GST जीएसटी 
https://bit.ly/3or9svE
Reading Time: 4 minutes

GST: जीएसटी 

आजच्या लेखात व्यापाऱ्यांनी  ‘जीएसटी (GST)’ संदर्भात कोणती काळजी घ्यायची, या महत्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. 

  1. जीएसटी नंबर नोंदणी केल्यानंतर सर्वप्रथम आपल्या दुकान किंवा आस्थापनेच्या बोर्डवर जीएसटी नोंदणी क्रमांक टाकणे व नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी दुकानात किंवा आस्थापनेच्या कार्यालयात लावणे गरजेचे आहे. जर आपल्या दुकान किंवा आस्थापनेच्या बोर्ड वर आपण जीएसटी नंबर टाकला नसेल व नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावले नसेल आणि जीएसटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात अशी चूक आली तर तुम्हाला रु.५० हजार पर्यंत दंड भरावा लागू शकतो.
  2. जीएसटी नंबर नोंदणी केल्यानंतर आपल्या व्यवसायाच्या करंट खात्याशी जोडणे अनिवार्य आहे अन्यथा तुमचा जीएसटी क्रमांक जीएसटी अधिकारी रद्द (Cancelled) करू शकतात.
  3. इन्व्हॉईस (Invoice) चुकीच्या फॉरमॅट मध्ये नसावे. इन्व्हॉईसमध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरलेली असावी.
    • इन्व्हॉईसची तारीख व क्रमांक (Date and Invoice number),
    • ग्राहकाचे संपूर्ण नाव व पत्ता (Name of Customer, Billing Address and Shipping Address of customer),
    • करदात्याचा व ग्राहकाचा GSTIN (GSTIN of Tax payer and Customer -if registered),
    • ठिकाण (Place of supply),
    • HSN कोड (Harmonized System of Nomenclature Code),
    • वस्तूंची संख्या व प्रमाण (Quantity, description or other relevant item measure/details),
    • करपात्र मूल्य, सूट (Taxable value/applicable discount),
    • जीएसटीचा दर आणिइतर माहिती (GST rates and total GST charged including details of applicable CGST/SGST/IGST for the item),
    • सप्लायरची स्वाक्षरी (Signature of the supplier)
    • जर असे बिल चुकीचे दिले तर रु. ५०००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो. 
      https://bit.ly/3oux9TI
  4. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्रावर जो नोंदणी दिनांक (Date of Registration)असतो त्या दिनांकानंतरच आपण वस्तू व सेवांवर जीएसटी लावून किंवा जीएसटी आकारून जीएसटी बिल ग्राहकांना देऊ शकतो. जर नोंदणी दिनांक (Date of Registration) च्या आधी जर वस्तू व सेवांवर जीएसटी लावून किंवा जीएसटी आकारून जीएसटी बिल ग्राहकास दिले, तर अशा बिलाचा जीएसटी भरता येत नाही व अशा बिलाची नोंद GSTR 1 मध्ये करता येत नाही. उलट अशा बिलांवर २०० टक्के दंड व व्याज भरावे लागते.
  5. ग्राहकांना जीएसटी बिल देताना (Tax Rate) कर दरा नुसार जीएसटी लावून किंवा जीएसटी आकारून जीएसटी बिल ग्राहकास द्यावे व चुकीचे Calculation करून बिल देऊ नये.
  6. जीएसटी बिलावर (Invoice No) बिल नंबर हा एका आर्थिक वर्षात एकदाच टाकता येतो. जर एकाच नंबरचे दोन बिल बनविले तर ते GSTR1 मध्ये नोंदविता येत नाहीत. त्यामुळे आर्थिक वर्षात जीएसटी बिलावर (Invoice No) बिल नंबर हा दोन बिलांवर सारखाच नसावा. आवश्यक असल्यास प्रत्येक आर्थिक वर्षात बिल क्रमांकाची सीरिअल बदलून घेऊ शकतो. ग्राहकांना जीएसटी बिल (Invoice No) बिल नंबरच्या सिरीज नुसारच तयार करून देणे, जर सिरीजनुसार बिल दिले नाही तर जीएसटी अधिकारी तुमच्यावर बोगस बिल म्हणून दंड आकारू शकतात.
  7. जीएसटी (Invoice) बिलामध्ये दुरुस्ती असल्यास ती त्याच वर्षात एकदाच दुरुस्त करता येते त्यामुळे जीएसटी (Invoice) बिल तयार करताना चूक करू नये.
  8. वस्तू व सेवा जीएसटी कर दरानुसारच (as per GST Tax Rate) जीएसटी आकारून बिल ग्राहकास द्यावे. जर वस्तू व सेवांवर कमी (GST Tax Rate) जीएसटी कर आकारून ग्राहकास बिल दिले तर अशा बिलांची जीएसटी कर तफावत (Difference) रक्कम बिल बनविणाऱ्या व्यापाऱ्यास भरावी लागते व रु.५,५००००/- किंवा बिलांची जीएसटी कर तफावत (Difference) रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून जीएसटी अधिकारी वसूल करू शकतो.
