Reading Time: 2 minutes

स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण रहातो त्या घरातल्या फक्त वस्तू किवा सजावटच नाही तर ते घरच मुळात आपलं, स्वतःच्या मालकीचं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतू घर खरेदी करणं हा एखादं खेळणं खरेदी करण्याइतका सोपा निर्णय नक्कीच नाही. हा एक मोठा, आणि महत्त्वाचा निर्णय असतो जो आपल्या आयुष्यात अनेक प्रकारे बदल घडवून आणतो. जर हा निर्णय घेताना त्याबद्दलची सर्वांगाने खरी आणि योग्य माहिती आपल्याला नसेल तर ह्या बदलांचे वाईट परिणाम दिसून येतात.

आजकालची महागाई आणि घरांचे आकाशाला भिडलेले दर पहाता लागल्या हाती, एकरकमी पैसे भरून लगेच घर ताब्यात मिळणे शक्यच नसते. घर घ्यायचं म्हणजे अनेक योजना आखून पैशांची जमवाजमव करणं आलं. एवढं करूनही घराच्या किमतीएवढी रक्कम एकत्रच हातात असणे कठीण. असले-नसलेले सगळेच पैसे घरासाठी देऊन रोजच्या खर्चाला, मौजमजेला, किंवा/आणि अडीअडचणीला हाताशी काहीच नसणे हे योग्य नाही. याचसाठी गृहकर्जाची (Home loan) सुविधा उपलब्ध आहे.

गृहकर्ज म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास स्वतःचे घर खरेदी करणे, त्यात बदल/ दुरूस्ती करणे, त्याचे नुतनीकरण (Renovation) करणे यासाठी बँकांकडून मिळणारी आर्थिक मदत म्हणजेच गृहकर्ज. हे कर्ज तुमच्या घराच्या बाजारभावावर (Market Value) किंवा नोंदणीमुल्यावर (Registration Value) अवलंबून असते. कर्ज म्हणून मिळणाऱ्या रकमेत मुद्रांक शुल्क, आणि  नोंदणी शुल्काचा समावेश नसतो. गृहकर्जाचे फायदे बघता हा बँका व तत्सम संस्थांकडून मिळणारा मदतीचा हातच म्हणावा लागेल.

गृहकर्जाचे फायदे-

  • कमी व्याजदर-

कर्ज म्हटल्यावर व्याज आलंच. गृहकर्जासाठीचे व्याजदर हे त्या-त्या बँकांप्रमाणे बदलत असले तरी जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी हे कर्ज कमीत कमी व्याजदरात उपलब्ध करून देणे हा प्रत्येक बँकेचा प्रयत्न असतो. हे ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याचे आहे.

 

  • जॉईंट लोन-

जॉईंट लोन म्हणजे पती-पत्नींना एकत्रित कर्ज मान्य होणे. जोडीदाराबरोबर कर्ज घेतल्याने तुम्हाला अधिक रकमेचे कर्ज मान्य होऊ शकते. तसेच तुम्हाला कर (Tax) वाचवण्यातही मदत होते.

 

  • कमी वयात घराची मालकी-

२०-३० वर्ष नोकरी करून उतारवयात स्वतःचं घर घेऊ शकण्याचा काळ आता गेला. कमी वयात स्वतःचं घर असण्यासारखं समाधान नाही जे गृहकर्जांमुळे शक्य झाले आहे. गृहकर्जांच्या मदतीने तुम्हाला घराची संपुर्ण रक्कम भरण्याऐवजी फक्त २०% रक्कमच भरावी लागते, तसेच कर्जाच्या परतफेडीसाठी तुम्हाला अधिक वेळ मिळतो.

 

  • करामधील सवलत-

गृहकर्ज घेतले असल्यास तुम्हाला सेक्शन ८०सी, सेक्शन २४ आणि सेक्शन ८०ईई यांअतर्गत करात लक्षणीय सवलती मिळू शकतात. कर्ज घेताना तुम्ही करात वजावट मिळण्यासाठी नक्की अर्ज करू शकता. इन्कम टॅक्स ऍक्ट १९६१ यातील सेक्शन २४(ब) प्रमाणे घरबांधणी किंवा घरखरेदी करण्यासाठी कर्ज घेतल्यास, घरापासून मिळणार्‍या उत्पन्नाचा विचार करता कर्जावरील व्याजात जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत वजावटीचा दावा तुम्ही करू शकता.

(चित्र सौजन्य- गुगल इमेजेस)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…