Gold ETF Vs Gold Mutual Fund
आजच्या भागात आपण सुवर्ण गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांची म्हणजेच “गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड (Gold ETF & Gold Mutual Fund)” यांची माहिती घेणार आहोत. आपल्यापैकी अनेक व्यक्ती सोन्यात गुंतवणूक नक्कीच करत असतील आणि करायला देखील हवी. सोनं हे अगदी पूर्वीपासून श्रीमंतीचे प्रतीक म्हणून मानण्यात आलेलं आहे आलेलं आहे. परंतु आताच्या काळात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी सोनं म्हणजे अस्थिर काळात सुरक्षित गुंतवणूक करण्याचं माध्यम आहे. आपण सर्वांनी याचा अनुभव नक्कीच घेतला असेल. गेल्या अनेक वर्षांपासून हा अनुभव येत आहे. जेव्हा शेअर मार्केट किंवा इतर गुंतवणूक क्षेत्रात अस्थिरता निर्माण होते तेव्हा मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात येते, यामध्ये गुंतवणूक मात्र सुरक्षित व बऱ्यापैकी परतावा मिळू शकतो.
सोन्याच्या दरामध्ये कधीही अचानक मोठा बदल होत नाही. या अमूल्य अशा धातूमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण दुकानांमध्ये जाऊन ‘फिजिकल गोल्ड’ विकत घेऊ शकतो, म्युच्युअल फंड आणि ईटीएफच्या माध्यमातून देखील आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो.
विशेष लेख: Silver investment: चांदीमध्ये गुंतवणूक कशी कराल?
फिजिकल गोल्ड
- आपण सोनाराच्या दुकानातून जे सोनं खरेदी करतो त्याला ‘फिजिकल गोल्ड’ असे म्हणतात.
- खूप पूर्वी गुंतवणूक म्हणून काही मोजके पर्याय उपलब्ध होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे ‘फिजिकल गोल्ड’.
- विविध प्रकारची आभूषणं, दागिने यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. परंतु तुम्हाला फक्त सोन्याचीच किंमत द्यावी लागत नाही, तर त्यासोबतच दागिने, आभूषणं तयार करण्यासाठी कारागिरांना देखील मोठी रक्कम द्यावी लागते. सोन्यासोबतच इतर खर्चदेखील असल्यामुळे गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधले जात आहेत.
म्युच्युअल फंड मधील सोन्याची गुंतवणूक
- म्युच्युअल फंड च्या माध्यमातून देखील तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि चांगला परतावा मिळवू शकता.
- यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय देखील उपलब्ध असतील तुम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.
- इतर कुठल्याही इक्विटी ट्रेडिंग प्रमाणेच तुम्ही सोन्यात देखील गुंतवणूक करू शकता. ही ट्रेडिंग सोन्याच्या दरावरती अवलंबून असते. म्हणजेच जसे सोन्याचे दर बदलतील तसे तुमच्या गुंतवणुकीची किंमत देखील बदलत राहील.
- थोडक्यात सांगायचं तर आत्ता जे सोन्याचे दर असतील त्या दराने तुम्ही सोनं विकत घेता आणि जेव्हा तुम्हाला विकायचंय त्या वेळच्या दरानुसार तुम्हाला त्याचे पैसे मिळतील एवढी साधी, सरळ आणि सोपी गुंतवणूक पद्धत आहे.
- यामध्ये तुम्ही अगदी दरमहा हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
- गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसआयपी किंवा साध्या ट्रेडिंग च्या पद्धतीने सुद्धा गुंतवणूक करू शकता.
महत्वाचा लेख: हिरे की सोने : गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता?
ईटीएफच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक
- ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड होय.
- या प्रकारात केलेल्या गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला हवा असल्यास सोन्याच्या स्वरूपात देखील मिळू शकतो.
- या बाॅण्ड मध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर ते बाॅण्ड सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवले जातात आणि त्यावरती नफा कमावला जातो.
- यामध्ये कसल्याही प्रकारची हेराफेरी होऊ शकत नाही ही सर्व प्रक्रिया अगदी पारदर्शकपणे पार पाडली जाते.
- सोन्याच्या इतर गुंतवणूक प्रकारांपेक्षा हा गुंतवणूक प्रकार सर्वसामान्यांना फायदेशीर आहे कारण यामध्ये इतर खर्च कमी होतो.
- ज्या व्यक्तींना सोन्यापासून दागिने तयार करण्याची इच्छा नाही. परंतु त्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ईटीएफ हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे.
- यामध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक ग्रॅम सोन्याच्या किमती एवढी रक्कम तरी नक्कीच गुंतवावी लागणार आहे.
- इतर गुंतवणुकी प्रमाणे या गुंतवणूक प्रकारात तुम्हाला गुंतवणुकीचा परतावा मिळत असताना कर किंवा इतर खर्च द्यावा लागत नाही.
Gold ETF Vs Gold Mutual Fund: गोल्ड ईटीएफ की गोल्ड म्युच्युअल फंड
फायदे |
सोनं -मुच्युअल फंड | सोनं -एटीएफ गुंतवणूक |
गुंतवणुकीची रक्कम | कमीत कमी १००० रुपये | किमान एक ग्राम सोनं |
D- MAT खात | D- MAT खात्याची आवश्यकता नाही | D- MAT खात्याची आवश्यकता आहे |
गुंतवणूक | 99.5% शुद्धता गुणवत्तेच्या सोन्यात गुंतवणूक | इटीएफ पद्धतीने सोन्यात गुंतवणूक |
एसआयपी | एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करता येते | एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करता येत नाही |
परतावा | इटीएफ च्या तुलनेत मुच्युअल फंडातील गुंतवणूक कमी प्रमाणात परतावा मिळतो | गुंतवणुकीपेक्षा अधिक जास्त प्रमाणात परतावा मिळतो |
रूपांतरण (Conversion) | गुंतवणुकीचा परतावा सोन्यात बदलून घेता येत नाही | गुंतवणुकीचा परतावा सोन्यात बदलून देखी घेऊ शकतो |
अतिरिक्त खर्च | जर कमी कालावधीसाठी (एक वर्ष ) गुंतवणूक केली तर जास्त प्रमाणात अतिरिक्त खर्च आकारला जातो | कुठलाही अतिरिक्त खर्च आकारला जात नाही |
भारतीय अर्थव्यवस्था परिस्थितीत अस्थिर जाणवत आहे त्यामुळे जर तुम्हाला सद्यस्थितीत गुंतवणूक करायची असेल तर सोन्यामधील गुंतवणूक तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळवून देण्यास मदत करेल.
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web search: Gold ETF & Gold Mutual Fund Marathi Mahiti, Gold ETF & Gold Mutual Fund in Marathi, Gold ETF & Gold Mutual Fund Marathi, Gold ETF & Gold Mutual Fund mhanje kay? Gold ETF in Marathi, Gold Mutual Fund Marathi Mahiti