  9. जर तुमच्या व्यवसायाची उलाढाल/विक्री रु.१ कोटी ५० लाख पेक्षा जास्त असेल तर वस्तू व सेवांनुसार HSN Code जीएसटी बिलावर नोंदविणे आवश्यक आहे. (Rs.1.5 कोटी ते 5 कोटी पर्यंत उलाढाल/विक्री असल्यास  4 अंकी (4 digit) HSN Code आणि 5 कोटी पेक्षा जास्त उलाढाल/विक्री असल्यास ६ अंकी (6 Digit) HSN Code जीएसटी (Invoice) बिलामध्ये टाकणे अथवा नोंदविणे आवश्यक आहे. अन्यथा रु.२५००० पर्यंत दंड लागू शकतो 
  10. जीएसटी (Invoice) बिल रु.50 हजार पेक्षा जास्त असेल तर Eway Bill तयार करणे गरजेचे आहे. जर Eway Bill तयार केले नाही तर रु. १० हजार किंवा बिलातील जीएसटी रक्कम यातील जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून आकारली जाते.
  11. आपल्या व्यवसायाची खरेदी विक्रीची माहिती आणि भरण्यास येत असलेला जीएसटी कर आपल्याला GST Return च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला भरणे आवश्यक आहे. खरेदी विक्री बिले प्रत्येक महिन्यात असतील किंवा नसतील तरीही GST Return भरून ही माहिती जीएसटी खात्याला online पद्धतीने भरून सदर करावी लागते.  
  12. GSTR-1 या GST Return च्या फॉर्म मध्ये विक्री बिलांची माहिती भरून रिटर्न भरावे लागते.  व GSTR-3B या GST Return च्या फॉर्म मध्ये महिन्यातील झालेली विक्री व विक्रितून जमा केलेला जीएसटी कर व इनपुट टैक्स क्रेडीट (म्हणजेच विक्री करण्यासाठी लागणारा माल खरेदी केलेल्या बिलांवर भरलेला जीएसटी), खरेदी बिलांवर रिव्हर्स चार्ज भरायला येत असल्यास त्याची माहिती, जीएसटी नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांकडून केलेल्या खरेदीची माहिती व भरायला आलेला जीएसटी भरून रिटर्न भरावे लागते. 
  13. GST Return नुसार प्रत्येक महिन्याला GSTR-1(विक्री बिलांची माहिती) हे प्रत्येक महिन्याला १० तारखे अगोदर व GSTR-3B (खरेदी विक्री बिलांची माहिती) व भरायला येत असलेला जीएसटी प्रत्येक महिन्याच्या २० तारखे अगोदर भरावा लागतो. 
  14. जर GSTR 1 व GSTR 3B रिटर्न भरले नाही किंवा भरण्यास उशीर झाला तर प्रत्येक दिवसाला Nil Return असेल म्हणजेच खरेदी विक्री नसेल तर रु.२०/- प्रत्येक दिवसाला दंड भरावा लागतो व Regular Return असेल म्हणजेच खरेदी विक्री असेल तर रु.५०/- प्रत्येक दिवसाला दंड भरावा लागतो. जर जीएसटी भरायला येत असेल आणि तो भरला नाही किंवा उशीर झाला तर 18% P.A. दराने व्याज भरावे लागते.
  15. लेट फी (Late Fee), दंड (Penalty), व्याज (Interest) हे रोख स्वरुपात भरावे लागते. त्यामुळे लेट फी (Late Fee), दंड (Penalty), व्याज (Interest) भरावे लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
  16. इनपुट टॅक्स क्रेडिट (Input Tax Credit) म्हणजेच व्यवसायासाठी किंवा व्यवसायातील विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या मालावर जो जीएसटी भरला जातो अर्थात खरेदी बिलातील जीएसटी रक्कम होय.
  17. व्यवसायासाठी मशिनरी, फर्निचर, गाड्या, इलेक्ट्रोनिक उपकरणे, कॉम्पुटर, इ. मालमत्ता खरेदी केल्या असतील तर त्याची वेगळी माहिती द्यावी कारण याच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचे नियम वेगळे असून ते चुकीच्या पद्धतीने क्लेम केले गेले, तर २००% दंड भरावा लागू शकतो.
  18. इनपुट टॅक्स क्रेडिट जर बिल नसताना किंवा बोगस बिलांच्या आधारे घेतला किंवा चुकीचा घेतला, तर २००% दंड भरावा लागतो.
  19. जर वार्षिक रिटर्न भरले नाही तर रु. २००/- प्रत्येक दिवसाला लेट फी म्हणून भरावे लागतात.
  20. व्यवसाय बंद केला असेल, तर ज्या महिन्यात व्यवसाय बंद केला त्या महिन्यात जीएसटी नंबर बंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो व जीएसटी नंबर बंद झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत GSTR10 final return (फायनल रिटर्न) भरणे अन्यथा रु.२००/- प्रत्येक दिवसाला लेट फी भरावी लागेल. 

आशिष भोजने

7038577577
[email protected]

(श्री. आशिष भोजने पुणे येथील ‘कर सल्लागार’असून  गेल्या ५ वर्षांपासून  ते कर सल्लागाराचे काम करतात .)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: GST Marathi, GST in Marathi, GST Marathi Mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutes पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.