कुठली गोष्ट तुम्हाला अति महत्वाची वाटते त्यानुसार साधारण पगारवाढीच्या 25 % रक्कम प्रति गुंतवणुकी मागे गृहीत धरावी अथवा एकच ध्येय असेल तर 75 % रक्कम गुंतवण्याचा विचार करावा. 
  • अर्थात सर्वांच्या पगारवाढीच्या आणि आर्थिक परिस्थितीनुसार ही आकडेवारी बदलणार. त्यामुळे प्रत्येकाचे गुंतवणुकीच्या विभाजनाचे समीकरण देखील वेगळे असू शकते. 

गुंतवणुकीचे वरील पैकी कारण कुठलेही असो, तुम्हाला मिळणारा अतिरिक्त पैसा वायफळ गोष्टी मध्ये न अडकता तो योग्य मार्गी लागला तर त्यातून तुमच्या आयुष्यातील इच्छा तर पूर्ण होणारच  शिवाय दीर्घकालावधीत भविष्यकाळात तुम्हाला लाभ तरी मिळणार !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था (Partnership Firm)

Reading Time: 3 minutes स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.