काय आहे गृहकर्ज टॉप अप?

Reading Time: 2 minutes

काय आहे टॉप अप लोन?

‘वाढीव कर्ज’ अर्थात ज्याला आपण टॅाप अप लोन म्हणतो, हे आपल्या चालू गृहकर्जावर घेतलेले अधिकचे कर्ज असते.

उदा.  सागर शिंदे यांनी २०१० साली ५० लाखांचे गृह कर्ज आहे आणि २०१८ पर्यंत ते त्या गृहकर्जाची परतफेड अगदी नियमाने करत आहेत. त्यांचे हफ्ते चुकलेले नाहीत की हफ्ते भरण्याची तारीख चुकली नाही. पण २०१९ मध्ये काही परिस्थितीमुळे त्यांना अचानक वाढीव कर्ज घेण्याची आवश्यकता भासली. अशा परिस्थितीत नियमित आणि शिस्तबद्ध ग्राहकासाठी बँका आणि तत्सम संस्था एक सोय उपलब्ध करून देतात. ती म्हणजे जर तुमचे सर्व व्यवहार स्पष्ट, पारदर्शक आणि नियमित असतील तर त्याच चालू कर्जावर तुम्ही वाढीव कर्ज घेऊ शकता. 

असे कर्ज देताना बँकेच्या काही नियम व अटींची पूर्तत करणे बंधनकारक असते. एका व्यक्तीच्या माथ्यावर एकाचवेळी दोन दोन कर्जांचे ओझे होऊ नये आणि वेगवेगळे व्याजदर, भिन्न हफ्त्याची तारीख, त्यांचे वेगवेगळे हिशोब ठेवण्याचे कष्ट वाचावे यासाठी ही वाढीव कर्जाची सोय उपलब्ध आहे. 

पण लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या सर्व आर्थिक व्यवहाराबाबत नियमित असणे आवश्यक आहे. ही सुविधा सर्व ग्राहकांसाठी नाही तर काही खास ग्राहकांसाठी त्यांच्या शिस्तबद्ध सवयीला प्रोत्साहन म्हणून ही वाढीव कर्जाची सोय उपलब्ध आहे.

हे कर्ज कोणाला मिळते?

 1. ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे असे कोणीही टॉप-अप लोनचा फायदा घेण्यासाठी पात्र आहे.
 2. यासाठी कर्जाची परतफेड प्रक्रिया किमान गेल्या एक वर्षाच्या कालावधीपासून सुरु असावी आणि तुमची परतफेडीची सगळी कागदपत्रे  तयार असायला हवीत.
 3. जेव्हा तुमचा मागील इतिहास स्पष्ट आणि साफ असेल फक्त तेव्हाच बँक आपल्या टॉप-अप लोनसाठी तयार होते. 
 4. अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा की जर आपण बँकेकडे काही मालमत्ता गहाण ठेवण्यास सक्षम असाल तरच बँक अतिरिक्त कर्ज सुविधा प्रदान करते.
 5. साधारणपणे आपण गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या किमतीच्या जास्तीत जास्त ७५ टक्के रकमेचे कर्ज बँकांद्वारे दिले जाते. परंतु प्रत्येक बँकेसाठी ही टक्केवारी भिन्न असते. 

टॉप-अप लोनचे फायदे काय?

 • कोणतेही उदिष्टसाध्य करणारे कर्ज: टॉप अप कर्जाबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही हेतूसाठी हे कर्ज घेऊ शकता. आपली व्यवसाय-संबंधित गरज असेल किंवा काही वैयक्तिक आवश्यकता असली तेव्हा टॉप अप कर्ज आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. 
 • कमी परतफेड खर्चः आपल्या आधीच्या गृह कर्जावर जो व्याजदर लागू आहे तितकाच किंवा त्यापेक्षा थोडा जास्त-कमी व्याजदर या कर्जावरही लागतो.उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जाचा व्याजदर ८.३% आहे. जर टॉप अप कर्ज घेतले तर व्याजदर ८.४% आहे.
 • नवीन कागदपत्रांची आवश्यकता नाही: आपले सर्व गरजेचे कागदपत्र आधीपासूनच बँकांकडे जमा असल्यामुळे पुन्हा कोणतीही प्रक्रिया किंवा कागदपत्रांची जुळवाजुळाव करण्याची आवश्यकता नाही. टॉप अप कर्जासाठी फक्त काही अद्ययावत गोष्टींची आवश्यकता असू शकते. उदाहरणार्थ, आपल्याला चालू कर्जाची परतफेड केलेले बँकचे पुरावे सादर करण्याची आवश्यकता असू शकते. 
 • सामान्य मंजूरी प्रक्रिया:  टॉप अप कर्ज त्यांच्या सुलभ-मंजूर प्रक्रीयेसाठी देखील प्रसिद्ध आहेत. हे कर्ज मंजूर करण्यासाठी बँक पुन्हा सगळी तपासणी प्रक्रिया करून तपासात नाही. मागील कागदपत्रांचा वापर यासाठी केला जाऊ शकतो. 
 • दीर्घ कालावधीः टॉप अप कर्ज दीर्घ कालावधीसाठी देखील उपलब्ध आहेत. म्हणजे  २०-३० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी हे कर्ज दिले जाऊ शकते. प्रत्येक बँकेची कर्जाची मुदत वेगवेगळी असू शकते. काही बँका सध्याच्या कर्जाच्या उरलेल्या कालावधीसाठी टॉप अप कर्ज देतात. काहीजण चालू कर्ज कधी संपते आहे हे विचारात न घेता २० वर्षे किंवा ३० वर्षे पर्यंत कर्ज देऊ शकतात. आणि काही निवृत्तीवेतन सुरू होईपर्यंत किंवा वयाचे ७० वर्ष पूर्ण सुरु होई पर्यंतच्या कालावाधीसाठी हे कर्ज मंजूर करतात. 
 • करामध्ये फायदे: जर हे नवीन कर्ज तुम्ही गृह विस्तार, नूतनीकरण किंवा आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले तर त्या टॉप अप कर्जावर तुम्ही करलाभ देखील मिळवू शकता. 

गृहकर्ज – लवकर परतफेड की गुंतवणूक?

गृहकर्ज घ्यायचं आहे? मग या गोष्टी तपासून पहा

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]