नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Reading Time: < 1 minute

खरं सांगायचं तर वेग आणि दिशा ओळखणे तसे सोपेच 

‘गुरु’ नवशिक्यांना मार्गदर्शन करित होते.

पण महत्वाचे म्हणजे ..

प्रसंगी गिरकी घेता आली पाहिजे,

गरजेनुरुप एखादे पाऊल मागे घेणे..

पण लगेचच पुढे झेपावत..

समेवरच..

आलेली एखादी ‘सुंदर संधी’ साधणे..

आणि समजा, 

नजरचुकीने हुकलीच अशी संधी..

तरी निराश न होता 

पुढील आवर्तनाची वाट पहाणे

हे सगळे जमल्याशिवाय

गरब्याचा खरा आनंद नाही घेता येणार…

अहो….

…..

दररोज मार्केटमध्येच ‘रमले’ पाहिजे असे थोडेच आहे??..

“आवो ने,.. डांडिया रमवा आवो….”

येत्या दहा दिवस दांडियाचा आनंद घ्यावा हे उत्तम..

नवरात्री शुभेच्छा 

-प्रसाद भागवत  9850503503

(चित्रसौजन्यः https://bit.ly/2NxbibR )

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *